Skip to main content

बस मी आणि बाळ

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 17/03/2015 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
बसमध्ये धक्के खात उभा होतो आसनस्थ होण्याचा मार्ग शोधत होतो आसनस्थ झाल्यावर खिडकी शोधु लागलो प्रवासात या अपेक्ष्ांचे सामानही बाळगलो सगळ मिळवुनही धक्के लागतच होते सवयीप्रमाणे डोळे सर्वत्र फिरत होते समोरच्या सिटवर बाळाला हसताना पाहिले पण हसण्याचे कारण नाही गवसले अपेक्ष्ांचे सामान त्याच्यासोबत दिसले नाही म्हणुनच हसण्याला कारणही लागले नाही पुढच्या प्रवासातही धक्के बरेच बसले पण गालावरचे हसु तसेच राहिले.
लेखनविषय:

वाचने 1611
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आशयपूर्ण कविता आवडली. सगळ वर अनुस्वार हवा होता. बाकी बाळगलो वरून तुम्ही मरावाड्याकडचे असाल असा अंदाज आहे.

In reply to by शब्दानुज

:-) सोलापुरकरांच्या बोलीभाषेमध्ये मराठवाडी भाषाशैलीचा प्रभाव पूर्वीही अनुभवला आहे.

छान आहे कविता, आवडली.