गेली तीन वर्ष सलग लीग च्या सेमीजपर्यंत धडक दिली होती . . पण प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडलो होतो . . कधी वेळकाढू खेळ . . कधी ऐनवेळी केलेल्या चुका . कधी सामन्याच्या आदल्या दिवशी झालेली इंज्युरी . काहीना काही कारण . पण बाहेर पडलो होतो . .
स्वस्तिक फुटबाल क्लब .
हा आमचा क्लब . आम्ही ५-६ जणांनी सुरु केलेला . . रोज फुटबाल खेळायचो . . आणि सहज बोलता बोलता ठरलं कि लोकल लीग मध्ये पण टीम उतरवू . . ६ जण होतोच . आणखी ५-६ जण इकडून तिकडून मिळवले . . झाला क्लब सुरु . .
यातले सहा जण म्हणजे . . म्हमद्या . ( सेंटर हाफ ) अविनाश ( लेफ्ट डिफेंडर ) , अप्पू (गोल कीपर) , विकी ( लेफ्ट फोरवर्ड ) रोह्या(राईट फोरवर्ड ) आणि मी . (राईट डिफेंडर )
बाकी सगळी चिल्ली पिल्ली असायची . . ज्यांना मोठ्या टीम मध्ये जायचं असेल ते इथे येउन १-२ वर्ष खेळून मग बाकी टीम मध्ये जात . . आम्हीही कधी कोणाला अडवलं नाही . . पण हि सहा मंडळी फिक्स होतो . . कारण अगदी पाचवी सहावीत असल्यापासून ओळख . कोणीही एका शाळेतलं नाही . शाळेत असताना एकमेकाविरुद्ध खेळून . आणि एक १-२ वेळा स्टेट लेवल वर बेळगाव साठी एकत्र खेळून ओळख झाली होती . . तीच नंतर वाढली . . आम्ही फक्त बॉल विकत घ्यायला पैसे घ्यायचो सगळ्यांकडून . बाकी जर्सी आणि लीगसाठी लागणारी एन्ट्री फी आम्हीच ६ जण भारत होतो . . एक तर आम्हीच काय ते नोकरी धंदे करणारे होतो . . बाकी सगळे वेगवेळ्या कॉलेजचे विद्यार्थी . . आणि पैश्यासाठी खेळ अडू नये कोणत्याही विद्यार्थ्याचा हा एक विचार स्वानुभवावरून आला होता . . त्यामुळे जो काही खर्च असेल तो आम्हीच करायचो . .
म्हमद्या बद्दल थोडं वाचलं असेल तुम्ही लोकांनी . इतर ५ जण पण असेच "वेडे" म्हटले जावेत असे होते . . फक्त खेळासाठी खेळणारे . खेळाची मजा घेणारे . अविनाश . हा कम्प्युटर इंजिनियर होता . स्वतःची छोटीशी फर्म होती पठ्ठ्याची , महिना ३०-४० हजार कमवत होता . पण साला शेवटी होता गोखले . पक्का कंजूस . . पैसे खर्च करायला कंजूस . पण ग्राउंड वर याच्या सारखा हाच . डावीकडून हा कोर्नर ते तो कोर्नर असा नुसता पळत असायचा . कधी इंज्युर झालेला आठवत नाही . . अत्यंत सेफ खेळायचा . त्याला मी ओळखत असेलेल्या ८-९ वर्षात फक्त एकदाच येलो कार्ड घेतलं होतं . ते हि समोरून गोलकीपर रश करत असताना हा पण त्याच्या अंगावर गेला म्हणून . . पण म्हणून कधी डिफेंडिंग मध्ये कधी काही कमी पडलं नाही . समोरच्याला न पाडवता बॉल काढून घ्यायचा . कधी रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयावर चिडला नाही . अत्यंत शांत डोकं होतं माणसाचं . त्यामुळे काहीवेळा आम्ही त्याला संत अव्या म्हणून चिडवायचो . एक से एक कोर्नर किक घ्यायचा . . गोलकीपर नुसता बघत राहायचा . . कोर्नर शूटर साठी एक "ड्रीम शूट " असते ती म्हणजे बॉल हवेतच कर्व होत कीपर समोरून गोलमध्ये जातो तो . . हा शाळेत असल्यापासून यासाठी ओळखला जायचा .
अप्पू . . याचं खरं नाव अप्पय्या नागस्वामी बेडर . . पण आम्ही अप्पूच म्हणायचो . . हा कीपिंग करायला थांबला कि वाटायचं पांढऱ्या क्रॉसबार खाली काळा खांब थांबलाय . . स्ट्रायकर वन ऑन वन असेल तरी हा दात काढून काही तरी विचित्र आवाज काढत ओरडत त्याला समोरे जायचा . कित्येकदा समोरचा घाबरून बॉल अर्ध्यात सोडायचा या मुळे. .आणि त्याने सोडला म्हणून हसण्याच्या नादात याने पण सोडला होता बॉल एक दोनदा . पण माणूस मस्त होता . केरळी मुलगा . मराठी यायची तोडकी मोडकी . पण बोलायचा फक्त इंग्रजीत .
