नमस्कार मंडळी,
थोड्या दिवसांपूर्वी (बहुतेक मोदक) यांनी बॅंक आणि इतर वित्तीस संस्था, आर्थिक फसवणूका अशा संदर्भात धागा काढला होता. सध्या मी पण अशीच एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वित्तीय व्यवहारांची जास्त खोलात माहिती नसल्याने आणि सध्या स्वतः भारतात नसण्याने मर्यादा येत आहेत तेव्हा जाणकारांच्याकडून मदतीची अपेक्षा.
तर घडले ते असे,
1.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, माझ्या वडिलांनी विसासाठी युके विसा ऑफिसला अर्जासाठी केलेले transaction बरोबर होते (online bank transfer), आणि ते रद्द करून रिफंड मागितला. विसा ऑफिसनेही तो मान्य केला आणि रिफंड पाठवला आहे म्हणून मेल पाठवला.
2.त्यानंतर बँकेत पैसे आले नाहीत म्हणून विसा ऑफिसला संपर्क केल्यावर त्यांनी ARN (Acquirer's Reference Number) नंबर दिला आणि बँकेला ट्रेस करायला सांगा म्हणून सांगितले.
3.बँक (एसबीआय) म्हणे त्यांना ARN नंबर काय आहे तेच माहीत नाही (गूगलून मिळालेली माहिती खाली लिहितो), तर विसा ऑफिस म्हणे आम्ही यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही. असा आठएक महिने बँक आणि विसा ऑफिस यांच्यामध्ये टोलवाटोलवीचा खेळ सुरू होता ( मध्ये आम्ही दोन्हीकडे इमेलवर! ).
4.विसा ऑफिसने 'worldpay' म्हणून एक पेमेंट गेट्वे सर्विस वापरली आहे. अर्थात मी त्याना काही विचारु शकत नाही कारण माझा त्यांच्याशी("worldpay") थेट व्यवहार झालेला नाही. त्यांनी ('worldpay' ने) विसा ऑफिसला 'refunded' म्हणून स्टेटस पाठवले आहे जे की त्यांनी आम्हाला पाठवले आहे. पण ते विवरण 'पैसे पोचले' एवढेच सांगतेय (आणि त्याव्यतिरिक्त काहीही कन्फर्म करत नाही). या "worldpay" च्या या (पीडीएफ आहे) संस्थळानुसार "पैसे पोचले" म्हणजे ज्या (क्रेडिट्/डेबिट) कार्डवरून पैसे आले त्या कार्डला परत पोचले.
5.आता बँकच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत म्हणून बँकेच्या मागे लागल्यावर त्यांनी मुंबई तसेच कोलकाता ऑफिसेस ना संपर्क करायला सांगितला, त्यांच्या मुम्बई तसेच कोलकाता ऑफिसपर्यंत इमेल केला पण त्यांचे म्हणणे "पैसे आमच्याकडे आलेले नाहीत तर आम्ही काय सांगणार".
6.त्यानंतर विसा ऑफिसच्या युके हेड-ऑफिसला संपर्क केला, त्यांनी चौकशी करतो म्हणून सांगितले पण शेवटी २० दिवसांनतर त्यांनीही पैसे आमच्याकडून तुमच्या ज्या कार्डवरुन आलेत त्या कार्डवर परत पाठवलेत आणि यापेक्षा आम्ही जास्त काही चौकशी करु शकत नाही म्हणून रिप्लाय दिलाय.
7.मध्यंतरी सातार्यातल्या ग्राहक न्यायालयाच्या ऑफिसात जावून चौकशी केल्यास कळाले की आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला (पक्षी: माझ्या वडिलांना) न्यायालयात तारखेस यावे लागेल. माझे वडील सातारा शहरापासून दूर आणि वयस्क असल्याने त्यांनी त्या साडे-आठ हजारावर पाणी सोडायचे ठरवले आहे कारण तारखा करणे त्यांना (आणि घरातल्या कोणालाच) शक्य नाही.
पण मला ही फसवणूकीची जाणीव स्वस्थ बसू देत नाही (आणि पांढर्या पैशाचे नक्की काय झाले ही उत्सुकता आहेच) म्हणून मी इमेलवर शक्य तेवढ्या रस्त्यांनी शोधतो आहे.
एकंदरीत एक वर्ष होत आले तरी या प्रकारात पैसे कोठे आहेत, ते कळत नाहीये आणि याचा पाठपुरावा कसा करावा याची जास्त माहीती माझ्या हातात येत नाहीये.
कोणाला काही माहिती असल्यास मदत करावी, धन्यवाद. अधिक व्यक्तिगत माहितीची गरज असेल तर व्यनि केलात तरी चालेल परंतु सगळ्यांना उपयोग म्हणून इथे चर्चा झालेली आवडेल.
माझ्याकडची अजून माहिती :
(या माहितीची लिंक आत्ता माझ्याजवळ नाहीये.)
ARN :
The ARN is an 'Acquirer's Reference Number'. These are used quite a lot, especially when payments are sent by recrediting a card. If you can get hold of the department at your bank which deals with chargebacks or disputed payments, they should be familiar with ARNs and be aware of how to track your payment using one, and confirm exactly which entry in your account is the payment in question.
त्याचबरोबर, एसबीआय बँकच्या कोणाला याबद्दल काहीच माहिती नाही याचे जरा आश्चर्य वाटतेय.
वाचने
10672
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनपेक्षित
व्हिसा मनी ट्रान्स्फर
माफ करा
In reply to व्हिसा मनी ट्रान्स्फर by अस्वस्थामा
यात काहीतरी मोठा घोटाळा असू
एक शंका आहे न.नि., हे
In reply to यात काहीतरी मोठा घोटाळा असू by नगरीनिरंजन
हे प्रकरण येईल असा अंदाज आहे
In reply to एक शंका आहे न.नि., हे by हाडक्या
ओम्बुडसमन ला संपर्क करुन
In reply to हे प्रकरण येईल असा अंदाज आहे by श्रीरंग_जोशी
पैसे क्रेडिट कार्डने भरले
In reply to एक शंका आहे न.नि., हे by हाडक्या
हो, डेबिट कार्डवरुनच दिले
In reply to पैसे क्रेडिट कार्डने भरले by नगरीनिरंजन
वर्ल्डपे जर पैसे पाठविले
कसे चेक करणार ? बँक म्हणे
In reply to वर्ल्डपे जर पैसे पाठविले by रामपुरी
CNBC आवाज
तुम्ही एस.बी.आय. च्या ब्रांच
एस बी आय च्या वरिष्ठ अधिकार्यांचे ईमेल्स.
धन्यवाद मित्र हो.. अखेर एका
अभिनंदन अन आभार
In reply to धन्यवाद मित्र हो.. अखेर एका by अस्वस्थामा
पैसे परत मिळाल्याबद्दल
+१
In reply to पैसे परत मिळाल्याबद्दल by अजया
सर्वांचे धन्यवाद..! :)
चला, तुमचे पैसे परत मिळाले