Skip to main content

ऑनलाईन खरेदीवर पैसे कसे वाचवाल ?

लेखक भक्त प्रल्हाद यांनी शुक्रवार, 20/02/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता? १. किमतीची तुलना करून : एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या साईट वर वेगळी असते. त्यांची तुलना केल्यावर तुम्हाला सर्वात कमी किंमत माहित पडू शकते. (जसे कि buyhatake किंवा makkhichoos plugin) २. किंमत रोज चेक करुन : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन रोज त्यांच्या वस्तूंच्या किमती बदलतात. तुम्ही त्या रोज चेक केल्या तर तुम्हाला नक्कीच किमतीमधील फरक दिसून येईल. (एका आठवड्यात आम्हि लक्ष ठेवुन असलेल्या १००० पैकि ३०० वस्तुंच्या किंमती त्यांनी बदलल्या) आम्ही या गोष्टी पहिल्या आणि जरी पहिल्या प्रकारासाठी काहि पर्याय असले तरी दुसर्या प्रकारचे काम करणार्या वेबसाईट फक्त ईमेल पाठवतात. (तेसुद्धा काही खास काम करत नाही.). यासाठीच आम्ही एक नवीन मोबाईल अ‍ॅप बनवले आहे, ज्याचं नाव आहे buckasur. या अ‍ॅप वर तुम्ही वस्तू शोधा आणि तुमच्या आवडत्या वस्तूंच्या यादीत टाका. जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा हे अ‍ॅप तुम्हाला सांगेल. तुम्ही हे अ‍ॅप इथे टीचकी मारुन डाऊनलोड करू शकता. आमच्या अनुभवानुसार थोडे थांबले तर अनेक वस्तुंवर १०% सुट तर सहजच मिळुन जाते. मी हे अ‍ॅप सध्या TV आणी फोनच्या किमती चेक करण्यासाठी वापरतो. (पण अगदी डायपर सारख्या वस्तुवर सुद्धा मला २०% पेक्षा जास्त सुट मिळालि आहे.) अगदी सोप्प आनि उपयुक्त अ‍ॅप! आमच्या मित्रांचे आतापर्यंतचे अनुभव तुम्ही इथे टिचकी मारुन वाचू शकता. तुम्हालाहि ऑनलाईन खरेदीवर पैसे वाचवण्याचे असे इतर प्रकार माहित असतीलच ते प्रतिसादांमध्ये नोंदवावेत हि अपेक्षा.

वाचने 27532
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

अरे बाणा, ही त्यांची झैरात आहे. तुझ्या माहितीत त्यांना विंटरेष्ट असेलच असे नाही.. :)))) असो तरीही चांगली माहिती .. आयफोनसाठी तुमचे अ‍ॅप असल्यास सांगा आम्ही नक्की वापरु (आमचेकडे आयफोन आहे याची झैरात ;) ).

In reply to by हाडक्या

तुमच्याकडे आयफोन आहे? फोनस्क्रीन अनलॉक करायला प्रत्येक वेळी ५० सेंट्स लागत असतील नै? =)) चार्जिंग चालु बंद करायला पण म्हणे दर वेळी एखादा डॉलर दान करायला लागतो जॉब्स ला =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्ही पौंड देतो बुवा आणि मोजित नै कधी, जॉब्स म्हणे मोजता मोजताच गेला.. (अता वस्तीला आंग्लदेशात असल्याचीपण झैरात!) कल्ला काव ?

अरे हाडक्या, जर दुसर्याचा माल चांगला असेल तर लोक तेच वापरतील ना. केवळ जाहिरात न करता त्याबरोबर थोडी माहितीहि मिपाकरांना व्हावी हा हेतु आहे या धाग्याचा. तुका म्हणे त्यातल्या त्यात, स्वार्थाबरोबर थोडा परमार्थ.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा हा हा.. अगदी अगदी एक्कासाहेब. बादवे, माईसाहेब आहेत ना अजून ? नै तर उद्या कळायचे "हे" गेले वरती, म्हणून त्यापण गेल्या वरती.. *biggrin*

अजून कसली कसली अ‍ॅप्स बनवली तुम्ही? मी जेव्हा ऑनलाईन खरेदी करते तेव्हा "मला आत्ताच पाहिजे" अशीच असते. त्यामुळे थांबायला वेळ नसतो. मग फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि इबे सगळीकडे किंमती चेक करते. क्रेडिट कार्डावर काही डिस्काउंट ऑफर आहे का बघते आणि घेऊन टाकते.