विकी . . दिसायला जाड होता . . कमी उंचीमुळे अजून जाड वाटायचा . पण वेग आणि चपळता इतकी होती कि आम्ही याला " फेदर टच " म्हणायचो . पासेस पण तसेच द्यायचा . . थ्रू बॉल देण्यात वस्ताद होता . . अगदी बघत राहावं असा खेळ . . याला पळताना बघून कित्येकदा आम्ही स्वतःला शिव्या दिल्या होत्या . . अरे ७४ किलोचा देह सांभाळून ५ फुट ४ इंच उंचीचा माणूस तुम्हाला लहान मुलांना केल्यासारखं कट करतो . . लाज वाटणारच . .
आता रोह्या . . रोहित देसाई . . हा नाटक कंपनीत जायचा चुकून फुटबाल ग्राउंड वर आला होता. जर कुठे दुसऱ्याचा पाय याच्या पायाला लागला कि हा आडवाच . आणि चेहरे तर असे केविलवाणे करे जसं कि याचा पाय तुटून पडलाय . . एका अपघातात याच्या उजव्या हाताची ३ बोटे कापली गेली होती . . जेवढा नाटकी होता तेवढाच चांगला माणूस हि होता . . शिलाई दुकान आहे याचं . . वडिलोपार्जीत धंदा . . वडील गेल्यावर हाच सांभाळायचा . .
आता राहता राहिलो मी . . तर मी . . तेच काम करायचो जे अविनाश डाव्या बाजूने करायचा . फक्त माझी चिडचिड जास्ती होती . . हाफ लाइन पार केली कि शूट करायची प्रचंड ओढ होती . . फ्रेंक लांपार्ड नि गेरार्ड हे आमचे देव . . ८ नंबर ची जर्सी घालून त्यांची नक्कल करण्यात आयुष्य गेलं . त्यामुळे फ्री किक , पेनल्टी शूट्स माझे असायचे . . आणि गोलच्या दिशेने कुठे हि कसाही मारलेला बॉल फिनिश करणे किंवा स्ट्रायकर ला देण्याचं काय होतं म्हम्द्याचं . .
तर . . त्यादिवशी . . असाच एक ग्रुप स्टेज चा सामना होता . . मागल्यावर्षी लीग जिंकलेली टीम समोर होती . .सामना खूप त्रासदायक ठरणार होता . . हे माहित होतं . पण इतका हे नवतं माहित . पहिला हाफ झाला होता . . स्कोर होता ३-० . . तीन गोल खाल्ले होते पहिल्या हाफ मध्ये . . . पहिल्याच हाफ मध्ये ३ गोल ? घाणेरडेपणा होता हा . . कारण काय . .तर तोच . आमचा आरडा ओरडा करणारा काळा रेडा अप्पू . . प्रत्येक वेळी समोरून कोणी बॉल घेऊन आला कि हा ओरडत होता . . शूट यू बासटर्ड . पहिल्या १-२ वेळेला त्यांचा स्ट्रायकर चुकला . पण मग . त्यांचा सेंटर मिड समोर आला . . पद्या . . याला मी चांगलाच ओळखत होतो . बेळगावात असलेल्या काही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता . आमच्या येड्या अप्पू हा समोर आल्यावर पण ओरडला . . आणि पद्याने खरंच शूट केलं . . गोल . .
पुढल्या १५ मिनिटात आणखी दोन गोल . . कोणी काहीच करू शकलं नवतं . हाफ टाईम झाला .
नुसती चिडचिड चालली होती . . आणि त्यात हा आमचा कोच . . "लेट्स गिव देम अ बाय" म्हणाला . . हातात पाण्याची बाटली होती ती फेकली दुसऱ्या बाजूला . . "कोच . सामना पूर्ण खेळायचा आहे मला . . एवढी घरी जायची गडबड असेल तर तू जा . . . . कितीही गोल होऊदेत . मी खेळणारच . . "
कोच : Aditya. . this match over. . you will be out of this league if we loose. . and that seems like the obvious result . .and don't talk me like i am equal to your age.. respect your elders. . I did not expect this from you. ."
मी : I know .. but i am not going away from this. and whatever happens i will not allow you to give them a bye . . lets see how much they score.. atleast i will make sure that they will play the next match without 2 to 3 main players. .
कोच : I am the coach.. your senior . .do as i say . . save your energy . . try next year.. with better players. . you guys are getting old now. . I will make sure to replace you people.
me : ok . . but not in this team . .
you are fired coach
सगळे बघत होते माझ्या कडे . कोणीच काही बोललं नाही . . तेवढ्यात रेफ्री ने दुसरा हाफ सुरु व्हायची वार्निंग व्हिसल दिली . . ग्राउंड मध्ये उतरता उतरता अप्पू ओरडला जोरात . . " you bastards. . if you don't shoot the ball after you cross the half line.. i'l kill you all . . change the formation . .just shoot. . "
विचार केला . . सामना तर जवळपास हरलोय . . त्यांच्या कीपर ला थोडा त्रास देऊन जाऊ . .
