तिरामिसु हे एक सर्वांचे आवडते इटालियन डेझर्ट.. तिरामिसु चा अर्थ 'पिक मी अप' ..आणि खरंचच तिरामिसु पाहिले की त्याला पिक करायचा अनिवार मोह (वाढत्या वजनाची,साखरेची तमा न बाळगता )होतोच,
ह्या वेळी नेहमीच्या तिरामिसुत थोडा बदल केला आणि एक अफलातून तिरामिसु व्हर्जन जन्माला आले.. :)
तर हे ऑरेंज तिरामिसु खास तुमच्यासाठी-
साहित्य-
अर्धी ते पाउण वाटी साखर, २ अंडी
१६ ते १८ लॉफेल बिस्किटे( तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे)
ही मिळाली नाहीत तर पार्ले जी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या .लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे अर्धी वाटी साखर पुरते.
२५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज किवा फ्रेश क्रिम व्हिप करुन घ्या.
१/२ पेला ऑरेंज ज्यूस किवा रसना /टँग ऑरेंज सरबत बिस्किटे भिजवण्यासाठी.
ऑरेंज लिक्युअर किवा काँन्त्रु २ चमचे
टँग सरबताची पावडर २ चहाचे चमचे किवा ऑरेंज इसेन्स
ऑरेंज/मांडारिन टिन तो नसेल तर फ्रेश संत्री २/३
कॅरेमल सिरप सजावटीसाठी (ऑप्शनल)
एक चौकोनी ट्रे.
कृती-
टिनमधील संत्री चाळणीवर टाकून पाक निथळू द्या.
अंड्यातील पिवळे व पांढरे वेगळे करा व पांढरे हार्ड पिक्स येईपर्यंत बिट करा व बाजूला ठेवा.
अंड्यातील पिवळ्यात साखर घालून इतके फेटा की त्याचा ऑफ व्हाइट रंग होईल.
नंतर मस्कार्पोन चीज घालून फेटा.
निथळत ठेवलेल्या संत्र्यातील साधारण अर्धी वाटी संत्री व टँग पावडर त्यात घाला व फेटा.
सर्वात शेवटी अंड्यातील पांढरे (जे हार्ड पिक्स आणून बाजूला ठेवले आहे ते) घालून एकसारखे करा.
ऑरेंज ज्यूस मध्ये चमचाभर ऑरेंज लिक्युअर मिसळा.
लॉफेल बिस्किटे ट्रे मध्ये एकापुढे एक ठेवा, आणि त्यावर चमच्याने हळूहळू ऑरेंज ज्यूस घाला.बिस्किटे तो ज्यूस शोषून घेतील.
आता ह्या लेअर वर ऑरेंज+ मस्कारपोन चीजच्या मिश्रणाचा एक थर देऊन बिस्किटे झाकून टाका.
पुन्हा बिस्किटांचा एक थर लावा, ज्यूस घाला व त्यावर परत ऑरेंज+ मस्कारपोन चीजच्या मिश्रणाचा थर द्या.
बिस्किटे- क्रिम- बिस्किटे -क्रिम असे ४ किवा ६ थर एकावर एक येतील.
सर्वात वर मस्कारपोन चीजचा थर येऊ द्या.
फ्रिजमध्ये ६ ते ८ तास सेट करायला ठेवा. तिरामिसु थंड झाल्यावर घट्ट झालेले दिसेल.
टिनमधील संत्र्याच्या उरलेल्या फोडी + कॅरेमल सिरपने सजवा.(किवा तुमची कल्पनाशकी लढवून हवे तसे सजवा)
थंडगार सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
6 Mar 2015 - 5:52 pm | झकास
तों पा सु
6 Mar 2015 - 5:53 pm | तुषार काळभोर
आह.....
वाह!!!!
स्लर्प, स्लर्प...
