आमच्या विवाहाची कहाणी
आमच्या विवाहाची कहाणी
ता क -- यात कोणतीही अतिशयोक्ती नाही किंवा सनसनाटी घटना, उत्कंठावर्धक असे काव्य असे काहीच नाही.
म्हणजे झाले असे कि मी लष्करात( नौदलात) डॉक्टर म्हणून विक्रांत या जहाजावर तैनात होतो. वय वर्षे २५(१९९० ची गोष्ट). मुळात आमच्या आईचे म्हणणे असे होते कि घरापासून लांब राहणार तेंव्हा वेळेत लग्न झालेले बरे. पण मला एक, एक वर्षाने मोठा भाऊ( इंजनेर) आहे. आणी त्याचे नुकतेच लग्न झाले होते म्हणजे पाच वर्षे नोकरी करून झाल्यावर धंदा चालू केलेला होता आणि नोकरी सोडण्या अगोदर लग्न केलेले बरे अशा विचाराने त्याचे २६ व्या वर्षी लग्न केले. ( मराठी माणसात धंदा करणाऱ्या मुलास तेंव्हा जास्त कठीण होते)
म्हणजे आता आमचा मार्ग मोकळा होता असे सर्व नातेवाईकांचे म्हणणे होते
आईच्या भाषेत एकदा का तुला तुझ्या बायकोच्या पदरात टाकले कि आम्ही जबाबदारीतून मोकळे. आई वडिलांचे अगोदरच विचारून झालेलं होते कि तुझी कोणी "तशी"मैत्रीण आहे काय? दुर्दैवाने तशी कोणी मैत्रीण मला सापडलेली नव्हती. म्हणजे असे झाले कि कॉलेजात एखादी सुंदर मुलगी दिसावी आणि लगेच कळावे कि ती अगोदरच बुक आहे. म्हणजे मग पुढे काही करायलाच नको. काही मुलीनी माझ्यात थोडाफार "रस" दाखवला होता. पण त्यात मला "रस" वाटला नव्हताऽ अशी साडेपाच वर्षे ( एम बी बी एस ची) कोरडीच गेली. (म्हणजे ज्या चांगल्या मुली होत्या त्याना आपल्या मित्रांबरोबर फिरताना पाहून नुसतेच सुस्कारे सोडण्यात)
पण अजून लग्नाची माझी मानसिक तयारी नव्हती. आणि नौदलाच्या गोदीत हिरवळ असायचा संबंधच नव्हता. सगळीकडे फक्त जय हनुमान.
म्हणजे मी नुसताच उंडारत होतो असे नाही परंतु पुढच्या वर्षी होणार्या (मे १९९१ मध्ये) पदव्युत्तर परीक्षेच्या प्रवेश परीक्षेची तयारी करीत होतो. तेंव्हा त्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी उगाच मुली पाहणे इ च्या व्यापात पडण्याच्या विरुद्ध होतो. तशा मधून मधून आईकडे मुली सांगून येत होत्या. मी विक्रांतवर राहत होतो आणि जेंव्हा घरी यायचो तेंव्हा त्याबद्दल बोलणे होत असे. मी ते कानाआड टाकत होतो. वडिलांना एकदा सांगितले होते कि हि परीक्षा झाल्याशिवाय मी तो विचार करणार नाही. त्यामुळे त्यांनी तो विषय काढला नव्हता. होता होता माझी परीक्षा झाली आणि दुसर्या दिवशी वडिलांनी विचारले कि आता मुली पहायच्या का? मी त्यांना म्हटले कि अहो अजून निकाल तरी येउद्या. ७५० पैकी फक्त ६० लोकांना एम डी/ एम एस ला प्रवेश मिळत असे. आणि आता तुमच्या स्पर्धेत सगळे डॉक्टरच होते. त्यामुळे चुरस खूप होती. चार महिन्यानी निकाल आला आणि सुदैवाने माझे नाव गुणवत्ता यादीत बरेच वर होते. त्यामुळे आता एम डी ला प्रवेश नक्की होता. हा निकाल ऐकल्यावर अभिनंदन झाल्यावर परत वडिलांनी लगेच विचारले