काय पण रेट असु दे.
काय पण रेट असू दे?
काय विप्र, पोराला मारताय काय!!!!:)
अहो डोलर कॉस्ट ऍव्हरेजिंग वगैरे ते रेग्युलर मार्केटमध्ये ठीक आहे, पण आत्ताच्या मारकेटमध्ये?
अहो पोरगं व्होलाटिलिटीनेच कफल्लक होईल ना!!!!
घासाघिशिला आपण नाय घाबरत...
पन काय वो ते करताना थुकल तर चालतयं नव्हं ...का की सातारी जर्दा ठासुन भरल्या बिगर दिवस चालु नाय व्ह्त आपला.
बाकी कोळ्णीच टेन्शन नका घेवु ... लय पोचलेल्या कोळ्णींचे फडफड्णारे मासे खाल्ले हाय.. ;)
नाना
आता तुमचं मारकिट, तुमची तमाखू...
जी चाहेस्तवर थुंका....
आमची कायबी हरकत नाय......
हांग अस्स... आता कस्स बोल्लात. नाय तर आपल सारख बोलायाचे
ह्यो भारतात कसा लय थुकतो अन त्यो बघा बाहेर कसा थुकुन थुकी कोटात ठिवतो.... अन काय काय. असो
तुमचा जॉन बॅबिट व्हायचा!!!!
नाय म्हनजे दोस्त म्हनून सल्ला दिला हो, राग मानू नका.....
खि खि खि
अव काही कालजी करु नका.... भारतातल्या कोल्नीला माहित हाय कंचे मासे कापायचे अन कंचे नाय कापायचे ;)
अन तुमचा राग आला तर कस व्हायच आमचं
अजाबात राग नाय
अन तुमी बी मानु नका.
:)
ह्यो भारतात कसा लय थुकतो अन त्यो बघा बाहेर कसा थुकुन थुकी कोटात ठिवतो....
आमी कशाला आस बोलू?
आता पुढच्या येळंला भारतात आलू की तुमी आमाला तुमच्या हातानं पान खिलवा...
मग पघा! तुमची विच्छा आसंल तर आमीबी पचापच थूंकू...
:)
(व्हेन इन रोम, बिहेव्ह लाइक रोमन्स!!!)
थांब रे बाबा जरा
एवढी घाई करु नकोस... बॉटम अजून यायचा आहे...सेन्सेक्स ७५०० ला गेल्यावर सुरु कर... एवढ्यात नको...
अगदी धीर-दम निघत नसेन तर किमान ८००० ची तरी वाट पहा...
बँकींग आणि फायनान्स क्षेत्रात जरा जपूनच हात घाला, कारण मंदीची पहिली तलवार त्यांच्यावरच कोसळते...
रिलायन्स कॅपिटल
एडेलवाईस
कोटक महिन्द्रा बँक
एस.बी.आय.
एचडीएफसी
हे त्यातल्यात्यात कॅपिटल-फायनान्स व बँकींगमधले भंरवशाचे स्टॉक्स आहेत
बाकी दीर्घ मुदतीसाठी आणि चांगल्या लाभासाठी पावर आणि इंजिनिअरींग स्टॉक्स चांगले आहेत.
जसे एल एन्ड टी, पुंज लॉयड, रिलायन्स पावर, एनटीपीसी
सागर
अजुन तळ गाटायला खुप येळ हाय. पुढच्या वर्शाला विलेक्शन हायत. त्यामुळ विकत घ्यायच असल तर मार्च एप्रिल नंतर घेत बस्.अजुन ह्यो पैशाचा घोळ सायबानी घातला हाय तो पुरता कुनालाबी उमगला नाय.पान्यात घान केली की ती वर यायला टैम लागतो लेका. म्हणुन दम धर हळुहळु सगल वर येत हाय. पानी संथ झालं की जाळं फेकाय सुरु कर.पैस गुंतवताना तात्याला ईचार.आजकाल तात्याला लय नट्यानी पैसा वाट्याने गुंतवाय दिलाय ( तो म्हन त्याना त्यातन शेतात घर बांधुन देनार हाय) .तुलाबी त्यो मदत करिल.
वेताळ
प्रतिक्रिया