थंड घ्या...व्हा गार !!

एप्रिल सुरु झाला. सूर्य डोक्यावर जाळ काढू लागला आणि घसा गार करण्याची वारंवार गरज पडू लागली. आईस्क्रीमची दुकाने हेरून पार्सलं आणून घरची मंडळी गार झाली खरी. पण माझं कै त्या दुकानी आईस्क्रीमवर भागेना बॉ. आईस्क्रीम ही चावण्याची चीज नसून तोंडात विरघळत अल्लाद गिळण्याची गोष्ट आहे असे माझे मत आहे. आणि विकतच्या हरेक आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रुट्स! चावा चावा, रवंथ करा. तोवर ते आईस्क्रीम जिभेला आपली ओळखपण न देता आत सटकलेले असते !
म्हणून मग मी आईस्क्रीमच्या पाकृचा जारीने शोध घेतला. तशी तर मी गेली दहा वर्षे आईस्क्रीमसाठी वेगवेगळ्या रेसिप्या ट्राय करून पाहिल्यात. पण सॉफ्ट आईस्क्रीम आजमितीस माझ्या फ्रीजला पाहायला मिळाले नव्हते. आजवर माझ्या आईस्क्रीमला फ्रीजमधून बाहेर आल्यावर स्वत:च्या पोटात चमचा खुपसून घ्यायला राजी व्हायला किमान दहा मिनिटे लागलेली आहेत. पण याखेपी मात्र सॉल्लिड टिप मिळाली अन खल्लास सॉफ्ट आईस्क्रीम जमले. काल केलेल्या आईस्क्रीमइतके समंजस आईस्क्रीम बॉक्समधून आलेले तयार कंपनी शिक्कावालेपण नसेल. इम्मीजिएटली चमचा आत !
आणि तेही इतकुशा साहित्यात इतके मायंदाळ झाले की आठ दिवस घरातले सगळे आईस्क्रीमात लोळले. विकतच्या आईस्क्रीमात दोनशे रु. च्या बॉक्सात चार माणसांना एका वेळी एकच इवलुसा गोळा मिळत होता. घरचे आईस्क्रीम दोनशेचेच साहित्य आणून त्यातल्या पन्नास रु. चे वापरून केले तर ते चार बॉक्स भरून झाले !!
म्हणून मग मिपाच्या पाकृ दालनाच्या दरवाजातून एक पाउल हळूच आत टाकले. हो, आजवर फार तर चार वेळा या दालनाला हात लावला असेल ! नायतर आमचे पाकृ आणि फोटो कौशल्य सानिका आणि गणपा आणि दीपक यांच्या कौतुकालाच तेवढे खर्ची पडते, कृतीला नाही.
तर बघा जमलाय का हा प्रकार आणि तुम्हीपण करा आईस्क्रीम अन लोळा !!
साहित्य : अर्धा लिटर कच्चे दूध
८ टेबलस्पून साखर
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
१.५ टेबलस्पून GMS पावडर
१.५ टेबलस्पून मिल्क पावडर
एक अष्टमांश टीस्पून CMC पावडर
पाऊण कप व्हिप क्रीम.
आवडीप्रमाणे इसेन्स, फ्रुट क्रश, सिरप इ.

आता ही GMS आणि CMCपावडर म्हणजे काय ते कृपया विचारू नये. कारण मलाही माहिती नाही. पण आईस्क्रीमचे साहित्य मिळते त्या दुकानात विचारा, मिळेल.
साखर, कॉर्नफ्लोअर, आणि तिन्ही पावडरी एकत्र करून चांगल्या मिक्स करायच्या. मग त्यात कच्चे दूध घालून गॅसवर ठेवायचे आणि कढी ढवळावी तसे ढवळत एक उकळी काढा. मग गॅस बंद करून हे मिश्रण पसरट भांड्यात घालून थंड करा आणि ठेवा फ्रीजरमध्ये.


फ्रीजर सेटिंग हाय करून साधारण पंधरा तास ठेवायचे.
मग बाहेर काढून एक तास ठेवायचे. आता त्यात पाऊण कप फ्रेश व्हिप क्रीम घालून बीटरने सुमारे ७-८ मिनिटे घुमवा. आता याचा व्हॉल्यूम दुपटीपेक्षाही जास्त होईल.


मग पुन्हा ४ तास फ्रीजरला ठेवा. आता अर्धा तास बाहेर काढून ठेवा अन पुन्हा ४-५ मिनिटे त्यात बीटर चालवा.
आता इसेन्स, फ्रुट पल्प किंवा क्रश घालून हलकेच ढवळा. हलकेच ढवळल्यामुळे आईस्क्रीमला छान मार्बल टच मिळेल.

मग फ्रीजरमध्ये ठेवा. आता फ्रीजर सेटिंग लो करून ठेवा म्हणजे आईस्क्रीम सॉफ्ट होईल.
सहा तासांनी फ्रीजर उघडा आणि...
...आता मी सांगायची वाट बघताय काय ? हाणा आईस्क्रीम आणि व्हा गार !!!


वाह क्या बात है!
ज्जे बात
देवा!!
In reply to देवा!! by स्पंदना
तू ये गं इकडे, तुला करूनच खाऊ
In reply to तू ये गं इकडे, तुला करूनच खाऊ by सस्नेह
गाववाले-गाववाले...
In reply to गाववाले-गाववाले... by एस
या की
In reply to तू ये गं इकडे, तुला करूनच खाऊ by सस्नेह
मस्त मस्त मस्त जियो.......
अहाहाहा...
_/\_ .
आच्चीम आच्चीम
बापरे....
In reply to बापरे.... by दिपक.कुवेत
धन्यू
In reply to बापरे.... by दिपक.कुवेत
GMS हे ग्लिसेरोल( ग्लिसरीन)
In reply to GMS हे ग्लिसेरोल( ग्लिसरीन) by सुबोध खरे
एका छळणार्या प्रश्नाचे उत्तर
गार गार वाटल्.मस्त करून पहाते
In reply to गार गार वाटल्.मस्त करून पहाते by इशा१२३
शोध शोध आणि हे असं काहीतरी
क्या बात! __/\__
आहाहा
_/\_ एवढा वेळ वाट पहायला
वाह!!
वाह! क्या बात है!
मी येतेय.... :)
वाह! क्या बात आहे.
वॉव..
स्नेहा,एकटीने खाल्लंस?माझी
मस्तच!
जीव गेला गारेगार आइसक्रीम
मी सध्या पुण्यात आहे, एवढे
(No subject)
पाक्रु
क्या बात है
फारच मस्त!
जबरी दिसत आहे!!!
तों पा सु :)
मस्त !!! या वातावरणात अगदी
CMC आणि GMS पावडर
लाजवाब
आवळा पेठा आणि आवळा सरबत
आम्हाला बी आईस्क्रीम लय आवडल.
धन्यवाद.....
In reply to धन्यवाद..... by मुक्त विहारि
आमच्या मिपासंन्यासाचा बेत
आह!!! सुरेख .. पण इतना
In reply to आह!!! सुरेख .. पण इतना by प्रीत-मोहर
इंतजारका फल मीठा होता है +)
जबराट
तो दिपकचा छळवादी धागा बघुन आठवले,
आहाहा... :)मदनबाण.....