गुर्हाळ लावलय गुर्हाळ....
या हो मंडळी... गोडखाऊ...साखरखाऊ...गुळखाऊ.... या हो या....
अशी जोरदार हाळी द्यावीशी वाटल असं ठिकाण बगितलं आंम्ही..http://www.misalpav.com/node/23073 पांडवेश्वर दौर्याहुन परतताना. अगदी येक नंबर जागा बघा... येकदम मेमरेबल. त्याचं काय हे ना,गुर्हाळ मंजे गावकडच्या पब्लिकला म्हाइत असनारी गोष्ट...! पन शेराकडल्या मानसास्नी ह्ये असलं काय बगाया मिळालं,की ल्हान पनी जत्रेत बापाकडनं न मागता जंबो मिळायागत आनंद हुतो बगा...म्हनुन आज आपुन त्येची सफर करायची. अता तसं म्हनाया ग्येलं तर ही जागा,मंजी गुर्हाळात इशेष त्ते क्काय,यितक उलगडून सांगन्या सारखं??? असा ट्नाक उसा सारखा आपटल्या बिगर न फुटनारा प्रश्न पडू शकतोच की...!
हा...पन हितच तं सग्ळी गोम हाय वो...! जरा आमचं ह्ये गुर्हाळ बगा तरी कसं हाय,येवढं लांबरुंद् आनी म्होटं चरंखं बगाया घावतं काय तुमच्या शर्हात...? न्हाय ना? मग बगा कसा हाय ह्यो चरका..म्होट्टाच्या म्होट्टा...उसच काय येळ पडली तर... ;-)
असो... तर ह्या गुर्हाळाची गंम्मत सुरु व्हती ती आपुन गाडी रोडच्या साइडला सोडल्या पास्नं... गाडीतनं खाली उतरेपर्यंत ह्ये ना मंडळी, त्या रसाचा अस्सा काही खमंग आनी गो...ड वास सुटतो,की असं वाटतं त्या गुर्हाळात जाऊन गुळ खान्या परास ह्यो वासच खात र्हावं...! त्याच नशेत आपन म्होरं सरकल्याव, वेंट्रीला दिसते ती ही सगळी पडल्याली सुक्या चिपाडाची रास,,,
आनी गाळायच्या पेश्शल उसाचा खच...
अता जाऊ आपन गुळ कराच्या म्हा... रेशिपिकंड...
सग्ळ्यात आंदी त्यो सॉर्टिंग क्येलेला उस व्हता न्हवं का,त्यो ह्या म्होट्या चरक्यात जातु..
काय पट्टा फिरावनारी मोटार दमदार हाय बगा मंडळी...
दुपारच्या टाय्माला कडाडून भांडनार्या बाईच्या तोंडाचा पट्टाच जनु...
तर अश्या ह्या दमदार मोटर असलेल्या चरख्यात ऊस मंजी, जेवनात कचाकचा खाल्लेल्या कांद्या सारका जतोय बगा...आनी नंतर मग त्येचा काळाकभिन्न म्हनावा,पन मुळचा आमच्या इटुरायासारखा गोड असावा,असा रस ह्या हौदात सोडत्यात बरं...!
आन मग त्यो रस फुडं जातो तो ह्या तिन कडईच्या ओपन बॉयलर मदी...
हा पन ह्या बॉयलरची येक गंम्मत दाकवायची र्हाइल बर का.. ती दावतो आदी... त्या अदुगर ह्ये पोरगं बगा बंरं काय करु र्हायलय...
मला बी पयल्यांदा त्येच वाटलं की भुश्श्यात पोरगं करतय तरी क्काय??? जवळ जाऊन नीट बगितलं तर काय?,,,आहो...अलम मानसाच्या जातीचा अवडता ख्येळ चाल्लावता त्याचा... त्या तीन कढयांच्या असलेल्या बॉयलर खालच्या आगीत-काड्या सारत होतं पोरं....!