कि आता पाहायला सुरुवात करायची का? आता मी त्यांना सांगितले अहो जरा माझा अभ्याक्रम सुरु तर होऊ दे. म्हणजे काय माझी अजून लग्नासाठी मानसिक तयारी झालेली नव्हती. पुढे तीन महिन्यांनी (डिसेंबर ९१) मी पुण्याच्या ए एफ एम सी मध्ये एम डी (रेडियॉलॉजि) साठी रुजू झालो. तेथे दोन महिन्यांनी पहिली परीक्षा झाली त्यात मी व्यवस्थित पास झालो. ( आमच्या वेळेस या परीक्षेत नापास झाल्यास हा उमेदवार एम डी करण्यास लायक नाही असे विद्यापीठास कळवून त्याचे रजिस्ट्रेशन रद्दबातल करीत असत). त्यानंतर मी मानसिक दृष्ट्या थोडा विश्राम झालो. दुर्दैवाने एम डी/एम एस साठी आलेल्या मुलींपैकी एकही मला "तशी" वाटली नाही आणि वडिलांना कळवले कि आता मुली पाहायला हरकत नाही.
मग आता आमच्या घरी मुलगी कशी पाहिजे यावर सविस्तर चर्चा झाली. मला एकतर उच्च शिक्षित मुलगी हवी होती. म्हणजे शाळा आणि लग्न यामध्ये वेळ घालवण्यासाठी कॉलेजला जाणार्या मुलींपैकी नको होती. याचे कारण मी एम डी होणार माझा भाऊ विद्युत अभियंता, वहिनी संगणक अभियंती, आई आणि वडील त्रिपदवीधर मग मुलगी कमी शिकलेली असती तर तिला न्यूनगंड येण्याची शक्यता म्हणून तसे नको. आयुर्वेदिक किंवा होमिओपथि ची डॉक्टर नको कारण मी बदलीच्या नोकरी मुले इकडून तिकडे फिरणार मग तिला तिथे नोकरी मिळणे कठीण आणि व्यवसाय सुरु करून तीन वर्षात हलवणे पण अशक्य. माझ्या स्वतःच्या अपेक्षा मुलगी सुंदर असावी आणि केस लांब असावेत. ( मी स्वतः तसा दिसायला "बरा" आहे हे माझ्या मैत्रिणींकडून "समजलेले" होतेच) शिवाय माझे एक म्हणणे होते कि वयाच्या २५ व्या वर्षी जर तुम्ही दिसायला चांगले नसाल तर ते तुमचे दुर्दैव आहे पण तुमची बायको/नवरा दिसायला चांगला नसेल तर तो तुमचा बावळटपणा आहे. त्यातून आई वडील दोघे उच्च शिक्षित, भाऊ आणि वहिनी इंजिनियर भावाला चांगली नोकरी होती वडिलांनी वाशीला एक दुसरे छोटेसे घर घेऊन ठेवलेले होते. माझ्यावर जबाबदारी काहीच नव्हती. सरकारी नोकरी ५८ व्या वर्षापर्यंत नक्की. शिवाय लष्करात असल्यामुळे मोठ्या घरात नोकर चाकर राजाराणीचा संसार (सासू रोज रोज डोक्याशी कटकट करायला नाही). या सगळ्या गोष्टी कागदांवर लिहून मी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. आईने मोठ्या उत्साहाने हि माहिती दोन तीन वधुवर सुचक मंडळात लिहिली आणि तिच्या महिला मंडळात जाहीर केली. त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हते. आणि संपर्कासाठी क्रमांक आमच्या घरचा होता. वरील माहिती घेऊन मी पुण्याच्या रोहिणी या मासिकाकडे गेलो. आणि मला अशी बायको पाहिजे असे लिहून दिलेले होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा छापून आले तेंव्हा मुलाचे वडील असे म्हणतात कि मुलाला स्वतंत्र संसार करण्याची हिम्मत असलेली बायको पाहिजे इ इ.
