आज कविवर्य कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. साजरा म्हणजे कसा? व्हॉट्सॅप फेसबुक ट्विटर वर हे शेकडोच्या शेकडो संदेश. मोठाले मोठाले संदेश. कविता काय, चित्रं काय, सुमार नाही. आजही तसंच चालू आहे. नाही नाही; माझा त्याला आक्षेप नाही. मुळीच नाही. पण शंभर संदेश पाठवल्यावर एकदा तरी आपण विचार करावा असं वाटतं. विचार हा, की संदेश पाठवण्यापलिकडे आपण खरोखर आपल्या भाषेवर प्रेम करतो का? 'अभिमान नव्हे; माज आहे' म्हणणा-या आपल्या वागण्यात तो माज दिसतो का? दिसलाच तर तो आपल्या गाडीच्या समोर आलेल्या गाडीला भोंगा वाजवून त्याच्याकडे रागाने बघण्यापेक्षा काही वेगळा असतो का?
बरं. मराठी भाषा दिवस झाला. आंतरजालावर अस्मिताप्रदर्शन झालं. पुढे काय करायचं हे त्याहून अधिक महत्वाचं आहे. 'भाषा काय आहे रे, एक माध्यम फक्त' असं म्हणणारे महाभाग मला भेटलेत. त्यांच्याशी तीव्र असहमती आहे. भाषा हे फक्त माध्यम नव्हे. भाषा हा संस्कृतीचा पाया आहे. भाषा असेल तर संस्कृती असेल. त्यामुळे भाषा जपायला हवीच. दुर्दैव हे की आपण आज आपली मातृभाषा न जपता इंग्रजी, हिंदी जपत आहोत कारण आपल्या खात्यात जमा होणारे पैसे आपल्याला या दोन भाषा देणार आहेत. 'मराठी येत नाही' असं म्हणणारी मराठी माणसं 'आईचं नाव माहीत नाही' असंच म्हणत असतात. इंग्रजी, हिंदी किंवा जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज हवं ते शिकावं माणसाने. पण मराठी येत नाही असं मात्र असू नये. आपला विचार नेहमी मातृभाषेतून होतो, तेंव्हा शिक्षण मातृभाषेतून होणं खूप महत्वाचं ठरतं. नाहीतर मग 'मी स्कूल मधे जाते', 'मला फीवर आलाय' असली धेडगुजरी भाषा माणूस पुढे आयुष्यभर बोलतो. 'मराठी बोललो तर डाउन मार्केट वाटतं' म्हणणारे नतद्रष्टही आहेत.
आपण मराठीचा या एका दिवशी जरी आग्रह धरला तरी त्याला चूक ठरवणारे अनेक असतील. ते चूक ठरवू शकतात कारण आपल्या आग्रहात एकी नसते. आपण मराठी माणसं काहीच करत नाही खरं तर. तामिळ, तेलगू प्रदेशात बघा कुणी सहजासहजी हिंदी बोलतं का. जपान मधे जा, इंग्रजीत बोलून आपलं काम सहज होतं का बघा. फ्रेंच लोकांची फ्रेंचबद्दलची अस्मिता, किंवा तथाकथित माज बघा. मग कळतं, की आपण खूपच सौम्य आग्रह धरतो.
हा विषय खूप मोठा आहे. परंतु त्यात अजून न शिरता, आपण काही साध्यात साध्या गोष्टी बघू, ज्या आपण करू शकतो, केल्या पाहिजेत.
१. मराठी लिहीण्याची सवय
२. मराठी वाचण्याची सवय
३. मराठी माणसाशी मराठीतच बोलणे (असं म्हणावं लागतंय कारण मुंबईत सर्व भाषा बोलणारी माणसं राहतात आणि 'मुंबईत जायचंय म्हणजे मराठी यायलाच हवं' हे ठसवण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. आपला चांगुलपणा म्हणू त्याला, की 'चल रे बाबा, तुला हिंदी येतं का, मी हिंदीत सांगतो' हे लाड आपण पुरवले.)
४. शिक्षणात मराठीला प्राधान्य देणे. (आज नुसत्या अस्मितेने काहीही होत नाही. मुळात शिक्षण हवं आणि ते मराठीतून असेल तर ती अस्मिता आपोआप रुजेल. त्यामुळे शिक्षणाची अस्मिता हवी, अस्मितेचं शिक्षण नको.)
५. सरकारी कामात मराठीचा आग्रह धरणे
६. मराठी सण, संस्कृती विचारपूर्वक (उगाच 'माज आहे. माज आहे' म्हणत नाही) जोमात साजरे करणे
७. एक मराठी भाषा दिवसच नाही तर प्रत्येक क्षण मराठीचा अभिमान बाळगणे.