फ़ोर्मेशन बदलली . . अव्या लेफ्ट फोरवर्ड ला गेला . . विकी ला मागे खेळायला सांगितलं . . मी राईट हाफ ला गेलो . . तिथे असलेल्या मुलाला मागे पाठवलं . . रोह्याला सांगितलं . . क्रोस करू नको बॉल . . मागे ढकल . मी रश करेन . .
म्हमद्या ला काही सांगायची गरज नाही . . त्याने आमच्या पोजिशन बदलेल्या बघितल्या होत्या . . तो समजला जे समजायचं ते. . .
आणि वेड्या सारखा ओरडला जोरात . . आद्या . . . आज तो कीपर को मालिश मिलेगी रे . .
मी अव्या आणि म्हमद्या हसत होतो उगाचच . . सामना हरायची लक्षणं असताना पण नुसते हसत होतो . .
त्यानंतर जे झालं ते आयुष्यात कधी विसरणार नाही . . .
दुसऱ्या हाफ च्या पाचव्या मिनिटाला कोर्नर मिळाला . . अव्या गेला , , मला वाटलं नेहमी प्रमाणे कर्व करेल . . मी हाफ लाइन च्या पुढे ५-७ मीटर असेन . पूर्ण ओपन होतो . . अव्या ने माझ्या कडे रोल केला बॉल . . " शूट " . . सणसणत बॉल गोलकीपर च्या हाताला लागून क्रॉसबार ला लागून बाहेर . . ग्राउंड भोवती थांबलेले ३-४ हजार लोक अगदी शांत झाले होते . . आवाज येत होता तो क्रॉस बार चा . . हा आवाज एका मिड फील्डर साठी सर्वात सुंदर असतो . . जेवढा जास्ती आवाज . जेवढा जास्ती वेळ बार व्हायब्रेट करत राहील . तेवढी तुमची ताकत . सरळ साधा हिशोब होता . .
कीपर आपला उजवा हात झाडत खाली बसला होता . . हेच पाहिजे होतं मला . . आसुरी आनंद म्हणतात तो हाच असावा . . काही वेळाने म्हम्द्याला लार्ज डी बाहेर मस्त वोलि मिळाला . . टोप राईट कोर्नर मध्ये गोल . . कोणीही तो बॉल अडवणं शक्यच नवतं . . स्कोर ३-१ .
एक तास झाला होता . अजून फक्त अर्धा तास शिल्लक . . आणि तेवढ्यात रोह्या पडला . . अगदी खरोखर पडला . ३३ मीटर्स वर फ्री किक . . किक घ्यायला रेडी झालो . . मी आणि अव्या . दोघेही होतो . . मी किक घ्यायला स्टार्ट घेतला . . तेवढ्यात अव्या बाजूने जोरात गेला . . कोणाला काही समजायचा आत बॉल विरुद्ध टीम च्या वॉल च्या बाजूनी कर्व होऊन गोल . . ३-२ . .
आहाहाहा . . त्यानंतर पुढच्याच २ मिनिटात मला रोहित ने बॉल मागे दिला होता . . हाफ लाइन पासून बुलेट किक . . लेफ्ट टोप कोर्नर ला गोल . . .
सामना ड्रॉ झाला होता . . . शेवटची दहा मिनिटे उगाच इकडे तिकडे बॉल ढकलून काढली. हरलेला सामना खेचून काढला होता . .
पण . . हा आमच्या सगळ्यांचा मिळून शेवटचा सामना . . नॉक आउट राउंड ला जायला सामना जिंकणे आवश्यक होतं . जे नाही झालं . . बाहेर पडलो . . म्हमद्या गेला … रोहित गोव्याला जाउन खेळतोय . . आणि मी . . सध्या फक्त पीसी वर . . पण प्रत्येक वेळी गोल समोर गेलो कि कानात अप्पू ओरडतो . . शूट यू बासटर्ड
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडेश!
आवडेश!
मस्त वर्णन.
मस्त वर्णन. म्हमद्या बद्दल परत वाचून वाईट वाटले.
.. असे अनेक मित्र, बालमित्र हरवलेला
मस्त!
मस्त!
मस्त!
खूप छान लिहिलंय!
जहबहराट!!!!!!
जहबहराट!!!!!!
मस्त!
मस्त!
झकास!!
झकास!!
(No subject)
*OK*
थरारक. म्हमद्याचं काय झालं ?
थरारक.
म्हमद्याचं काय झालं ?
http://www.misalpav.com/node
In reply to थरारक. म्हमद्याचं काय झालं ? by खटासि खट
https://www.misalpav.com/node/29858
इथे कळेल :)
धन्यवाद. बघतो.
In reply to http://www.misalpav.com/node by अद्द्या
धन्यवाद. बघतो.
धन्यवाद सगळ्यांचे
धन्यवाद सगळ्यांचे :)