
मंडळी,
कधीतरी असं होतं का कि फ्रिज उघडला की आणलेल्या सगळ्या भाज्या थोडया थोडया उरलेल्या दिसतात. मग त्या तशाच टाकून देणंहि जीवावर येतं आणि त्याची भाजी करायची म्हटली तरी पुरवठयास येत नाहि.
असं जेव्हा होत तेव्हा घ्या सगळ्या भाज्या, द्या फोडणीचा तडका, भरा ब्रेड मधे आणि करा ग्रील्ड सँडवीच.....थांबा थांबा डीट्टेलवार सांगतोच कसं!
साहित्यः
१. उभे चीरलेले कांदे - २
२. उभ्या चीरलेल्या रंगीत सीमला मिरच्या - प्रत्येकि १ मध्यम
३. गाजराच्या काडया - १
४. वाफवलेले कॉर्न - १ वाटि
५. पातळ चीरलेला जांभळा कोबी (नसला तरी वांधा नाय)
६. पनीर - १/२ वाटि (एच्छिक)
७. तेल - २ चमचे
८. टोमॅटो केचप - ३ ते ४ मोठे चमचे
९. चीली फ्लेक्स - १ चमचा (नसतील तर १/२ चमचा तिखट)
१०. ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स - १ चमचा
११. चवीनुसार मीठ
१२. आपापल्या आवडिचा ब्रेड
कॄती:
भाज्या क्रंचीच ठेवायच्या आहेत म्हणून पार मउ होईस्त शीजवू नका.
१. मंद आचेवर नॉन स्टिक कढईत/वोक/पॅन मधे तेल तापलं कि उभा चिरलेला कांदा घाला. कांदा परतला कि अनुक्रमे गाजर, सीमला मिरच्या, कॉर्न घालून परता.

२. आता त्यात टोमॅटो केचप, चीली फ्लेक्स, ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. कुस्करलेलं पनीर अॅड करा.

३. भाजी पुर्ण गार झाली कि जांभळा कोबी मिक्स करा. भाज्या केचप मधे व्यवस्थीत कोट होण्यासाठि दोन चमचे किंवा फोर्कनी भाज्या खालीवर मिक्स करा.

४. स्टफिंग गार होतेय तो पर्यंत ग्रीलर प्रीहिट होण्यास ठेवा. ब्रेड स्लाईस मधे स्ट्फिंग भरा. आवडत असल्यास चीजने टॉपअप करा (स्लाईस किंवा किसलेलं). ब्रेड स्लाईसला वरुन बटर लावून ग्रील्ड करा

५. गर्मागरम मिक्स व्हेज सँडवीच चा आस्वाद घ्या
टिपः नॉन व्हेज वाले ह्यात उरलेले चिकन टिक्क्याचे तुकडे, सुखा कोलंबी मसाला अॅड करु शकतात. चवीबद्दल खात्री देत नाहि पण एकदा प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे?
मस्तच
पाकृ आवडली. फोटू छान आलेत.
गुलाबी कोबी कुठे मिळतो
In reply to गुलाबी कोबी कुठे मिळतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
रिलायन्सफ्रेश मध्ये मिळायला
In reply to गुलाबी कोबी कुठे मिळतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
मिळतो की!
In reply to मिळतो की! by यशोधरा
वोक्के. कधी पाहिला नव्हता
In reply to वोक्के. कधी पाहिला नव्हता by कॅप्टन जॅक स्पॅरो
मग? कळतो की नाही? =))
In reply to मग? कळतो की नाही? =)) by यशोधरा
कळतो हो कळतो. चांगला स्वयंपाक
In reply to कळतो हो कळतो. चांगला स्वयंपाक by कॅप्टन जॅक स्पॅरो
LOL!
जबराट रे.
नयनरम्य !
सुरेख!!
वा! मस्तच!!!
In reply to वा! मस्तच!!! by पिलीयन रायडर
तो हातगाडीवाला ना? सेरेब्रम
In reply to तो हातगाडीवाला ना? सेरेब्रम by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो हो... लाइनीने खुप गाडे
In reply to हो हो... लाइनीने खुप गाडे by पिलीयन रायडर
अजुनही भारी आहे ते. कधीतरी
In reply to वा! मस्तच!!! by पिलीयन रायडर
मुंबईतल बॉम्बे मसाला सँडविच
In reply to वा! मस्तच!!! by पिलीयन रायडर
धन्यवाद पिरा
In reply to धन्यवाद पिरा by दिपक.कुवेत
बटाट्याची भाजी हि फक्त
रेशिपी आवडली.
छान.
In reply to छान. by भाते
हो रे भात्या
दिपकभाऊ, ग्रिल्ड सँडविच
In reply to दिपकभाऊ, ग्रिल्ड सँडविच by आदूबाळ
आदूबाळा
In reply to आदूबाळा by दिपक.कुवेत
:( वैताग आहे...
In reply to :( वैताग आहे... by आदूबाळ
नक्कि कसला?
In reply to :( वैताग आहे... by आदूबाळ
अदूदादू, घरून स्यान्डविच
In reply to अदूदादू, घरून स्यान्डविच by रेवती
तरीसुद्धा
In reply to तरीसुद्धा by दिपक.कुवेत
आयड्या भारी आहे!
दिपकभौ झिंदाबाद!
वाह ! क्या बनाया हे , मीयां
भाते , तुमचया विनंतीला मानून
In reply to भाते , तुमचया विनंतीला मानून by कंजूस
लोकसत्ता
In reply to भाते , तुमचया विनंतीला मानून by कंजूस
हो गाडगीळ साहेब
In reply to हो गाडगीळ साहेब by दिपक.कुवेत
बापरे!
मस्तच!
ह्यात पण पनीर आहेच का :)
In reply to ह्यात पण पनीर आहेच का :) by सानिकास्वप्निल
ह्यात पण पनीर आहेच का :)
In reply to ह्यात पण पनीर आहेच का :) by सूड
नको रे नको
In reply to ह्यात पण पनीर आहेच का :) by सूड
हाहाहा,
In reply to हाहाहा, by भाते
खी खी खी
वाह. भारी दिसतंय.
मस्त
अप्रतिम फोटो आणि पाकृ!
Khoop chan pakkruti ahe
Koni mala madat karu shakel ka
In reply to Koni mala madat karu shakel ka by Prau11
मदत पान आहे की...
PLease help me. karan me type kelele marathit disat nahiye.
मस्तच !
सँडविच मस्त आहे! फोटोही भारी
जांभळा कोबी पार्ल्यात मिळतो.
जांभळा कोबी स्टार बझार मध्ये
काल केलं होतं हे सँडविच. मस्त
खल्लास्स्स्स्स्स....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiकालच मशरूम ग्रिल सॅडविच खाल्ले
लय भारी!
धन्यवाद मंडळी
In reply to धन्यवाद मंडळी by दिपक.कुवेत
आता मी पण एखादी पनीरची पाकृ
In reply to आता मी पण एखादी पनीरची पाकृ by सूड
अरे कर की मग
मस्त रेसिपी आहे.
अगदी जोरदार भूक लागली असताना