हाय का न्हाय इब्लिस ब्येनं... मी ग्येलो जवळ बगाया तरं मला,,''पडशीला आत'' असं हसत म्हनलं ल्येकाचं...!
त्येला बखोटिला धरुन दूर सारलं आनी बगितलं,तर खाली काय हो त्यो जाळ... बाब्बो...! जाळ कसला?अगदी खर्राखुर्रा तिखट जाळ...! उगीच रसाला गुळाकड न्येतो व्हय तो...
जाऊ दे अता आपन पुन्ह्यांदा वर जाऊ...कढयां कडं,तर ह्या लाइननी ३ कढया...यातल्या फय्ल्या कडईत रस येऊन पडतो,तो हळू हळू अळायला सुरवात हुती,काळे पना बी जराजरा कमी होऊन आक्शी वाटलेल्या मेंदिवानी हिरवट व्हाया लागतो.
त्येच्या नंतर या दुसर्या कढईत त्येला ढकलतात,आनी थितंत्येच्या मदी प्रक्रीया होन्यासाठी कसलं तरी वंगान त्यात घालत्यात,त्यानं मळी खाली बसती आनी रस अज्जून फ्रेश मंजी सफेद हुतो.
आनी थितं त्यो रटारटा उकळाया लागुन,फ्येस सोडाया लागला...की त्याला लग्गेच हल्लीच्या शैक्षनिक धोरना परमानं भराभर फुडं ''पास'' करत्यात...
हां.............पन ह्या श्येवटच्या यत्तेत सग्ळ्ळा घाम निग्तो बर्का...! ह्या तिसर्या कढईत रस चांगला इत इत खाली जाईपरेंत कडतो...! येकदम कढुन कढुन केशरी रंग धारन क्येल्या बिगर सोडत न्हाईत ब्येन्याला...!
आनी मंग त्येच्या कडच्या पन्हाळीतनं उकळता गुळ,फुडं येका चौकोन्हात ढ्येपा करायला सोडत्यात... आला गरम गरम गुळ,की वोढ फावड्यानी आनी भर ढेपाच्या बादलीत(साच्यात) अस्सा सपाटा लागुन र्हातो बगा...
आनी मंग ह्यो भगवंताच्या रसाळ अभंगा सारखा गोड गुळ तय्यार होतो,तो आपल्याला थितं गरम गरम खाया मिळन्यासाटी,,,
आनी बाजारला जान्या साटीही...
मंग काय मंडळी कसं वाटलं आमी लावलेलं गुर्हाळ,,,हाय का नाय त्येच्यातल्या गुळावानी गोड....??? :-)
======================================================================================
प्रस्तुत ठिकानी आमी क्येल्येलं व्हिडो री-पोर्टिंग... खास पण्णास रावांच्या http://www.misalpav.com/comment/435394#comment-435394 आग्रहास्तव ;-)

वाचने
27342
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
झक्कास!
मस्त लावलाव गुर्हाळ
काय वो बुवा, ह्या वक्ताला
अक्शी गूळावानी ग्वाड धागा.
धागा आवडला. मदनबाणची आठवण
In reply to धागा आवडला. मदनबाणची आठवण by रेवती
आणखी एक सांगायचे राहिले.
In reply to आणखी एक सांगायचे राहिले. by रेवती
गुळ कुटून वापरता येईल
In reply to गुळ कुटून वापरता येईल by श्रीरंग_जोशी
ढेपेच्या आकारानुसार दीड मिनिट
In reply to धागा आवडला. मदनबाणची आठवण by रेवती
का ते त्यालाच विचारा.
का ते त्यालाच विचारा.अरे वा ! तुझ्या लक्षात आहे याचे नवल वाटलं. :) गूळाची गोडी.लै भारी :-)
In reply to लै भारी :-) by श्रीरंग_जोशी
आम्ही त्याला पेंढ पण म्हणतो...