मी त्या मासिकाच्या संपादिका होत्या त्यांना धारेवर धरले आणि सांगितले माझ्या ताजमहालाला तुमची वीट लावायला कुणी सांगितले होते. त्या म्हणाल्या अहो अशी पद्धत असते. मी म्हटले पद्धत गेली खड्ड्यात, पैसे मी दिले कि माझ्या वडिलांनी. तुम्हाला असा दीड शहाणपणा करायला कुणी सांगितले होते. जर माझे माझ्या वडिलांशी पटत नसते तर काय करणार होतात. आता मला पैसे परत करा. त्यानी पहिल्यांदा पुणेरी शहाणपणा करायचा प्रयत्न केला परंतु मी पण पुण्यात ६ वर्षे काढलेली होती त्यामुळे त्यांना मुळीच भिक घातली नाही. त्यांना स्पष्ट सुनावले हा असा आगाउपणा दुसर्या माणसाच्या बाबतीत करू नका.
एक (आईची) मैत्रीण आईच्या मागे लागली होती माझी म्हणून नव्हे पण मुलगी खरच सुंदर आहे तुम्ही बघून तर घ्या. मुलगी बी ए झालेली.आईने त्यांना मुलगा नाही म्हणतो कारण त्याला डॉक्टर बायको हवी आहे असे सांगून नकार दिला.
असे करता करता. एका मुलीचे स्थळ आले ती डॉक्टरच होती आणि औरंगाबादला एम डी करत होती. तिचा चुलत भाऊ माझ्या भावाच्या वर्गात होता आणि काकू आमच्या आईची मैत्रीण. पारंपारिक पद्धतीने मुली पाहणे इ गोष्टीना माझा विरोध होता. त्यामुळे बर्याच चर्चे नंतर पुणे येथे सारसबाग स्थळी गणपती मंदिरात एका रविवारी संध्याकाळी एकमेकांना(आई बापासकट) भेटण्याचा कार्यक्रम ठरला.
ठरल्याप्रमाणे मी आणि आमचे आईवडील तेथे गेलो. लष्करी वेळेप्रमाणे मी सहाला पाच मिनिटे कमी असताना तेथे हजर झालो. आणि आम्ही तेथे वाट पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटांनी एक मध्यम वयीन गृहस्थ त्यांची पत्नी आणि पत्नीची लहान दिसणारी बहिण तेथे आले. नमस्कार चमत्कार झाले आणि मला कळले कि ती त्या बाईंची बहिण नसून लग्नाची मुलगी आहे. मुलगी जरा सुदृढ होती त्यातून जरीची साडी नेसल्याने अजूनच आडवी दिसत होती. हे दिसल्यावर आम्ही अवाक झालो. अर्धा तास तुम्ही काय करता आम्ही काय करतो मुलगा काय करणार मग मुलीला काय करता येईल असे बरेच वायफळ बोलणे झाल्यावर आम्ही कळवू असे सांगून निरोप घेतला. यात मी एक गोष्ट शिकलो. आपल्याला मुलगी( किंवा मुलगा) पसंत नाही, त्याच्याशी (तिच्याशी) जमणे नाही हे पटकन समजते. मुलगी( मुलगा) पसंत आहे हे ठरवणे बरेच कठीण आहे ते पुढे येईलच. मुलगी पाहणे हा कार्यक्रम पहिले काही अनुभव येईपर्यंत उगाच रंजक असेल असे वाटते पण नंतर त्याचा फार कंटाळा येतो. एक तर आलेल्या मुलीला "तशा" नजरेने पहायचे आहे हे डोक्यात ठेवावे लागते आणि त्यामुळे वागण्या बोलण्यात एक विचित्र अवघडपणा येतो.तरी बरं कि मेडिकल कॉलेजपासून मुलींशी बोलण्याबाबत कोणतीही अढी नसते त्यामुळे मुलीशी कसं बोलायचं हा अवघडलेपणा(AWKWARD)नव्हता. शिवाय हि मुलगी(किंवा मुलगा) "पसंत" नाही हे पहिल्या दोन मिनिटात स्वच्छपणे डोक्यात उमटते. त्यानंतर पुढचा सर्व कार्यक्रम हा एखाद्या मड्रासी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला मारून मुटकून बसवल्यावर कशी गोची होईल तसे होते. मुलगी मारे लाजण्याचे नाटक करत असते किंवा शालीनतेचा आव आणत असते( बर्याच वेळेस चेहऱ्यावरील अगतिकता सुद्धा दिसत असते).
