काय करावे? धंदा-उद्योग की?
नमस्ते मंडळी. माझ्या "नक्की किती पैसे पुरेसे?" या धाग्यावर ज्या
मिपाकरांनी सल्ले दिले होते त्यांचे मनापासून आभार मानून आज एक नवीन
मुद्दा उपस्थित करत आहे. तर मंडळी सध्या मी कोकणातील घरी निवृत्त जीवन
जगत आहे. जोडीला एम्टीडीसी च्या न्याहरी निवास योजनेमध्ये सहभागी होवून
घरातील काही खोल्याचा वापर पर्यटकांसाठी देवून त्यातून महिन्याला काही
रक्कम उभी राहते. ज्याना या उन्हाळ्यात कोकणात यायचे असेल अशानी जरूर
संपर्क करावा!
तर आमच्याकडे वरील न्याहारी निवास योजने अन्तर्गत काही पाहुणे गेल्या आठवड्यात आले होते . त्यातील एक सुमारे चाळीशीचा दाढीधारी इसम होता . त्याच्याशी चांगलीच मैत्री झाली .त्याने आपली कहाणी सांगितली. सदरहू इसम मूळचा कोकणातील असून गेली 10 वर्षे आफ्रिकेत टेक्निशियन म्हणून कामाला होता. मात्र मागच्याच महिन्यात त्याच्या कंपनीने कामगार कपात केल्याने तो गावी परत आला. येताना सुमारे 15/20 लाख रुपये सेव्हिंग होते . त्याचे मुंबई किंवा अन्य शहरात घर नसून एकटाच आहे. गावी एक जुने घर आंब्याची दोनचार कलमे आहेत .
अशा परिस्थितीत पुढे काय करावे ? असा प्रश्न त्याला पडला होता . परत दुसरी नोकरी शोधून परदेशी जाण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. पण हाताशी असलेल्या पैशात काय करावे ज्यायोगे पुढील आयूष्य चांगले जाईल? कारण तो तर वैतागून आध्यात्मिक संन्यास घेण्यासाठी हिमालयात जाण्याचा विचार करत होता !
चाळीशीत असल्याने लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता किंवा कदाचित आर्थिक परिस्थितिमुले शक्य झाले नसावे, त्याबाबतीत बोलायला फारसा उत्सुक नव्हता . निघताना त्याने त्याचा मोबाइल नंबर आणि पत्ता मला दिला आणि योग्य तो सल्ला द्यावा अशी विनंती केली .
तर मंडळी, त्याने पुढे काय करावे?
1. धंदा /उद्योग ? कोणता?
2. नोकरी ?
3. शेअर्स/इन्व्हेस्त्मेंट ?
4. लग्न करावे का? का करावे?
5. संन्यास /अध्यात्म की अन्य काही ?
आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जोपर्यंत तो सल्ला मागत नाहि
अरेरे
मन रमेल..असा कोणताही व्यवसाय
दाढी
एखादे दूकान टाकावे गावाकडे.
संन्यास/ अध्यात्म हा ऑप्शनल
.
म्हणजे त्यांना बँकेत पैसे
अध्यात्म
.
अध्यात्माची खाज सुटलेले लोक
काउ उर्फ हितेश उर्फ नानासाहेब
.
पन
.
नमस्कार
>>> तर मंडळी, त्याने पुढे काय
मौलीक सल्ला देणा-या हितचंतकांपासून सावध रहावे ....
----- हितचिंतकांपासून ...
बाकी काही करो न करो, लग्न
जमेल तिथे त्याने नोकरि करावी
माझा सल्ला...
एका माणसासाठी, दूसर्
नोकरी म्हणजे ८ तासांचा घंदा
न्यू रसिका निवास न्याहारी केन्द्र
व्य व सा य!!!
दुकान
पैसा होता का तेव्हा
गावी एक जुने घर आंब्याची
अगदी, गावची चकाट्या पिटायची
गावाकडचे घरदार विकावे
त्यांच्याकडे १५/२० लाख
गावाकडचे घरदार
पुण्यातल्या रीअल ईस्टेटचे भाव
सल्ला शक्यतो अनुभवी, कृतीशील,
मासे विक्री
तुम्हालाच सल्ला हवा आहे का?
तुम्हालाच सल्ला हवा आहे का?
पहिला पर्याय
याने काय होणार ? इस्कटून
याने काय होणार ? इस्कटून
जे काही मूळ प्रश्न विचारले आहेत,
ज्योतिषशास्त्र हा बाकी एकदम