मराठी भाषा दिन लघुकथा स्पर्धा -निकाल
सप्रेम नमस्कार
मराठी भाषा दिनानिमित्त आपण लघुकथा स्पर्धा आयोजित केली होती.तिला सदस्यांचा छान प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यास आनंद होत आहे.
या स्पर्धेसाठी सदस्यांपैकी स्पा,स्वॅप्स,प्रभाकर पेठकर,इनिगोय, स्पार्टाकस आणि संपादकांमधुन पैसा,लीमाउजेट,अजया,विकास यांनी परीक्षण केले.
परीक्षणाचे थोडक्यात निकष(स्वॅप्स यांच्या शब्दात) पुढीलप्रमाणे:
लघुकथा ही किस्सा आणि कादंबरी यांच्यामधला साहित्यप्रकार म्हणून गणला जातो, तसेच त्याला स्वतंत्र आविष्कार म्हणूनही गणले जाते. ही 'लघु'कथा किती लहान वा मोठी असावी याचे काटेकोर निकष नसले तरी त्यात कादंबरीप्रमाणे प्रकरणे नसतात आणि साधारणपणे एका बैठकीत वा वाचनात ती वाचून पूर्ण होते असे ढोबळमानाने सांगता येईल. लघुकथेचा एकूण बाज अथवा आवाका कादंबरीपेक्षा कमी असतो आणि त्यातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग संख्येने कमी असतात.
कादंबरीच्या दृष्टीने परिचय (Exposition), गुंतागुंत (Complication), पेचप्रसंग (Crisis),
परमोच्च बिंदू (Climax) आणि निराकरण (Resolution) ह्या प्रमुख टप्प्यांचा विचार करता येतो. परंतु लघुकथेमध्ये हे सर्व टप्पे असतीलच असे नाही. एखादी लघुकथा केवळ परिचय, पेचप्रसंग आणि परमोच्च बिंदू एवढेच टप्पे घेत निराकरण एखाद्या-दुसर्या वाक्यातही संपवू शकेल, तर दुसरी लघुकथा ही पेचप्रसंग आधी दाखवून नंतर फ्लॅशबॅक तंत्राने बाकीचे टप्पे घेईल. अशा बर्याच शक्यता लघुकथेसंदर्भात संभवू शकतात.
निकषांबद्दल बोलायचे झाले तर कथानक, मांडणी, पात्रविकास, गती, उपरोध, प्रथमपुरुष/तृतीयपुरुष निवेदन, सूचकता, परिच्छेदांमधील योग्य सुसंगती, विरामचिन्हांचा आवश्यक तिथे आणि तितकाच वापर, कथानकाच्या बाजाला शोभेलशी शैली - उदा. रहस्यकथांच्या बाबतीत वेगवान, छोट्या प्रसंगांचा वापर, तर प्रेमकथांची तरल हाताळणी, कथेतील पात्रांच्या भाषाशैलींकडे दिलेले लक्ष इत्यादी अनेक निकष सांगता येतील. एखादी कथा संवादांनी पुढे जाईल तर दुसरी कथा स्वतःशीच आणि वाचकांशी संवाद साधत स्वतःची गोष्ट सांगेल. एखाद्या कथेत संवादच कदाचित नसतीलही. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या वाचकांना कुठल्या प्रकारच्या कथा आवडतील हे जसे सांगता येणे कठीण आहे तसे एखादी चांगली कथा ही वाचकप्रिय असेलच असे नाही.
वरील निकषांपैकी योग्य ते निकष लावले असता खालील प्रवेशिका प्रथम तीन क्रमांकास पात्र ठरल्या आहेत.
प्रथम क्रमांक: अठरा पावलांचा स्टार्ट - आदूबाळ द्वितीय क्रमांक: वो शाम कुछ अजीब थी - बहुगुणी तृतीय क्रमांक:गरीब-स्पंदना
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि परीक्षणाचे काम बजावणा-या सदस्यांचे विशेष आभार. विजेत्यांना बक्षिस व प्रमाणपत्र लवकरच पाठवले जाईल.
याद्या
7059
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
विजेत्यांचे आभिनंदन...
विजेत्यांचे अभिनंदन..
अभिनंदन
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन!
लींक्स दिल्या तर बरं होईल .
http://misalpav.com
In reply to लींक्स दिल्या तर बरं होईल . by उगा काहितरीच
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
अभिनंदन!
वा वा
सर्व विजेत्यांचे हार्दिक
अभिनंदन. लिखते रहो!
अभिनंदन!
ये ब्बात! धन्यवाद!
आदूबाळ आणि स्पंदना यांचे हार्दिक अभिनंदन!
In reply to ये ब्बात! धन्यवाद! by आदूबाळ
मालक, ही कथा चित्रपटाचा ऐवज
In reply to ये ब्बात! धन्यवाद! by आदूबाळ
अभिनंदन
. सर्व विजेत्यांचे अन् सर्व
विजेत्यांचे अभिनंदन! अपेक्षित
अभिनंदन !!!
अभिनंदन.
अभिनंदन
विजेत्यांंचं अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व स्पर्धकांचे आणि
+++१११ आणि टाळ्या!
In reply to सर्व स्पर्धकांचे आणि by मधुरा देशपांडे
+११११
सर्व विजेत्यांचे अन् सर्व
विजेत्यांचे अभिनंद्न !!
मान्यवरांचे आभार.सर्वांचे अभिनंदन
सर्व स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन! उपक्रम
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सुंदर उपक्रम
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे हार्दीक
विजेत्यांचे अभिनंदन!!
अभिनंदन!!!
अठरा पावलांचा स्टार्ट केवळ
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अठरा पावलांचा स्टार्ट केवळ कहर होती....!!+१विजेत्यांना हार्दिक
सर्व
सर्व विजेत्यांचे आणि
विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्वं विजेत्यांचे अभिनंदन .
अभिनंदन