मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुड मॉर्निंग

पॉइंट ब्लँक · · मिपा कलादालन
सूर्योदय पाहणे ही एक आनंददायक गोष्ट. आणि समुद्रात उगवत्या सुर्याचे प्रतिबिंब पाहणे अजूनही आनंददायक. मुंबईकर ह्या बाबतीत नशिबवान आहेत. दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये बेलापूरला गुलाबी थंडीत टिपलेले काही फोटो. सूर्य उगवताना आकाशातील रंगांची छान उधळण. DSC_0121 सूर्य थोडसा वर आल्यावर दिसणारी उबदार सोनेरी छटा. DSC_0088 सूर्योदय आणि पक्षी. DSC_0076_gimp असाच एक टाईमपास फोटो DSC_0050 आणि हा आमच्या बेंगलोरचा सूर्य. ह्याला उगवायला रोज धडपड करावी लागते. आम्ही सारखे ट्राफिकमध्ये अडकतो आणि हा ढगांमध्ये. ;) DSC_0026

वाचने 4620 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by पॉइंट ब्लँक

शब्दबम्बाळ Sun, 04/12/2015 - 11:09
पोस्ट प्रोसेसिंगसाठी काही ठराविक टूल्स असतात का? आणि रॉ इमेज असेल तरच ते चांगले होते का? या संबंधी माहिती कुठे मिळू शकेल?

In reply to by शब्दबम्बाळ

पॉइंट ब्लँक Sun, 04/12/2015 - 19:30
पोस्ट प्रोसेसिंगसाठी काही ठराविक टूल्स असतात का?
हो, फोटोशॉप हे लोकप्रिय टूल आहे. पण ते फूकट मिळत नाही. माझ्यासारखे फु़कटे गिंप आणि पिकसा वापरतात. पिकसा वापरायला सोपं आहे पण गिंप मध्ये स्वातंत्र्य जास्ती आहे, सिलेक्टीव एडिटिंची सोय पिकसामध्ये नाही ते गिंप मध्ये करता येते.
आणि रॉ इमेज असेल तरच ते चांगले होते का? या संबंधी माहिती कुठे मिळू शकेल?
हे फार लोकांकडून ऐकले आहे, एक्स्पोजर अ‍ॅड्जेस्ट करायला रॉ इमेज असणे जास्त चांगले. पण मी हौशी कॅमेरामन( फोटोग्राफर नाही) आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन करण्यास असमर्थ आहे. तुम्ही ह्या शंका काथ्या़कुट मध्ये टाकल्यास तुम्हाला योग्य मार्गदर्शन इथले उस्ताद करतील असं मला वाटत. इतरांनाही त्याचा फायदा होईल. :)

श्रीरंग_जोशी Tue, 04/14/2015 - 09:08
फोटोज कलात्मक वाटत आहेत. परंतु एकाच रंगछटेत असल्याने मला जरा भडक वाटत आहेत. अशा फोटोजमध्ये थोडी जमीन किंवा वृक्ष असल्यास चित्र म्हणून ते दृश्य अधिक संतुलित दिसू शकते असे मला वाटते.

जलपरी Mon, 04/20/2015 - 21:26
पहिला फोटो खुप आवडला. रंगांच सुरेख मीश्रण झालय.