२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती. सर्व टीम मधे अनडीसप्युटेड लीडर झालो होतो. पगार मजबुत. सुट्टी फक्त रविवार ३ ते१०. ह्या सुट्टीच्या वेळात छबिलदास नाहीतर शिवाजी नाट्यमंदिर,ग्रेट् पंजाब, आणि दुर्गाश्रम हा कार्यक्रम असायचा.एकंदरीत करिअर मार्गाला लागले होते.
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार - ह्या ओळी मला अजिबात पटत नाहीत. कितीही वेडा असला तरी कुंभारसाहेब सर्वांना त्यांच्या कर्मानुसार लोणी, व अंगार देत असावेत. पण अंगाराच्या कवतिका त मिळालेले लोणी वितळून जात असावे.
कुटंब्-नियोजन कार्यक्रमाला आमच्या साहेबांनी आयुष्य वाहिलेले होते. सतत नव्या, नव्या कल्पना मांडत असत. त्यानी परदेशातुन एक तंबू मागवेलेला होता. छोटे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर होता तो तंबू. हा तंबू वस्ती वस्ती मधून फिरवायचे ते.
तळागाळात पोचायला सर्वोत्तम उपाय.
शनिवारचा दिवस होता. सुमारे २ ची वेळ. एक गृहस्थ आले. ३ मुली होत्या. वंशाचा दिवा हवा होता. त्यांचा प्रष्न होता, गॅरंटीड मुलगा व्हायला काही गोळ्या आहेत का? तसे काही नसते हे त्याना समजवले. आत्तापर्यंत सुमारे ४ एक हजार चुराडा केलेला होता ह्या नादापायी त्या गृहस्थाने. नंतर चर्चा झाली नेहेमीची. पगारपाणी, भविष्यातले शिक्षणाचे खर्च. एकंदरीत दिवा येता येता ह्यांचीच बत्ती गुल होण्याची मी सांगितलेली शक्यता त्याना पटली. लगेच शस्त्रक्रिया करुन घेतली. बायकोला न विचारता असा निर्णय घेऊ नका हा माझ्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
संध्याकाळी काम आटोपुन निघणार इतक्यात समोरुन १५ बायकांचा समुह येताना दिसला. हातात लाटण्या. मी एकटाच होतो. डॉक्टर निघून गेले होते. तो तांडा तंबू समोर येउन थडकला. त्यातली एक ४० ची बाई जोराजोराने रडत होती. मला काय करावे सुचेना. घोषणाबाजी सुरु झाली. जमाव वाढत होता. धीर करुन पुढे झालो तेंव्हा लक्षात आले की ही बाई दुपारी शस्त्रक्रिया केलेल्या गृहस्थाची बायको. मी माझ्या परीने सर्व भगिनि समाजासमोर माझी बा़जू मांडली. त्यातल्या काही सुज्ञ बायकांना माझे म्हणणे पटू लागले होते. तितक्यात बाहेरील जमावातून एक दगड आला.आणि साहेबांची भविष्यवाणी खरी झाली.
चांगलीच जखम झाली होती. दोन मिनिटे शुद्ध गेली. भानावर आलो तर शर्ट रक्ताने भरलेला. आजुबा़जूला कोणीच नाही. सगळे रक्त बघुन पळालेले. कसाबसा उठलो. तंबू बंद केला. साहेबांना फोन केला. त्यांनी टॅक्सी करुन के.ई.एम. ला बोलवले. पाउण तासाने हॉस्पिटल ला पोचलो. साहेब दरवाजात उभे. नंतर काय झाले ते मला माहित नाही. रात्री १० वाजता भान आल्यावर बघतो साहेब बाजूला उभे. डोक्याला ६ टाके होते. मोठे बँडेज.
साहेबः You will be alright. Everything is fine. Stay with me today. And let us celebrate your birthday in a different way.
Do you feel like vomitting?
मी नाही म्हटले. रात्री साहेबांच्या महालात पोचलो. जेवलो. झोपलो. घरी कळवले नव्हते. गरज नाही वाटली. गॉड्फादर होता ना.
दुस-या दिवशी चहा पिताना साहेबांनी खबरबात घेतली प्रकृतीची. नंतर येणेप्रमाणे.
साहेबः You have a choice. You can go home and take it easy for couple of days. or take your position in the tent as if nothing has happened. You see the point is if I send someone else there it will be a win for cowardise. If you take the stand today you will never have problem ever. This is the best present you can give yourself on your birth day.
मी कामावर गेलो. साहेबांच्या बायकोने भरपूर मोठा जेवणाचा डबा दिला. नेहेमीप्रमाणे तंबू मी उघडलेला बघुन ती बाई आली -माफी मागुन गेली झाल्या प्रकाराबद्दल.
चार दिवसांनी बिर्ला मातोष्री मधे माझा सत्कार समांरभ होता. त्या वर्षातला यंगेस्ट अँड बेस्ट मोटीवेटरचा. साहेबांनी हातात माईक दिला. त्यावेळी काय संचारले माझ्यात मला माहित नाही. दो या तीन पुरे करा. हम दो हमारे दो पण विसरा. आता हम दो हमारा एक ची वेळ आली आहे. बक्षिस घेताना तेंव्हाचे सेकेटरी श्री. यू.डी. सुखटणकर म्हणाले, देव बरे करो तुगेले पुता.
जाता जाता: माझ्या तेंव्हा न झालेल्या बायकोचे नशिब बलवत्तर म्हणुन उलटी झाली नाही. नाही तर स्वर्गात काही देवगणाना माझ्या समुपदेशनाचा जाच सहन करावा लागला असता.
वाचने
6062
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा विनायकराव
वा
In reply to वा विनायकराव by धोंडोपंत
+१
In reply to वा by विसोबा खेचर
+१
In reply to +१ by रामपुरी
असेच म्हणतो
In reply to वा विनायकराव by धोंडोपंत
मस्त
परत एक लंबर
स्वर्ग
In reply to परत एक लंबर by टारझन
छान अनुभव.
असेच..
In reply to छान अनुभव. by प्राजु
आपले साहेब
असे 'विसावे' फार कमी जणांना मिळतात!!
सहमत
In reply to असे 'विसावे' फार कमी जणांना मिळतात!! by चतुरंग
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to सहमत by नंदन
अगदी सहमत
In reply to असे 'विसावे' फार कमी जणांना मिळतात!! by चतुरंग
राव तुम्ही
मलाही तोच प्रश्न पडला आहे
मलाही
In reply to मलाही तोच प्रश्न पडला आहे by कपिल काळे
छान लेख!!!
डॉक्टर
अच्छा, म्हणजे
In reply to डॉक्टर by विनायक प्रभू
छान
विप्र खुपच छान लेख लिहता तुम्ही.
अभिनंदन प्रभुदेवा!
दादुस तु
कलत नाय
In reply to दादुस तु by ब्रिटिश
कलल तवा
In reply to कलत नाय by विनायक प्रभू
अंदाज
In reply to कलल तवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अंदाज पण
In reply to अंदाज by विनायक प्रभू