मस्त
एवढा लहान मुलगा त्या आगीकडे
In reply to एवढा लहान मुलगा त्या आगीकडे by यशोधरा
वल्लीचा कित्ता गिरवत काड्या
In reply to वल्लीचा कित्ता गिरवत काड्या by अन्या दातार
+१

वल्ली, हे पहा काय म्हणतयत
In reply to वल्ली, हे पहा काय म्हणतयत by यशोधरा
काडीसारक अन्याभौना तशी सवयच
In reply to काडीसारक अन्याभौना तशी सवयच by प्रचेतस
अन्याशी सहमत.
सकाळी सकाळी गुळाचा
मस्त हो गुर्जी!
झ्याकच हो बुवा.
In reply to झ्याकच हो बुवा. by अन्या दातार
??
In reply to ?? by गवि
काकवी म्हणजे गूळ तयार
लैच भारी ओ बुवा, घरात पुरण
काय भाव दिला राव्?
जबराट
मस्त
In reply to मस्त by प्रचेतस
आहाहाहा
झक्कास!!
काय चव असेल ना गुळाची...! फटू
काकवी .
एखाद्या (आपल्या रुटीनमधल्या
छान.
आयला....या बुवाला
In reply to आयला....या बुवाला by चौकटराजा
@ आता गुळावानी ग्वाड प्वोरगी
In reply to आयला....या बुवाला by चौकटराजा
व्हय व्हय ... खरच गुर्जि आता
In reply to व्हय व्हय ... खरच गुर्जि आता by जेनी...
अगागागागागागा
In reply to व्हय व्हय ... खरच गुर्जि आता by जेनी...
@आन काकवी वानी झ्याक पोरं
In reply to @आन काकवी वानी झ्याक पोरं by अत्रुप्त आत्मा
मरु नका, जगू द्या. कसे??
In reply to मरु नका, जगू द्या. कसे?? by अन्या दातार
ते वर काकवी वानी झ्याक पोरं
In reply to ते वर काकवी वानी झ्याक पोरं by ५० फक्त
@पुढं १०१ चा आकडा काय नाचतोय
In reply to व्हय व्हय ... खरच गुर्जि आता by जेनी...
अगायायायायाया पार इस्कोटच
गुरुजी, लय ब्येस बर का.
लै भारी, कोल्लापुरजवळ येक
आक्शी भारी काम केलत गुर्जी
व्वा व्वा..... धम्माल एकदम.
आत्मागुर्जींचे तेज तर्रार
In reply to आत्मागुर्जींचे तेज तर्रार by गणपा
+ १

सरसकट सगळेच का बरं ??
In reply to आत्मागुर्जींचे तेज तर्रार by गणपा
(No subject)
झक्कास रिपोर्ट!
पराग अतिशय सुंदर झालंय
In reply to पराग अतिशय सुंदर झालंय by सांजसंध्या

@ तुझा कॅमेरा आणि लेखणी
गुर्हाळ वर्णन आवडले.
लय बेश्ट
साय नाही दिसली?
कालच अन्या दातार आणि
In reply to कालच अन्या दातार आणि by प्रचेतस
तिकडील धडधडणारी गुर्हाळं.
In reply to तिकडील धडधडणारी गुर्हाळं. by अत्रुप्त आत्मा
गुळ पाडण्याच्या सांप्रदायिक
In reply to गुळ पाडण्याच्या सांप्रदायिक by प्रसाद गोडबोले
गुळ पाडण्यात हातखंडा असणारे
In reply to गुळ पाडण्यात हातखंडा असणारे by अन्या दातार
आणि हो ...
In reply to आणि हो ... by प्रसाद गोडबोले
@गुळ पाडण्यात हातखंडा असणारे
In reply to @गुळ पाडण्यात हातखंडा असणारे by अत्रुप्त आत्मा
>>फारच सूक्ष्म निरिक्षण शक्ति
गुळावरल्या सायीपरास जगात काय