पाठीराखा
हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर
आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर
कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो
शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो
विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते
त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते
विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते
मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते
पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले
भौतिकतेचे तामस मनातूनी सरले
आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल
प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
वाचने
3738
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
------द्विज पर
असेच काय
इथे सारे
क्रूपया
कमाल
३४
णिराश णका होऊ
+१ सामंतकाकांकडून चिकाटी
In reply to णिराश णका होऊ by टारझन
प्रणव.....आजच वाचली कविता
प्रणवराव, प
धन्यवाद