परंतु मी काय करतो आहे, पुढे काय करणार आहे त्यात माझ्याशी लग्न केल्यावर मुलीच्या भवितव्या बाबतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देणे हे फार एकसुरी आणि कंटाळवाणे असते. मुळात मुलगी(किंवा मुलगा) पसंत नाही हे समजल्याने पुढच्या कार्यक्रमातील रस संपलेला असतो.
यानंतर मी एक धडा शिकलो. उगाच उठून वेळात वेळ काढून अजिबात माहित नसलेले स्थळ पाहण्यास आपला अमुल्य वेळ फुकट घालवण्यात अर्थ नाही. मी आई वडिलांना याबाबत संपूर्ण हक्क दिले. तुम्हाला बरी वाटेल ती मुलगी पहा आणि पसंत असेल तर मला सांगा. नसेल तर बाहेरच्या बाहेरच मामला मिटवून टाका.गम्मत म्हणजे पुढच्या दोन महिन्यात( माझे लग्न ठरेपर्यंत) त्यांच्याकडे ७५ स्थळे आली त्यातील बहुसंख्य मुली डॉक्टर होत्या. आमच्या वडिलांना(दोन्ही मुलगे असल्याने) मुलीच्या वडिलांबद्दल फार सहानुभूती होती त्यामुळे त्यांनी प्रत्येक माणसाला अत्यंत नम्र भाषेत पत्र लिहून आपले योग का जुळणार नाहीत याची पत्रे लिहिली होती.
असो. यानंतर मी जेंव्हा घरी फोन करायचो तेंव्हा नवीन कहाण्या आई सांगत असे. एक डॉक्टर मुलगी पेडर रोडला राहणारी होती. त्यांच्या आग्रहाखातर आईवडील त्यांच्या घरी जाऊन बघून आले. तिला लष्करातील नवरा हवा होता अन्यथा ते आमच्या पेक्षा आर्थिक स्तरात खूपच वरचे ( वडील विक्रीकर आयुक्त) होते आणि हुच्चभ्रू पण तेंव्हा आम्हाला झेपणारे नव्हते.
वरील कार्यक्रमानंतर एक महिनाभर आई वडिलांबरोबर चर्चा झाली आणि शेवटी असे त्रयस्थ स्थळी मुली पाहण्यापेक्षा आपल्या घरी त्यांना बोलवावे असा मार्ग निघाला. निदान उठून कपडे करून एखाद्या घरी मिरवत जायचे आणि हात हलवत परत यायचे हा त्रास तरी नको. त्यातून माझे एम डी चे पहिले वर्ष असल्याने पूर्ण वर्षात मला फक्त १० दिवस सुट्टी मिळणार होती. त्यात हे सर्व कार्यक्रम पार पडायचे म्हणून आम्ही शनिवार रविवारी हे "कार्यक्रम" करायचे ठरविले.
