ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते. त्याचे स्पष्टीकरण योग्य वाटत असले तरी मी पहिल्यांदाच अश्या पद्धतीची खरेदी केली असल्यामुळे काही शंका आहेत. जाणकार माझ्या खालील प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील का. ?
१) इम्पोर्टेड फोने नेमके काय असतात? ते इथे भारतात विकणे आणि वापरणे गैर तर नाही ना ?
२) फोन चे अक्सेसरीज हि देशानुसार बदलतात का ?
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का?
४) फोनला १ वर्षाची थर्ड पार्टी वॉरन्टी आहे. थर्ड पार्टी वॉरन्टीम्हणजे नेमके काय? हि विश्वसनीय आहे का.?
५) फोन ची रिसीट आणि वॉरन्टी ची त्याने सौफ्टकॉपी देण्याचे त्याने काबुल केले आहे. हे दोन्ही नसल्यामुळे मी हा फोन परत घ्यावा म्हणून मेल केला होता. मेल केल्यानंतर त्याने दोन्ही डॉक्युमेंट ई मेल करतो त्याची प्रिंट काढून घ्या असे सांगितलेय अश्या पद्धतीने मिळालेली डॉक्युमेंटस ग्राय्ह धरली जातात का ?
६) हे डॉक्युमेंट, फोन हरवल्यावर पोलिस कम्प्लेंट करतांना ग्राह्य धरले जातील का ?
वाचने
5094
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
योटा घेतला का?
योटा ?
In reply to योटा घेतला का? by आनन्दा
एल जी च फोन
काही उत्तरे
प्रतिसादबद्दल धन्यवाद.
In reply to काही उत्तरे by तुषार काळभोर
काही वर्षांपूर्वी बरेच फोन
कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू
बर्याच सेकंड हँड गोष्टी आयात
In reply to कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू by आदूबाळ
आयात करणाराच भरतो, आणि मग
In reply to बर्याच सेकंड हँड गोष्टी आयात by टवाळ कार्टा
"रीफर्बिश्ड" नाहि.
In reply to कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू by आदूबाळ
रिफर्बिश्ड
nexus 4
माझ्या मते हा क्लोन पिस असावा.
क्लोन पिस असावा ला +१००
In reply to माझ्या मते हा क्लोन पिस असावा. by यमगर्निकर
अलि एक्सप्रेस बद्द्ल काय मत
फोन चि महिति
http://www.imei.info/ वर चेक