6 Mar 2015 - 5:54 pm | तुषार काळभोर
शेवटून दुसरा फोटो अगदी तिरामिसु
6 Mar 2015 - 5:59 pm | मोहनराव
तोंपासु.
6 Mar 2015 - 6:20 pm | रेवती
खरा तिरामिसू!
ऑरेंज प्रकार नवीन वाटतोय.
शेवटचे दोन्ही फोटू माझे! ;)
6 Mar 2015 - 7:34 pm | यशोधरा
आणि त्या फोटोंमधील तिरमिसु माझे! =))
7 Mar 2015 - 5:52 am | रेवती
तू माझी!
6 Mar 2015 - 6:26 pm | इशा१२३
तोपासु...
6 Mar 2015 - 6:30 pm | सामान्य वाचक
भारी ग स्वाती
पुढच्या भारत वारित १ दिवस क्लास घे
6 Mar 2015 - 6:34 pm | सुहास झेले
खपल्या गेलो आहे !!!
6 Mar 2015 - 6:46 pm | जुइ
:)
6 Mar 2015 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटुन दुसय्रा फ़ोटुत उडी मारल्या गेली आहे.
7 Mar 2015 - 4:13 pm | स्वप्नांची राणी
ओ..वाटून घेऊन खाल्ल असतं ना, ऊडी काय मारता लगेच...(चिडचीड..राग..)
7 Mar 2015 - 8:10 pm | अत्रुप्त आत्मा
अज्जुन संपलं नाही! (ह्ही ह्ही! :-D ) तुमचा वाटा शिल्लक ठेवलाय,
तस्मात्.. या ना आत... उडी मारून आपणंहि! :P
6 Mar 2015 - 7:59 pm | मधुरा देशपांडे
खल्ल्लास. आलेच खायला.
6 Mar 2015 - 8:09 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुन्दर
6 Mar 2015 - 8:17 pm | सानिकास्वप्निल
सिट्रस फ्लेव्हर असलेले डिझर्ट अतिशय आवडतं, आॅरेंज तिरामिसू जबरी दिसत आहे :)
फोटो बघून खल्लास.
6 Mar 2015 - 8:59 pm | स्वाती२
मस्त फोटो!
6 Mar 2015 - 10:23 pm | पियुशा
Khaple mi foto pahun !
6 Mar 2015 - 10:45 pm | एस
छे:! लोक काहीही बनवतात आजकाल. आणि वर मिपावरपण टाकतात. अशा पाकृ पाहून काय वाटते हे काय सांगावे! ;-)
7 Mar 2015 - 2:21 am | मयुरा गुप्ते
वेगळीच रेसिपी.
--मयुरा.
7 Mar 2015 - 7:33 am | अजया
अहाहा!खल्लास पाकृ.करुन पहाणार.नक्की.
17 Mar 2015 - 2:09 pm | आरोही
असेच म्हणते !!मस्त !!
7 Mar 2015 - 1:01 pm | सुचेता
अंडे न घालता करता यावे काय?
7 Mar 2015 - 3:25 pm | स्वाती राजेश
ऑरेंज घालुन नक्की करुन पाहीन...
रेसिपी मस्त...
7 Mar 2015 - 6:32 pm | पिंगू
नेहमीप्रमाणेच अफलातून.. मँगो तिरामिसुची आठवण आली..
7 Mar 2015 - 10:24 pm | मदनबाण
आह्हाह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }
8 Mar 2015 - 5:28 am | स्रुजा
अप्रतिम !! माझ्या संग्रही असलेले सगळे कौतुकाचे शब्द इथे भराभरा ओतते आहे, इमॅजिन करून घे :)
10 Mar 2015 - 12:03 am | दिपक.कुवेत
शेवटून दुसरा फोटो फारच आवडल्या गेल्या आहे.
24 Apr 2015 - 12:38 am | तळ्यात मळ्यात
असे फोटो बघितल्यावर डाएट गेलं खड्ड्यात असं होतं हो!