Skip to main content

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग २ - विचारमंथन

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग २ - विचारमंथन

Published on मंगळवार, 10/03/2015
पहिला भाग इकडे वाचा. http://www.misalpav.com/node/30677 विचारमंथन ह्या भागाला मी विचारमंथन म्हणतो कारण यात अनेक विचार आहेत –बहुतेक माझ्या डोक्यातले आणि काही मला “वाटलेले “ आणि हे करायला फारसा वेळ नव्हता . कारण आम्ही बोलत होतो –माझ्या आणि तिच्या कामाबद्दल , घरच्या बद्दल ... त्यामुळे मी काय मागवावे असा प्रश्न पडला. आता माझा मेंदू overclocking mode मध्ये सुरु झाला. जसे कि इंसेप्षन चित्रपटातील स्वप्न . अभियांत्रिकी आणि नंतर व्यवस्थापन केल्याने मी काय विचार आले ते मुद्देसूद मांडू इच्छितो. १) मुलगी पिते – मी तिला ठीक वाटतो आणि माझ्या बायो डाटा मध्ये वाचल्याने आणि ती कुल असल्याने cocktail मागवले. २) मुलगी पिते – मी तिला ठीक वाटत नाही ....पण माझी परीक्षा बघण्यासाठी cocktail मागवले. ३) मुलगी पित नाही. मी तिला ठीक वाटत नाही ....पण माझी परीक्षा बघण्यासाठी cocktail मागवले. ४) मुलगी पित नाही. माझ्याबद्दल काहीही ग्रह नाही – चांगला किंवा वाईट – पण मग cocktail का मागवले?? आणि म्हणून ४ ब ) काहीतरी गडबड आहे. पण मला लगेच काहीतरी मागवायचे होते ,आणि माझ्याकडे मेनू आल्यावर मद्याच्या किमती बघून डोळे फिरले... मी काहीएक विचार केला आणि फ्रेश लिंबू सोडा मागवला...... “ Screwdriver for mam and fresh lime soda for you sir ?” वेटर ने गोंधळून विचारले.... मला माहित होते के चेहर्यावरून मी “तयारीचा “ दिसतोय ..... दोघांनी हो म्हटले .. आता तुम्ही विचारात पडला आसल कि का ? का ?का मी दारू मागवली नाही ? कारण काहीतरी चुकतेय हे वाटत होते ....जसे कि मुलगी फारच साधी वाटत होती – पारंपारिक साधा पंजाबी ड्रेस आणि चप्पल . आणि स्वत: थोडा काळ दुबईत राहिल्याने आणि fashion conscious आल्याने profiling करायची सवय लागली होती. घड्याळ अगदी साधे ,साधा फोन आणि साधी पर्स...पर्स स्त्री बद्दल बरेच सांगते. मला स्वताला कपड्यांची आणि accessories ची त्यावेळी आवड असल्याने – मला मीटिंग मध्ये घड्याळ आणि पेन बघायची सवय होतिच. आणि या मुली बद्दल काहीतरी बरोबर वाटत नवते . आणि ते भयंकर दर ..मुली बघताना बिल हे मुलगाच देतो .. त्यामुळे आधी बर्याचदा फटके खायचा अनुभव होता. मी विचार केला कि जर वेव्हलेंग्थ जुळली आणि मुलगी तयारीची निघाली तर अजून मस्त ९० मिली व्होडका मागवू आणि आपलेच कडक cocktail बनवू ! आणि दारुडे दारूड्यांना ओळखतात ( असे माझ्या माताजी म्हणतात ) पण खरेच बर्याच ठिकाणी मला अनोळखी लोकांनी “पितो का?” म्हणून विचारले नाही तर “ बर्फ कि पाणी कि निट ? “ “ आज विस्की नाही तर रम चालेल न? “ “ बार उघडला आहे , चालूया नाही तर गर्दी होते” असे सांगितले .. मला कधीच एकट्याने मुलीबरोबर पिण्याचा प्रसंग आला नवता त्यामुळे या मुली बद्दल काहीच सांगू शकत नव्हतो. आमचे बोलणे चालू होते .नेहमीप्रमाणे मुलीला सेल्स आणि मार्केटिंग च्या कामाबद्दल काही माहित नवते. तसेच आवडी निवडी टिपिकल होत्या – म्हणजे बायकी मालिका , स्वयंपाक आणि पुढचे खरेच आठवत नाही. दारू या विषयावर काहीच चर्चा होत नव्हती , पण मला वाटू लागले कि हिचे बाहेरील रूप असे असले तरी हि पीत असावी . आणि मला त्यावेळी तिचा हा सहजता ,कुलनेस आवडू लागला. आणि माझा कल्पनेचा वारू मनात उधळला ! “ अग ती मागच्या शनिवारी आणलेली JD कोठे गेली ?” “ अरे थोडीशी उरली होती ती मी संपवली “ - ती “ आणि ती बकार्डी सफेद ?” “ अरे ती तर केवाच .... ती नाही का मी वेगवेगळी cocktail केली होती – cocktail च्या क्लास ला जाऊन आल्यावर ? तू नाय का टाइट झाला होतास ? ” - ती “ आता काय ?” “ अरे धीर धर ... जरा मला भजी आणि चकणा बनवू दे ,मग मी मस्त बेलिस आयरिश क्रीम विथ कुल्फी बनवते ...... बाहेर जाण्याऐवजी आपण घरीच बसू. “- ती असे संवाद मनात रुंजी घालू लागले. बरच वेळ झाला तरी ऑर्डर येत नव्हती ... आणि दोन जण येताना दिसले .... वेटर आणि कॅप्टन ... आणि कॅप्टन ने नम्र पणे विचारले “ Mam will you have screwdriver with vodka or white rum?” ……….. क्रमशः – अंतिम भाग ३ – सुखांत ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4822
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे. डोक्यातले विचारचक्र शब्दांत परिणामकारकपणे उतरले आहेत. वातावरणनिर्मिती व्यवस्थित झालेली आहे. पुभाप्र.

>>“ Mam will you have screwdriver with vodka or white rum?” ………..>> भारीच हां.. अब आयेगा मजा!!

In reply to by एस

वाचतोय. लवकर टाका पुढचा भाग.

In reply to by चाणक्य

पुढला भाग लवकर टाका.

ची आणि accessories ची त्यावेळी आवड असल्याने – मला मीटिंग मध्ये घड्याळ आणि पेन बघायची सवय होतिच.
हम्म्म्म्म्म्म....

पुधचा भाग लवकर येउ द्या!

मस्त लिहिलय. मला तर अजुण काही अनुभव नाहिये ह्या गोष्टिंचा पण तुमच्या लेखान्मुळे knowledge मिळतय. आशा करतो की पुढे फायदा होइल.

पुभाप्र.पुढे काय झालं त्याची जाम उत्सुकता आहे

गुगल नसतं तर अवघड होतं याचा (लेखाचा!) आस्वाद घेणं. पण त्यानिमित्ताने बरेच नवीन शब्द कळतायत. आज आता जेडी (-अर्थ!) बघितला. "आपण घरीच बसू.." यावर रोफ्ल...

ऐसाभी होता है ?

पुभाप्र, स्वाती