माझ्या वर्गातील ६० जण एम डी करायला आलेले होते त्यातील २३ जण लग्न झालेले होते ( यातील बरेचसे प्रेम विवाह असल्याने लवकर लग्न करून मोकळे झालेले होते.) उरलेल्या ३७ जणांमध्ये मी मुली पाहायला लागलेला पहिला "उपवधू" होतो आणि मी मित्राना स्पष्टपणे सांगत असे कि मुलगी पाहायला मुंबईला चाललो आहे तेंव्हा त्यांना पण या प्रकाराचे कुतूहल होते. म्हणून मी परत आलो रात्री ९ ला ठाण्याला महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून १२. ३० ला पुण्यात पोहोचत असे तेंव्हा माझ्या खोलीत कोंडाळे जमत असे कि "काय झाले "
पहिला कार्यक्रम झाल्यावर मी १० जुलै १९९२ हा शुक्रवार होता आणि माझा वाढदिवस होता त्यासाठी डेक्कन एक्स्प्रेसने मी मुंबईत दाखल झालो. दुसर्या दिवशी एक दिवस रजा टाकली. आमच्या सरांना पण सांगून टाकले कि मुली पाहायला जातो आहे त्यामुळे रजा मिळण्यास कोणतीही आडकाठी झाली नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी )११ तारखेला) एक आणि १२ जुलै ला सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा तीन मुली दोन दिवसात पहायच्या होत्या.
क्रमशः
Book traversal links for आमच्या विवाहाची कहाणी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पैला
माताय धन्य .तुम्ही मुलगी
लोल!
लेख आवडला. पु.भा.प्र.
@टवाळ कार्टा
वाचतोय..... लय विंट्रेस्टिंग हाय....
डॉक... अनुभव कथन रोचक आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे'क्रमशः' वाचून बरे वाटले
हाहा!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
पुभाप्र
मस्त.
ह्म्म्म!! पुभाप्र!!
लय भारी डॉक
स्पा
डॉक
वेगळा प्रयत्न ....
+१
संगीतकार नौशाद यांचा किस्सा
आयला
वाचतेय पुभाप्र
मस्त...
पसंत पडती है तब घंटी बजती है
रोचक !
पुभाप्र
(No subject)
छान लिहीलय..
एकदम क्रमवार आणि डिटेल माहिती
चर्चा का म्हणे?
चर्चेचे कारण
आपल्याला काय पाहिजे हे तिला
आपल्याला काय पाहिजे हे तिला चांगले माहिती आहे.ही एक फार अभावाने दिसणारी गोष्ट आहे. त्यातही आपल्याला काय पाहिजे हे उघडपणे... आणि येथे तर जालावर नाव-फोटो सकट... सांगण्यास असामान्य धैर्य लागते ! नाहीतर, "मला काय पाहिजे ते मला माहीत आहे. पण पालक/समाज/ इ इ इ मुळे हवे ते बोलता/करता येत नाही." असे खरे/खोटे बोलणारे असंख्य आहेत.एक्का साहेब
बदलणार्या समाजपरिस्थितीने
याहून जास्त धैर्य सनी लियोन
याहून जास्त धैर्य सनी लियोन किंवा राखी सावंत यांनी दाखविलेले आहे.ही उदाहरणे आपण बोलत असलेल्या मुलीच्या संदर्भात अत्यंत विसंगत आहेत असे मला वाटते. या दोन उदाहरणात स्वतःबद्दलच्या मत अथवा प्रामाणिकपणापेक्षा व्यावसायीक व आर्थिक फायद्यासाठी विचारपूर्वक केलेली जाहिरात आहे... मग (घटं भिंद्यात, पटं छिंद्यात... या न्यायाने) ती जेवढी जास्त विवादास्पद तेवढी अधिक चांगलीच नाही का ?"या दोन उदाहरणात
याहून जास्त धैर्य सनी लियोन
च्यामारी,आमचा साला बालविवाह झाला...
मस्तच!
मनोरंजक धागा. मी २२ मुली
अप्पासाहेब
५-६ मुलींनी मला नाकारले.
अप्पासाहेब
लष्करी बाणा !!
मस्त..
खूप आवडलं
जोशी बुवा
मस्त डॉक.