इतनीसी उमरमे ये शौक? गल्ल्यावरचा बनियाने डोळे विस्फारून विचारले ....
झाले असे होते कि छोटा वसंता लाहोरला आपल्या मामांकडे सुट्टीमध्ये म्हणून गेला होता. दिवसभर खेळणे वगैरे करता करता एक दिवस शोध लागला कि जवळच्या मशिदीत एक अवलिया गाण्याचा शौकीन होता आणि स्वत: चीजा बांधत असे ...मग काय वसंता रोज संध्याकाळी वही पेन्सिल घेऊन मशिदीत जाऊ लागला ... इतरांबरोबर तो हि त्या दिवसाची बंदिश लिहून घेई व आनंदाने परत येई ...पण थोड्याशा रितेपणाने ..
एक दिवस संध्याकाळी परत आल्यावर मामांनी विचारले हम्म मग, काय वसंता काय म्हणताहेत तुमचे खांसाहेब ? वसंताने मोठ्या उत्साहाने आपली वही समोर ठेवली ..थोडी पाने चाळून मामा म्हणाले...अरे पण नुसत्या चीजांनी काय होणार ..त्यांनी काही शिकवले का नाही ? ..वसंता बिचारा हिरमुसून नाही म्हणाला ... कौतुकाने मामा म्हणाले ..बर बर आज आता जेव उद्या मी सांगतो ते कर ...
दुसर्या दिवशी मामांनी आपल्या लाडक्या भाच्याला जवळ बोलावले आणि तब्बल एक रुपया दिला आणि वर एक कान मंत्र ...मुळच्याच चलाख भाच्याने ते उमजून मान डोलावली व तडक कोपर्यावरच्या बनियाकडे गेला .. थोडे लाह्या बत्तासे, धूप, थोडी फुले असे पैशा दोन पैशाचे खरेदी केले व तो रुपया गल्ल्यावर ठेवला ..बनिया ते पैसे उचलायला लागल्यावर म्हणाला "और बाकी पैसोन्का गांजा"....तेव्हा हे सगळे सर्रास मिळायचे ...बनियाचे डोळे खोबणीतून बाहेर यायच्या बेताला आले आणि तो जवळपास ओरडलाच ...इतनीसी उमर मे ये शौक? ... वसंता काहीच बोलला नाही...शेवटी वाण्याने दिलेला मोठ्ठा पुडा घेऊन झपझप मशिदीकडे निघाला ...आज नाही म्हटले तरी थोडं उशीरच झाला ...सूर्य कलायला लागलेला आणि लोक परतायला लागलेले ...
तो कलंदर फकीर ...त्यांचे नाव आसदखान ..आपल्या शागीर्दन्बारोब्र आवराआवरी करू लागलेले .. तेवढ्यात वसंता समोर येऊन बसला ...
"क्योन बेटा आज कॉपी नाही लाये ? ... बंदिश नाही लीख के लोगे?"...
वसंताने एक शब्दही नं बोलता हातातला पुडा समोर ठेवला आणि नम्र पणे उघडून त्यांच्या समोर सादर केला ...समोरचा तो अलिबाबाचा खजिना पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले ....
असदखान म्हणाले .."बोलो बेटा क्या चाहते हो ?"...
"गाना सिखना है"....
त्या निरागस बालकाच्या नजरेतले ते तेज, गाणे शिकण्याची असोशी सगळे सगळे त्या अवलियाने क्षणार्धात जोखले आणि किंचित हसला .. "चलो तो फिर आजसे हि शुरू करते है ... अम्म ..शाम का वख्त है मारवा से शुरू करते है" ...
उस्ताद आपल्या शागीर्दांना घेऊन मशिदीतल्या विहिरीपाशी गेले मग .. छोट्या वसंताला बाजूला उभे करून सगळे विहिरीत झुकले आणि असदखान मारव्याचा रिषभ धैवत लाऊ लागले ..विहिरीतला घुमलेला त्यांचा स्वर ....त्यांनी हलकेच बाकीच्या शिष्यांकडे बघितले ...आता त्यांनी स्वर लावले ... मग हळूच छोट्या वसंताच्या खांद्यावर थोपटले .. आता वसंताने पण स्वर लावला ...सगळेच चमकले ..सुभानल्ला ...क्या सूर पाया है लौंडेने ...आणि मग सुरु झाला एक प्रवास ...मारव्याचा ...
