मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नखांची रंगरंगोटी - Nail Art ( Ombre effect i.e. Shades)

mayurpankhie · · मिपा कलादालन
आज नखांवर शेडींग करूया. जेव्हा पहिल्यांदा २-३ रंग नखांवर मिसळलेले पाहिलेत तेव्हा काहीतरी मस्त पाहिल्यासारखं वाटलं. मग नेहमीच्या सवयीने गुगलून बघितलं की नक्की करता तरी काय. तेव्हा कळलं एका साध्याशा गोष्टीने किती मस्त प्रकार करता येता ते. ती गोष्ट म्हणजे Sponge ... याला मराठीत काय म्हणता ते माहित नाही :P चला तर घ्या तुमच्याकडे असेल तो sponge अगदी किचन मधला पण चालेल. आता एका रंगाचे २-३ शेड्स किंवा कोणताही फिका रंग आणि आपला आवडता पांढरा रंग. मी नेव्ही ब्लू , आकाशी आणि पांढरा घेतलाय. अंदाजे नखावर ३ रंग दिसतील अशा रेघा sponge वर काढा. Ombre 1 किंवा एक दुसऱ्या पद्धतीने पण करता येईल. एका प्लास्टिक च्या छोट्या डिश मधे दोन रंग थोडे थोडे घ्या. आणि त्यांना जरासं मिसळा. आता त्यावर sponge दाबा. Ombre 2 हा sponge आता नखावर हळूच दाबा. शेड्स तयार :) Ombre 3 सगळे नखं सुकल्यावर स्टेप्स रिपीट करा.

वाचने 1455 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कविता१९७८ Wed, 04/08/2015 - 17:16
कलर कॉम्बीनेशन छान, पण फीनीशिंग हवी. बर्‍याच ठीकाणी कलर नखांच्या कडांच्या बाहेर लागलाय तर काही ठीकाणी कडांपर्यंत लागलेला नाही असं दिसतय.

In reply to by कविता१९७८

mayurpankhie Wed, 04/08/2015 - 17:28
हो अहो ... नखांना आजूबाजूला सेलो टेप लावायचा असतो त्यामुळे आजूबाजूला रंग लागत नाही. किंवा नंतर नेल पेंट रीमुवर ने काढावा लागतो. माझा नीट काढला गेला नसेल. म्हणून तसं दिसतंय :)