कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..
ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.
गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता. विजयनगरच्या राज्यांनी हे मंदिर मूर्तीभोवती बांधले. मंदिरात कलाकुसर तितकीशी पहावयास मिळत नाही. पण मंदिराच्या चौकटी वापरून एक छान आभास निर्माण करण्यात आला आहे. मंदिरातून जसजसे बाहेर जावू तसतशी मूर्ती मोठी होत असल्याचा भास होतो.
मंदिराचा एक फ़ोटो
सुदैवाने ह्या मंदिरात देवतेचा फ़ोटो काढण्याची परवानगी मिळाली.
ह्या गावातील दुसरे मंदिर आहे सोमेश्वराचे. हे मंदिर गणपतीच्या मंदिरापेक्षा जुने आहे. चोलांनी मूळ मंदिराची उभारणी केली असून होयसाळा काळात त्यात वाढ करण्यात आली.
मंदिरात प्रवेश करताच हा गणपती आपले स्वागत करतो.
ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्या शरीरावार वेगवेगळ्या भागावर टिचकी मारली की वेगवेगळे आवाज निघतात आणि मूर्तीवर कुठेही जोड दिसत नाहीत. म्हणजे बहुधा आतून पोकळपणा एकसारखा नसावा असा एक अंदाज आहे.
मंदिराचा एक फ़ोटो
मंदिराच्या खांभावर मजेशीर मूर्ती कोरल्या आहेत. तीन व्यक्ती आणि चारच पाय असलेले हे नृत्य.
त्याच आवारात कार्तिक स्वामींचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती
एक विचित्र गोष्ट दिसून येते ती म्हणजे शंकराच्या मंदिरात इतर बर्याच देवतांच्या मुर्त्या आहेत. उदा ही बालाजीची मूर्ती .
असे ऐकण्यात आहे की कधी काळी कुरुडुमळे आणि जवळपास तीस मंदिरे होतॆ. ती सर्व अरकोटच्या नवबाने उधवस्त केली. काही वाचलेल्या मूर्त्या शंकराच्या मंदिरात आणून ठेवल्या आहेत.
परत येताना मुलबागलला भेट दिली. इथे विरांजनेय म्हणजेच हनुमानाचे मंदिर आहे. मारुतीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. ह्या मारुतीच्या हातात गदेबरोबर तलवार सुध्दा आहे. ह्याची स्थापना अर्जुनाने केली असे मानन्यात येते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराचा फोटो
मंदिराचा आवार प्रशस्त आहे. आणि मंदिर परिसरात शेषशायी विष्णुची सुद्धा एक सुरेख मूर्ती आहे. आवाराचा एक फोटो.
बेंगलोरहून चन्नई हायवे वापरून कोलार बायपासवरून मुलबागला जाता येते. गाडी चालवण्यास रस्ता एकदम मस्त आहे. ही सहल अर्ध्या दिवसात पूर्ण करता येते. मुलबागल तालुक्याचे ठिकाण असून, नाष्ट्याची चांगली सोय आहे.
पूर्ण दिवस घालवायचा असेल तर कुरुडुमळे, मुलबागल, विरुपाक्षी, बंगारु तिरुपती, कोटी लिंगेश्वरा या सर्व ठिकाणी भेट देता येवू शकते. ऐनवेळी दुपारी उल्हास आल्यामुळे हे दोन ट्प्यात करावे लागले. राहिलेल्या ठिकाणांचे फोटो परत कधीतरी.

वाचने
10176
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
धन्यवाद.
In reply to वा! by पैसा
छान फोटो
छान माहिती दिलीत. खरच आभारी
In reply to छान फोटो by प्रचेतस
फोटोंमध्ये अति विग्नेत चा
vignette
In reply to फोटोंमध्ये अति विग्नेत चा by स्पा
नजरेस आणून दिल्याबद्दल
In reply to फोटोंमध्ये अति विग्नेत चा by स्पा
जबरीच. दक्षिणेतील मंदिरांचा
बॅटमॅन भाउ
In reply to जबरीच. दक्षिणेतील मंदिरांचा by बॅटमॅन
मी स्वतः प्रत्यक्ष फार देवळे
In reply to बॅटमॅन भाउ by पॉइंट ब्लँक
ह्या ग्रुपची माहिती
In reply to मी स्वतः प्रत्यक्ष फार देवळे by बॅटमॅन
आंध्रामधील मंदिरे फेमस
In reply to ह्या ग्रुपची माहिती by पॉइंट ब्लँक
+१
In reply to मी स्वतः प्रत्यक्ष फार देवळे by बॅटमॅन
इंडीड!
In reply to +१ by कपिलमुनी
मस्त. स्पा म्हणताहेत तसे थोडे
काँट्रास्टही जास्त झाला आहे?
In reply to मस्त. स्पा म्हणताहेत तसे थोडे by एस
सर्वच बाबतीत अप्रतिम.........
नवीन जागेबद्दल धन्यवाद. 'काम'
डीसलारवाल्याला (म्हणजे
In reply to नवीन जागेबद्दल धन्यवाद. 'काम' by कंजूस
मला होयसळांपेक्षा चालुक्य
In reply to डीसलारवाल्याला (म्हणजे by पॉइंट ब्लँक
शैली
In reply to मला होयसळांपेक्षा चालुक्य by प्रचेतस
छान!!!
अरे वा..
ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य
धन्यवाद
In reply to ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य by भुमन्यु