Skip to main content

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 09/04/2015 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोगप्रतिबंधात्मक उपाय व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते. आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. आपल्याला नेहमी हवे असलेले चांगले आरोग्यही असेच मिळवावे लागते. आपल्याला लागणारे चांगले आरोग्य हे काही कोणत्या दुकानात किंवा मॉल मध्ये उपलब्ध होत नसून ते मिळवण्यासाठी त्यासाठी आधी ठरवावे लागते, मग भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. ते कोणी आपल्याला आणून देत नाही, किंवा आपल्याला मिळेल याची कोणी संपूर्ण जीवनभर(व एकदा घराबाहेर पडल्यावर) काळजी घेऊ शकत नाही. मान्य आहे, आपल्याला कुटुंबासाठी व कंपनीत नेमून दिलेल्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. समजा आपण खूप व्यस्त आहात आणि आपल्याला स्वत:ला आरोग्य चांगले रहावे यासाठी द्यायला (जो काही अर्धा ते एक तास)वेळच भेटत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्यावर संपूर्ण कुटुंब व कंपनी अवलंबून असेल अशात जर जर मी आजारी पडलो व काही दिवस/ आठवडा/ महिने/ वर्षभर माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल माझ्या कुटुंबाचे व कंपनीचे/ माझ्या नोकरीचे/ माझ्या व्यवसायाचे? आणि जर मी काम करण्यास असमर्थ ठरलो तर कोण काळजी घेईन माझ्या कुटुंबाची? माझ्या नोकरीची? माझ्या कंपनीची/व्यवसायाची? यामुळे स्वत:ला निरोगी ठेवणे ही देखील सर्वात मोठी जबाबदारीच होवून बसते. आणि जर आपण स्वत: निरोगी व परिणामी अधिक आनंदी राह्यलो तर आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला व कंपनीला अधिकाधिक फायदा व तोही जास्त दिवस/वर्षे मिळत राहणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे इतर कोणतेही कारण न देता, स्वत:ला न फसवता, आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी "जे काही आवश्यक असे ते सर्व" आवर्जून केलेच पाहिजे व पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. जर आपण आपल्या स्वत:च्या आनंदासाठी जर वेळ देवू शकत नसलो तर मग आपण नेमके कोणासाठी जगत आहोत हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारला पाहिजे! आपण न थकता, न सुट्टी घेता कुटुंबाची/कंपनी व व्यवसायाची पार पाडत असलेली जबाबदारीही आता ह्या आनंदाचा एक भाग आहे. आता आधीच्या लेखात दिलेली आजारी पडण्याचे सर्व कारणे परत एकदा पाहू या व प्रत्येक कारणाआधी मला, माझे, मी ठरवलेले, मी मान्य केलेले असे शब्द वापरले तर काय होते/होईल ते पहा. मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १) माझे वय २) माझे लिंग ३) माझ्या आहारातील घटक ४) माझी आहार घेण्याची वेळ ५) माझी आहार घेण्याची सवय ६) माझ्या घरात/मी जात असलेल्या खानावळीत आहार तयार करण्याची पद्धत ७) माझ्या आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक ८) माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ९) माझा व्यवसाय १०)माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य ११)माझ्या कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास १२)माझा समंजसपणा १३)माझा मानसिक दृष्टीकोन १४)माझ्या घरातील भावनिक वातावरण १४)मी घेत असलेला/ली आराम व झोप १५)मी करत असलेला शारीरिक व्यायाम १६)मी करत असलेले योगासने व प्राणायाम १७)माझी मानसिक व्यग्रता १८)माझे धार्मिक संस्कार व मान्यता १९)माझ्या कर्मावरील माझा विश्वास २०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची माझी प्रवृत्ती २१)माझी वैयक्तिक स्वच्छता २२)माझ्या वातावरणातील रासायनिक प्रदूषण २३)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग २४)मी निवडलेली संगत २५)माझ्या स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र २६)मी खातो त्या खाद्यान्नातील जैविक शक्ती २७)माझ्या आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार २८)माझ्यावर होवू घातलेल्या आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. यावरून असे लक्षात येईल कि आज जी काही परिस्थिती उद्भवली आहे किंवा उद्या उद्भवणार आहे ती संपूर्णतः माझ्या स्वत:च्या इच्छेनुसारच होणार आहे व त्याचे परिणाम आपण स्वत:, आपले कुटुंब व आपली कंपनीच/ आपला व्यवसायच भोगणार आहात. नंतर दुसऱ्या कोणाला दोष देवून बळीचा बकरा जरी बनवायला जाल तरी त्याआधी तुमचा स्वत:चा व कुटुंबाच्या आनंदाचा, कंपनीच,/नोकरीचा वा व्यवसायाचा बळी गेलेला असेल. जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....

वाचने 17025
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

व्हय १०० व्हायाच पाइजे! नशीबाची साथ किती जरूरू असते आणि धाग्याचा यशामध्ये वाचकांचा किती मोठा हातभार ( हिते मनावर ब्रेक लावणे ) असतो ह्याचे हे सर्वोत्तम उदाहरण !

In reply to by पॉइंट ब्लँक

मनावर ब्रेक
ह्यावरुन आठवलं. ते मनोबा दिसत नैत इकडे हल्ली ?

एकदम कॉमेडी लिहिलय.खुप जास्त गोष्टी लिहिल्यात.फक्त खालील पॉइन्ट्स हवे होते.
मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १) माझे लिंग २) माझी घेण्याची वेळ ३) माझी घेण्याची सवय ४) माझा व्यवसाय ५)माझी वैयक्तिक स्वच्छता ६)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग ७)मी निवडलेली संगत ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

In reply to by लॉर्ड फॉकलन्ड

मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग २)मी निवडलेली संगत ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

@व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते...............................................................................................................................................................................................जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....>>> ब्वॉर! तुमचं प्रॉडक्ट काय? ते बोला की मग आता! ;)