आर आर पाटलांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नीला आंदण देण्यात आली आहे. आबा पाटलांबद्दल आदर म्हणून बाकी कुठल्याही मोठ्य पक्षाने ती जागा लढवायची नाही असे ठरवले आहे.
हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे का? मागे गोपीनाथ मुंड्यांच्या निधनानंंतर हेच केले गेले.
मयत नेत्याबद्दल आदर असणे योग्यच आहे. पण रिकामी झालेली लोकप्रतिनिधीची जागा भरणे हा त्या नेत्याबद्दल असणार्या आदराचा विषय नसून लोकांचे योग्य प्रतिनिधित्व करण्याचा असला पाहिजे.
लोकशाहीत असे वंशपरंपरेने जवळच्या नातेवाईकाला मग त्याची कुवत असो वा नसो, वारसाहक्क असल्यासारखे देणे हे कितपत योग्य आहे? त्या नेत्याला आदर दाखवणे हे काही अल्प काळापुरते आहे. लोकप्रतिनिधित्व हे पाच वर्षांकरता असते.
माझी खात्री आहे की जर आबांच्या पत्नीविरुद्ध कुणी उभा राहिला तर लोकही भावनेच्या आहारी जाऊन त्याला पाडतील. पण एकंदरीत असा पायंडा पडणे घातक आहे असे मला वाटते.
पाश्चात्य देशात जिथे लोकशाही प्रगल्भ आहे तिथे असे होताना दिसत नाही.
http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/03/14/article526415.ece/BJP…
वाचने
4104
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ हुप्या साहेब,
चहा प्या कपबशीकडे फार लक्ष देऊ नका
In reply to ओ हुप्या साहेब, by जेपी
आता दोनतीन मोठ्या पक्षात
जोपर्यंत मतदारांच्या रक्तातली
खरे आहे
In reply to जोपर्यंत मतदारांच्या रक्तातली by डॉ सुहास म्हात्रे
व्यवहार ?
बापरे!
In reply to व्यवहार ? by hitesh
आबांची पुण्याई
माया
.
In reply to माया by तिमा
People get the leader that
+१११ कारण हे सत्यवचन आहे!!!
In reply to People get the leader that by काळा पहाड
हिताचे नाही - कार्यकर्त्यांवर अन्याय
खरं म्हणजे यात आणखी एक नवाच