कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले.
इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे.
त्याने जे केले त्याला पुरेशी प्रसिद्धी दिली असती तर ते पुरले असते. त्याला खोट्या बिर्याणीची फोडणी द्यायची काय गरज आहे? मला वाटते असा खोटारडेपणा करणे अगदी कसाबबद्दल असले तरी खोडसाळपणाचे आहे. ह्या बिर्याणीमुळे त्या वेळच्या सरकारच्या अब्रूचा फालुदा झाला त्याला जबाबदार कोण? सरकारचा पगार घेणार्याने सरकारचीच अशी बदनामी करणे चालते का?
पुन्हा असा अतिरेकी हल्ला झाला आणि पुन्हा असा खटला चालवायचा झाला तर निकमांवर कोण विश्वास ठेवेल बरे?
बिर्यानी ने निकम को निकम्मा कर दिया वरना हम भी वकील थे कमाल के असे म्हणायची वेळ त्यांच्यावर येऊ नये!
वाचने
6653
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे निकम वकीलीपेक्षा चमकोगीरी
हम्म......मलाही ते खटकले.
बातमी
खळबळ
जुनीच बातमी नव्या प्रकारे
खोटारडेपणा वाईटच
In reply to जुनीच बातमी नव्या प्रकारे by श्रीरंग_जोशी
निकाल बदलून तो निर्दोष सुटेल
In reply to खोटारडेपणा वाईटच by हुप्प्या
नक्की भीती काय होती?
In reply to निकाल बदलून तो निर्दोष सुटेल by श्रीरंग_जोशी
खटला व माध्यमांतील बातम्या
In reply to नक्की भीती काय होती? by हुप्प्या
सोयिस्कर
In reply to खटला व माध्यमांतील बातम्या by श्रीरंग_जोशी
निकम यांची चूक
In reply to सोयिस्कर by हुप्प्या
आता हेही निकमांच्या मेंदूतून निघालेले आहे का?
In reply to निकम यांची चूक by श्रीरंग_जोशी
नाही
In reply to आता हेही निकमांच्या मेंदूतून निघालेले आहे का? by हुप्प्या
...
In reply to जुनीच बातमी नव्या प्रकारे by श्रीरंग_जोशी
बरं, मारली थाप त्यांनी, काय फरक पडतो?
गैरसमज आहे
In reply to बरं, मारली थाप त्यांनी, काय फरक पडतो? by मास्टरमाईन्ड
कसाब फाशीवर चढला, प्रकरण बंद.
आजिबात नाही
In reply to कसाब फाशीवर चढला, प्रकरण बंद. by पॉइंट ब्लँक
+१००
In reply to आजिबात नाही by हुप्प्या
यांचेही मत पहा
ज्युरी ट्रायल नसतानाही...