हे मदमाती चली भामिनी ..... ....उणे पुरे ६ महिने ..फक्त फक्त आणि फक्त मारवा.... बोटाला धरून मारव्यातल्या कित्येक खाचा खोचा ..उस्ताद सांगतोय हा नवा शागीर्द ते टिपतोय ..मधून स्वत:चे पण रंग हळूच टाकतोय ..उस्ताद ते पारखून ..हिण ते जाळून ..अस्सल ते उजळून.. कणाकणाने मारवा पुढे जातोय ...हळूहळू शिकणे शिकवणे हा फरकच जणू लोप पावत चाललेला ...आणि मग एक दिवस गाता गाता वसंताने थोडी उसंत घेताच आसदखां एक्दम थांबले ...म्हणाले ...'अब बस हो गया बेटे ..इथून पुढचा मारवा तुला आपोआप सापडेल...जाओ ..खुदा तुम्हे सलामत रखे ..' ... आणि मग त्या अवलीयाचा तो आशीर्वाद खरा ठरला ... (संकलित)
वाचने
9712
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमन !
जबरी. वसंतरावांची ही कथा ऐकून
+++१११
In reply to जबरी. वसंतरावांची ही कथा ऐकून by आदूबाळ
तरीच
सुरेख!
हि १०० % सत्यकथा आहे कारण
In reply to सुरेख! by बहुगुणी
वसंतराव देशपांडे??
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }मी लहान असताना किशोरच्या
अगदी बरोबर ...
In reply to मी लहान असताना किशोरच्या by स्वाती२
ह्यावर
In reply to मी लहान असताना किशोरच्या by स्वाती२
छान!
मला वाटतं मी वाचलेल्या कथेत
हे मला ठाऊक नाही
In reply to मला वाटतं मी वाचलेल्या कथेत by कंजूस
विहीरींचे
In reply to हे मला ठाऊक नाही by अत्रन्गि पाउस
वसंतराव आणि पुल
वा बुवा !!
In reply to वसंतराव आणि पुल by रमेश आठवले
कर्नाटकातील माणिकपूर येथे
बघायला पाहिजे
In reply to कर्नाटकातील माणिकपूर येथे by कंजूस
फारच छान. आवडली
वसंतराव म्हणजे माझे दैवतच. मी
मग वसंतरावांचा राजकल्याण
In reply to वसंतराव म्हणजे माझे दैवतच. मी by प्रसाद१९७१
आहे आहे. विचारल्या बाबत धन्स
In reply to मग वसंतरावांचा राजकल्याण by अत्रन्गि पाउस
@त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक
In reply to वसंतराव म्हणजे माझे दैवतच. मी by प्रसाद१९७१
इथे लावा ते!
प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....!कसे लावायचे ते सांगा. मला
In reply to @त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक by अत्रुप्त आत्मा
जमले तर यु नळीवर टाकतो आणि
In reply to @त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक by अत्रुप्त आत्मा
हा घ्या पटमंजीरी
In reply to @त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक by अत्रुप्त आत्मा
वा! मस्त लेख!
पुण्याच्या आकाशवाणीच्या मूठभर कंपू
In reply to वा! मस्त लेख! by एस
कार्यक्रमाच्या वेळी
In reply to पुण्याच्या आकाशवाणीच्या मूठभर कंपू by अत्रन्गि पाउस
मला अतिशय अभिमान वाटतो की
सावळापुर चे देशपांडे
हो पण
In reply to सावळापुर चे देशपांडे by रमेश आठवले
एका दैवी गायकाच्या इतिहासातले
वाह!
क्या बात है
भाऊ
In reply to क्या बात है by सुधांशुनूलकर
प्रयत्न करतो
In reply to भाऊ by अत्रन्गि पाउस
+१
In reply to प्रयत्न करतो by सुधांशुनूलकर
http://www.mediafire.com
शुध्द खवा !!!
In reply to http://www.mediafire.com by प्रसाद१९७१
गेले
In reply to http://www.mediafire.com by प्रसाद१९७१
+१
In reply to गेले by अत्रन्गि पाउस
कैच्या कैच कॉम्प्लेक्स आहे
In reply to http://www.mediafire.com by प्रसाद१९७१
आनंदघन.
मस्त