In reply to by पैसा

अवांतर होईल इथे. पण शॉपक्लुज वरुन वस्तु घेणं टाळा आणि शक्यतो ऑनलाईन पेमेंट टाळा. एक म्हणजे चक्क बनावट वस्तु मिळतात. दुसरं म्हणजे त्यांचा पेमेंट गेटवे भरवसा ठेवायच्या लायकीचा नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्याला काही वाईट अनुभव आलाय का ? ते आपण थोडी काळजी घेतली तर फसवणूक नाही होत म्हणजे ५००० ची वस्तू जर ते अगदी ५०० ला देत असतील तर आपणच सावध व्हावे कि वस्तू बनावट असेल. दुसरी गोष्ट shopclues वर अनेक products geniune पण असतात . product च्या खाली जे review दिलेले असतात ते वाचूनच खरेदीचा निर्णय घ्यावा . आणि ते reviews geniune असतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . त्यामुळे सरसकट site ला दोष देण्यात काही अर्थ नाही . हे मी स्वानुभवाने सांगतो कारण मी या site चा दीड वर्षापासून नियमित ग्राहक आहे . महिन्याला किमान ३०-३५ transactions त्या site वर होतात . आणि payment gatway बद्दल म्हणाल तर माझ्या pincode वर त्यांची COD नसतेच त्यामुळे online payment करावे लागते . पण म्हणून कधी मनस्ताप नाही झाला अजून मला . अगदी return / refund चे claim पण वेळेवर मिळालेत . अर्थात ही site amazon / Flipkart सारखी सुनियोजित आणि तत्पर नाहीये पण ठीक आहे .

In reply to by सतिश गावडे

जरा स्पष्ट सांगितलत तर बरं होईल . हा आणि वासाचच म्हणाल तर कधी कधी स्वतःचाच वास आपल्यालाही येतो . त्यामुळे कुठल्याही गोष्टी स्वच्छ होऊन वाचलेल्या ,ऐकलेल्या आणि लिहिलेल्या बऱ्या . नाही का ?

तत्काळ खरेदिसाठी वर सांगितलेले २ वेबसाईट वापरता येतील. buyhatke.com You will love it!

In reply to by सतिश गावडे

सतिश, कदाचित ते बटन तुझ्या ब्राउजर वर चालत नसेल. अनेकदा सिस्टम अपडेट करताना असे बग येउ शकतात. खात्री आहे कि ते सॉल्व करतील.

माई मोड ऑन- अरे प्रल्हादा,छानच केलेस हो. पण आमचे हे म्हणतात ऑनलाईन कशाला खरेदी करायचे ,जरा बाजारात भटकावे माणसाने.. बाई..बाई..वय झाल तरी हिरवट पणा जात नाही अजुन..ह्यांचा *wink* -माई मोड ऑफ

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोडवाले गायब होते ३-४ दिवस. मग चुकचुकल्यासार्खं वाटायला लागलं. च्यामारी. हे जेपी बुवा एवढा हुबेहुब मोड फॉलो करतात की कधीकधी मोड-आयडी त्यांचाच असावा असा भास होतो =))

बाय हटके चा प्लगिन गेले दोन वर्ष वापरतोय खूपच मदत होते याची . product ची daywise price History कळते . त्यामुळे आधीच जी आपण वस्तू ठरवलेली आहे घ्यायची ती यावर सेट केली की निर्णय सोपा होतो .

Comparometer is best price comparison website provide you best online platform where you can Compare products, check out latest deals, offers, discounts and get best online prices from popular online shopping sites