आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग १
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !!
माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.
आशाच येका मुली ला भेटायला मी अंधेरी लिंकिंग रोड वर संध्याकाळी गेलो होतो. Profile तर बरी वाट होती. मुलगी इंजिनीअर असून एका चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होती. अंधेरी लिंकिंग रोड वर मी त्यावेळी गोरेगावात राहत असून २-३ वर्षांनी जात असल्याने तो मला बराच बदललेला आणि चकचकीत वाटता होता. इतक्यात ती मुलगी आली – नव्हे तिला तिच्या घरच्यांनी गाडीतून सोडले.माझ्याकडे त्यावेळी गाडी नसल्याने बरे वाटले.
सुरुवातीचे हाय हलो झाल्यावर तिच्या सूचनेनुसार आम्ही येका posh restaurant मध्ये गेलो . डेकोर फारच सुन्दर होता आणि ...........संद्याकाळी ७ वाजता आम्ही दोघे सोडून कोणी नव्हतो. आमची सर्वसाधारण चर्चा चालू होती . आणि इतक्यात वेटर आला... सभ्य संस्कारानुसार ( Manners ) मी मेनू तिचाकडे दिला. “ Dont want to eat .” कोठल्याही शिकलेल्या मुलीप्रमाणे ती मध्ये मध्ये विन्ग्रेजी फडत होती. तिने झटकन मेनू बघितला.
“Screwdriver please !” ती शांत पणे म्हणाली . आणि माझी धडधड वाढली....
आता थोडे माझ्या पिण्या बद्दल ..त्यावेळी मी माझ्या वयाचा जेव्हडा पितो तेवडा प्यायचो ..झेपेल तेवडी आणि कोणाला पत्ता न लागता घरी जायचो. तसे मी लग्नाच्या बायो डाटा मध्ये “ Enjoy ड्रिंकिंग” लिहिले होते आणि माताजींचा प्रचंड ओरडा खाला होता . ( तिला मी पितो हे माहित नवते – होल्स झिंदाबाद!) ..त्यामुळे काही मित्र गमतीने बोलायचे कि सर्वसाधारण कांदे पोहे चहा पेक्षा दारू चकणा झाले पाहिजे म्हणजे सर्व कसे ओपन होतील...
पण इकडे मुलगी कडक cocktail मागत होती आणि माझ्या .......... मी गोंधळलो .... येक मन सांगत होते कि मुलगी “तयारीची” आहे आणि खूष झालो. दुसरे सांगत होते कि ती माझी परीक्षा घेतेय. तिसरे सांगत होते कि काहीतरी गडबड आहे.अजून एकदा वाटले कि हिला मला नापसंद करायचे आही आणि म्हणून अति stylish वागतेय ( होय हा हि अनुभव आला होता.) मी काय मागवावे – व्हीस्की कि cocktail ?? आणि व्यवहारी मन दारूचे दर बघून घाबरत होते .........
प्रतिक्रिया
रोचक सुरुवात
+१
जबरी! पुढे काय झालं?
अल्कोहोलभरल्या पोटात
लिहा हो पुढे काय झालं ते!
पटकन आटोपलात लेख अन मग पुढे?
पुढे काय झाल याची उत्सुकता
मग पुढे?
पुढे?
स्क्र्यु ड्रायव्हर आणि होल्स
ते होल्स नसून हॉल्स (च्या
असा अंदाज आहे. हॉल्सनी दारूचा
हां...हे बरूबर वाट्टंय...पन
गंगा-जमनाच एका प्रकारचं. फक्त
कॉकटेल
ठँक्यु बरं का अन्या दातार शेठ
Halls च.
या कांटेक्स्टमध्ये 'तीर्थ'रूप
:))
हायला ध्यानमेचं नै आया....
ओ हे काय?
पुढे काय?
सहीच! स्क्रूड्रायव्हरची
आहे... अजून २ ते ३ भाग बाकि आहेत
चायला बघण्याच्या कार्यक्रमाला
हा हा हा मजेशीर अनुभव !
काटा किर्र!
.