८. मराठी भाषेचे शिलेदार कुणी ठराविक राजकीय पक्ष किंवा संघटनाच असल्या पाहिजेत असं गरजेचं नाही. आपण प्रत्येक जण तो वसा घ्यायला हवा. (अर्थात, डाऊन मार्केट वाटत असेल तर राहिलं मग)
९. कलाक्षेत्रात असल्यास मराठी कलाकृतींची निर्मिती करणे
१०. अगदी कट्टरतेच्या परिसीमा गाठायला नकोत पण उदारवादाच्या कक्षा नक्कीच ठरवल्या पाहिजेत.
माझ्यामते, हे इतकं जरी झालं, तरी मराठीला कमालीची उभारी देण्यात आपण सगळे मिळून सफल होऊ. सगळे मिळून हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्यात एकीचा अभाव जिथे तिथे आहे. कुठेच पड न खाण्याचा आपला ताठा एकत्रितपणे आपलाच घात करतो हे आपण अद्याप जाणलेलं नाही.
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि कुसुमाग्रजांना सादर नमन.
वाचने
8492
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
कालचा एक किस्सा....आपल्याच मुंबईतला...
अगदी अगदी!
In reply to कालचा एक किस्सा....आपल्याच मुंबईतला... by मुक्त विहारि
उद्धट आणि स्वतःला अतिशहाणा समजणारे....
In reply to अगदी अगदी! by एस
'मराठी नाही आती तर नाही आती, मी हिंदी मे बोलतो'
In reply to कालचा एक किस्सा....आपल्याच मुंबईतला... by मुक्त विहारि
छान लिहिलंय
+१
In reply to छान लिहिलंय by पैसा
>> मात्र "मराठीचा माज" वगैरे
In reply to छान लिहिलंय by पैसा
+१
In reply to छान लिहिलंय by पैसा
मी चेपुवर टाकलेल्या
समोरचा मराठी आहे हे समजल्यावर
>>मग "प्रत्येक व्यवहार
In reply to समोरचा मराठी आहे हे समजल्यावर by आदूबाळ
उडदामाजि काळेगोरे +१
In reply to >>मग "प्रत्येक व्यवहार by सूड
मॅनहॅटनच्या गर्दीत शाकाहारी
In reply to समोरचा मराठी आहे हे समजल्यावर by आदूबाळ
छान लिहिलयत वल्लीबुवा!
?
In reply to छान लिहिलयत वल्लीबुवा! by रेवती
माफ करा (मराठीत - सॉरी!).
In reply to ? by असंका
'सोरी' म्हणजे 'माफ करा'
In reply to माफ करा (मराठीत - सॉरी!). by रेवती
अवो, ह्ये वेल्लाभट हायती...
In reply to छान लिहिलयत वल्लीबुवा! by रेवती
माफी मागितलीये मी! काय झालय,
In reply to अवो, ह्ये वेल्लाभट हायती... by डॉ सुहास म्हात्रे
अहो माफी-बिफी कसली मागताय ???
In reply to माफी मागितलीये मी! काय झालय, by रेवती
आपण करू शकू अशा साध्या गोष्टी..
तसंही धन्स आजकाल फारच कमी
In reply to आपण करू शकू अशा साध्या गोष्टी.. by सुधांशुनूलकर
वाचतेय
असो तुजो घोव् म्हणतां मगे?
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब, भाषा प्रेमाचा
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
माझी मुलगी इंग्रजी माध्यमात
भाग्यश्री ताई हा झाला भावनिक
In reply to माझी मुलगी इंग्रजी माध्यमात by भाग्यश्री कुलकर्णी
अतिरेक नको
मराठी लँग्वेज सेव्ह करा!
खरा (एक) उपायः- आपल्या
इंजिनियर्,डॉक्टर?
In reply to खरा (एक) उपायः- आपल्या by अत्रुप्त आत्मा
.
In reply to इंजिनियर्,डॉक्टर? by यसवायजी
बर मग?
In reply to . by hitesh
आवो हीतेस भाव ! तुमचा आयडी
In reply to . by hitesh
@इंग्रजी>>> ??????
In reply to इंजिनियर्,डॉक्टर? by यसवायजी
मातृभाषा....
+१
In reply to मातृभाषा.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to मातृभाषा.... by प्रभाकर पेठकर
लेखाशी सहमत आहे. मराठी
आजच लोकसत्तामध्ये "गर्व
In reply to लेखाशी सहमत आहे. मराठी by नगरीनिरंजन
छान लिहिले आहे वेल्लाभटजी. १०