माझे भ्रंमण संचाचे महिन्याला बील ( देयक) येत असते आणि मी किती पैसे भरायचे हे पाहुन संकेतस्थळाच्या साह्यानेच भरत असतो. यावेळेस नकळतच मी सर्व रकाणे पाहत होतो, उदा. मागचे देयक, भरलेले पैसे, या महिन्याचे देणे, किती तारखेपर्यंत भरावयाला हवे आणि न भरले तर विलंब शुल्क. यात पाहता पाहता माझ्या लक्षात आले की देयक ४०० रुपये होते आणि विलंब शुल्क १०० रु जास्त असे दाखवलेले होते.
सहज सहज हिशोब करता लक्षात आले की अंदाजे २० % विलंब शुल्क म्हणून लावलेले होते, पूर्वीही वीज देणे / दूरध्वनी चे देयक रु.१५० असेल तर ५ / ७ रु विलंब शुल्क असे.
मोबाईल कंपन्या इतके विलंब शुल्क कसे लावु शकतात याचाच मला अचंबा वाटत आहे. यावर सरकारी / ग्राहक समितीचे काही नियंत्रण इत्यादी आहे काय?
मी त्यांच्या ग्राहक सेवेला याबद्दल लिहिणार आहेच, परंतु मिपावर याचा परामर्ष असावा म्हणून हा लेखप्रपंच.
याद्या
2955
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
विलंब शुल्क कमीतकमी शंभर रू
काळ
माई आहेत..! माई आहेत..!!
म्हणून प्रिपेड वापरणे लई भारी
कस्ट्मर केअर ला फोन करा अनि नम्बर पोट्रेबिलिटि बद्दल विचारा