✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खोपडी सटकली

व — वेल्लाभट, Tue, 02/24/2015 - 14:20
असाच एकदा कधीतरी प्रवासात होतो. गाडीत. मी चालकाच्या भूमिकेत नव्हतो. त्यामुळे अर्थातच अर्धं लक्ष चालकाकडे, रस्त्याकडे, चालवण्याकडे होतं. अचानक भयानक ट्रॅफिक लागला. थोडा वेळ गप्प बसण्याची औपचारिकता झाल्यावर चालकाने ठणाणा सुरू केला. मग हळू हळू ट्रॅफिकमधून बाहेर आलोही. पण ती धुसफूस आता ड्रायव्हिंगमधून बाहेर पडत होती. तेंव्हा सुचलेलं विडंबन. अगदी त्याच्या ड्रायव्हिंग इतकंच सेन्सलेस. जेंव्हा ट्रॅफिक जॅमात, माझी गाडी अटकली खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली चाल अर्थातच नवरी नटली ची. पुढे बाजूला मागं गाड्या, गाडी हलेना जागची जरी दिसतोय ट्रॅफिक पुढं, हॉर्न मारते मागची रागारागात बघूनी मग मी दंताळी विचकली खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली संधी साधून काढलं नाक, घुसलो बाजूच्या लेनीत हळू हळू निघालो पुढे, कट मारीत मारीत एक सिग्नल लागला अन माझी गाडी लटकली खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली मग कहर झाला भारी, मीही निघालो रामसुम रस्ता दिसला एक मोकळा, होती अजब सामसुम नो एन्ट्रीत मामाने माझी गाडी हटकली खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली जेंव्हा ट्रॅफिक जॅमात, माझी गाडी अटकली खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली

प्रतिक्रिया द्या
2318 वाचन

💬 प्रतिसाद (9)

जमलीये मस्तं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/24/2015 - 15:54 नवीन
=)) जमलीये मस्तं =))
  • Log in or register to post comments

ओके

सूड
Tue, 02/24/2015 - 16:25 नवीन
ओके
  • Log in or register to post comments

मेन्शन नॉट

वेल्लाभट
Tue, 02/24/2015 - 16:29 नवीन
मेन्शन नॉट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

"कंबर लचकली"च्या चालीतही

आदूबाळ
Tue, 02/24/2015 - 17:10 नवीन
"कंबर लचकली"च्या चालीतही बसतीये!
  • Log in or register to post comments

बसणारच्!! वेल्लाकाकांचं काव्य

सूड
Tue, 02/24/2015 - 17:15 नवीन
बसणारच्!! वेल्लाकाकांचं काव्य म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/24/2015 - 17:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments

(No subject)

खटासि खट
Tue, 02/24/2015 - 19:04 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Wed, 02/25/2015 - 11:36 नवीन
भटकून "पुसण्या"च्या अनुभवानंतर सटकून "घुसण्याच " अण्भव मिपाकरांना दिला.
  • Log in or register to post comments

छान !

मदनबाण
Wed, 02/25/2015 - 16:38 नवीन
छान ! हल्ली माझी पणं लयं सटकते, पण रस्त्याच्या कंत्राटदाराला मनातल्या मनात भयानक शाप देउन सटकलेली खोपडी शांत करण्याचा प्रयत्न करत असतो ! शापवाणी इथे टंकणार होतो... पण जाउ दे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा