Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिनार on गुरुवार, 02/19/2015 - 12:15
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे. नेमके कोणते वाद्य वापरून ते संगीत निर्माण केलं असेल हे एक कोडं आहे.पण सातच्या बातम्या म्हणजे आमच्या दृक्श्राव्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. दिवसभरातल्या घडामोडी फक्त पंधरा मिनिटात सांगून होऊ शकतात यावर आजकालच्या पत्रकारांचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यांना तर आजकाल एक बातमी सांगायला अख्खा दिवसही पुरत नाही. एखादी गोष्ट सांगावी तशी बातमी रंगवून रंगवून सांगतात. आपले प्रदीप भिडे बातमी द्यायचे तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचे. अलीकडे वृत्तनिवेदक अभिनय केल्यासारखी बातमी देतात. बातमीचे गांभीर्य जेवढे कमी तेवढे यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य जास्त !एखाद्या सकाळी आपण बातम्या बघायला म्हणून टीवी लावतो. न्यूज च्यानेल वर बातम्यांचा भडीमार सुरु असतो. म्हणजे असं की , स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक बातमी, खाली ब्रेकिंग न्यूजवर दुसरी बातमी, सगळ्यात खाली एकामागून एक वेगवेळ्या बातम्या , कुठेतरी कोपऱ्यात क्रिकेटचा स्कोर, एका बाजूला जाहिरात, आणि स्क्रीन च्या मधात तो निवेदक मोठमोठ्याने ओरडत असतो. तो नेमकी कोणती बातमी सांगतो आहे हे कळेपर्यन्त जाहिराती सुरु होतात. कंटाळून आपण दुसरं च्यानेल लावतो. तिथे फक्त वृत्तनिवेदक बदलला असतो. बाकी तेच ! ११ सप्टेंबर च्या हल्ल्यानंतर भारतीय मिडीयाला "ब्रेकिंग न्यूज" हा शब्द सापडला. तेंव्हापासून देशात ब्रेकिंग न्यूज चा पूर येतोय.कुठे काही खुट्ट वाजलं की मिडीयाच्या दृष्टीने ती ब्रेकिंग न्यूज होते. आणि खुट्ट नाही वाजलं तर जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज होते. ("स्कोर्पियो ची कुत्र्याला धडक" हीसुद्धा ब्रेकिंग न्यूज होऊ शकते.त्यात जर स्कोर्पियो किंवा कुत्रा दोघांपैकी कोणीही एखाद्या सेलेब्रिटीच्या मालकीचं असेल तर विचारूच नका. कुत्र्याची जन्मकहाणी सांगण्यात येते. "कुत्ते का क्या कसूर" किंवा "विनाशक स्कोर्पियो" नावानी एखादी स्टोरी दाखवतात.) असं वाटतं दिवसभरात किती ब्रेकिंग न्यूज दिल्या यावर पत्रकारांचा पगार ठरत असावा. नेत्यांच्या किंवा सेलेब्रिटीच्या घरासमोर हे टपूनच बसले असतात. बर्याच वेळ कोणी घराबाहेर नाही आलं तर इकडे लगेच ब्रेकिंग न्यूज : शाहरुख घर से बाहर नही आये. क्या मिडीया से बचना चाहते हैं शाहरुख ? तो घराबाहेर आला की त्याच्या तोंडाजवळ माईक नेउन इकडे दुसरी दुसरी ब्रेकिंग न्यूज : शाहरुख घरसे बाहर निकले. सकाळी सकाळी यांना बघून जर तो वैतागला तर तिसरी ब्रेकिंग न्यूज : शाहरुख ने की मिडीया से बदसलुकी !! काही च्यानेल्स वर तर बातमीचे एपिसोडस सुरु असतात. कदाचित एखाद्या नेता किंवा सेलेब्रिटी कडून हे बातम्यांचे कंत्राट सुद्धा घेत असतील. (हिरो–हिरोईनचं लग्न, तिची मंगळागौर(!), डोहाळजेवण, बाळाचं बारसं इ. सगळ्यांसाठी अमुक अमुक कोटी ! देव न करो पण घटस्फोट झालाच तर त्याचा वेगळा चार्ज लागेल ! ). बातमी फिरवणं, अर्थाचा अनर्थ लावणं ह्यात तर मिडीयाचा हात कोणीच धरू शकणार नाही. (याविषयी एक काल्पनिक किस्सा नेहमी सांगितला जातो. एक धर्मगुरू पहिल्यांदाच एक गावाला भेट द्यायला गेले. विमानतळावर त्यांचे आगमन होताचं पत्रकार त्यांच्या भोवती गोळा झाले. एकाने प्रश्न विचारला ,"या गावातल्या वेश्यावस्तीला आपण सदिच्छा भेट देणार आहात का?".यावर धर्मगुरुंनी प्रतिप्रश्न केला," या गावात वेश्या आहेत का?”. लगेच टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज : विमानतळावर उतरताक्षणी धर्मगुरूंचा पहिला प्रश्न ! या गावात वेश्या आहेत का ? दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण मिडीयाने सगळ्यात जास्त उपयोगात आणली आहे. एखाद्या नेत्याच्या भाषणातलं किंवा मुलाखतीतलं वाक्य उचलायचं. आधीचे संदर्भ काढून भलत्याच संदर्भात ते वाक्य जनतेसमोर आणायचं. मग दुसर्या पक्ष्यातल्या नेत्यांची त्यावर प्रतिक्रिया घ्यायची. झालं भांडण सुरु ! यात आणखी एक प्रकार आहे. चार टाळकी गोळा करून कोणत्याही विषयावर चर्चा सुरु करायची. (त्यात चेतन भगत सारखे थोर विचारवंत सुद्धा येतात). चारही टाळकी विषय बाजूला ठेऊन एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढतात. एक वेळ अशी येते की कोण कोणाच्या प्रश्नाला उत्तर देतंय (का देतंय?) हेच कळत नाही. मग वृत्तनिवेदक रेफ्री असल्यासारखे त्यांच भांडण सोडवतात. तो अर्णव गोस्वामी तर देशाचा सरन्यायाधीश असल्यासारखा चर्चेचा निकाल जाहीर करून मोकळा होतो. आजकाल मिडीयाने एक नवीन प्रकार सुरु केला आहे. एखाद्या घटनेची बातमी न देता त्या घटनेवरच्या वक्तव्यांची /प्रतिक्रियांची बातमी देतात. जिभेला हाड नसलेल्या नेत्यांनी भरलेल्या आपल्या देशात अश्या बातम्या मिळणं काही फार कठीण नाही. मग त्यावरून वाद सुरु होतात. मिडीयावाल्यांची दिवाळी सुरु ! रेड्यामुखी वेद वदता, मिडीयाची पेटली फ्युज ! ज्ञानियाची वाळीत झोपडी अनं रेड्याची ब्रेकिंग न्यूज !! देशात किंवा एखाद्या राज्यात निवडणुका असल्या किंवा क्रिकेटचा सामना असला की ब्रेकिंग न्यूज सुरु. तिकडे खेळाडू प्रात:विधी आटपत असतात तेंव्हापासून यांचे क्यामेरे सज्ज असतात. सेहवाग की मां किंवा धोनी के पडौसी यांच्या मुलाखती चालू होतात. निखिल चोप्रा / साबा करीम सारखे क्रिकेट तज्ञ येतात. ते द्रविडच्या तंत्रातल्या चुका सांगतात, झहीर खान ला टिप्स देतात. अश्यात जर भारत सामना हारला तर काही खरं नाही. सगळ्या टीम ला कोर्टात उभं करून परस्पर शिक्षा सुनावून मोकळे होतात. निवडणुकीच्या काळात उमेदवारांना सळो की पळो करून सोडतात. उत्साहाच्या भरात एखादा उमेदवार किलोभर आश्वासनं देतो. इकडे लगेच हे ती आश्वासनं पक्षाचा जाहीरनामा म्हणून दाखवतात. मतदार विचारत नसतील इतके प्रश्न हे त्या उमेदवाराला विचारतात. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेची घाई विजयी पक्षाएवढीच मिडीयाला झाली असते. शपथविधीनंतर चोवीस तासात ,सरकार दिलेली आश्वासनं कधी पूर्ण करणार यावर चर्चा सुरु होते. आणि आठ दिवसात सरकार निष्क्रिय असल्याची पावती दिली जाते. देशात सगळ्यात जास्त अफवा मिडीया द्वारे पसरत असतील. क्रिकेट वैगेरे ठीक आहे पण एखाद्या गंभीर घटनेचं मिडीयाकडून होणारं थिल्लरीकरण बघून वाईट वाटतं. रेल्वे अपघात, भूकंप, दंगल यासारख्या दुर्दैवी घटनांच्या चित्रफिती वारंवार दाखवल्या जातात. याविषयी एक नमूद करावसं वाटते. ११ सप्टेंबर च्या हल्ल्यात जवळजवळ ३००० लोकं मारले गेले. पण हल्ल्याची एक चित्रफीत सोडली तर दुसरी कोणतीही चित्रफीत किंवा फोटो अमेरिकन मिडीयाने दाखवले नाहीत. आपल्याकडे मृतदेहांचे फोटो दाखवतात , मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतात,आपको कैसा लग रहा हैं वगैरे प्रश्न विचारतात !! जनतेला बातम्या हव्या असतात. इथे त्यांना वादाचे विषय पुरवले जातात. आपल्याकडे मंगलकार्यानंतर देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे. आजकाल कोणत्याही घटनेनंतर मिडीयाचा गोंधळ घालण्याची पद्धत रूढ होते आहे. फरक एवढाच की देवीचा गोंधळ यजमानांच्या इच्छेने होतो. पण मिडीयाचा गोंधळ यजमानांवर लादला जातो !! "गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता" ह्या म्हणीत थोडासा बदल करून असे म्हणता येईल गाढवांनीचं वाचली गीता जणू कालचा गोंधळ पुरे नव्हता , म्हणे कृष्ण सावळा गोंधळी ,अरे आमचा काळ बरा होता !!
  • Log in or register to post comments
  • 9767 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/19/2015 - 13:28

Permalink

तुमच्याकडे जर भरपूर फावला वेळ असेल तर...

१. मालिका बघा. २. बातम्या बघा. आणि पैसे पण जास्त झाले असतील तर... ३. हिंदी सिनेमे बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/19/2015 - 13:33

In reply to तुमच्याकडे जर भरपूर फावला वेळ असेल तर... by मुक्त विहारि

Permalink

१. मालिका बघा.

१. मालिका बघा.
थोडक्यात स्वतःच्या डोक्याला "भुंगा" लावुन घ्या असचं की नाही. =))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/19/2015 - 13:47

In reply to १. मालिका बघा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

स्वतःच्या डोक्याला "भुंगा" लावुन घ्या असचं की नाही.

हे असे परखड सत्य, बर्‍याच जणांना पटत नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 02/19/2015 - 20:45

In reply to स्वतःच्या डोक्याला "भुंगा" लावुन घ्या असचं की नाही. by मुक्त विहारि

Permalink

डोक्याल भुंगा कसा "लागत" असेल

डोक्याल भुंगा कसा "लागत" असेल असा प्रश्न पडलाय..! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/19/2015 - 21:28

In reply to डोक्याल भुंगा कसा "लागत" असेल by हाडक्या

Permalink

कधीतरी ती ५००-६०० सासवांच्या

कधीतरी ती ५००-६०० सासवांच्या बरोबरीनी असलेल्या ५-६ सासवा असलेली सिरिअल बघा...किंवा तो देसाई कुटंबियांचा रेशिमगुंता बघा...किंवा ती जावै विकत घ्यायची सिर्यल बघा....डोक्याला बरेचं प्राणी लागतात =))
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 02/20/2015 - 16:35

In reply to कधीतरी ती ५००-६०० सासवांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

लग्नाआधीच बायकोला विचारलं

लग्नाआधीच बायकोला विचारलं होतं "एकही मालिका बघत नसशील तर बोहल्यावर उभे राहू". ठ्ठो हसत ती हो म्हणाली आणि आजतागायत घरात एकही मालिका पाहिली जात नाही. घरात समाधान आहे, जान्हवीची चिंता नाही की कोणा श्रीबाळाची काळजी नाही. बादवे, लग्नाळू लोकांनी हा सल्ला (सुखी संसाराची १०१ रहस्ये वगैरे वगैरे) शिरेसली घ्यायला हवा असं आता स्वानुभवावरून म्हणू शकतो .. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/20/2015 - 21:35

In reply to लग्नाआधीच बायकोला विचारलं by हाडक्या

Permalink

आपल्या सुविद्य पत्नीसं एखादी

आपल्या सुविद्य पत्नीसं एखादी २६-२७ वर्षांची बहिण असल्यासं कळवणे. =))
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/19/2015 - 13:31

Permalink

एखादं आवडणारं गाणं जसा

एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे.
खिक्कं...!!! बातम्यांचं संगीत एवढंही वाईट नाही बरं का.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 02/19/2015 - 14:05

Permalink

काल्पनिक नव्हे, सत्यच

धर्मगुरूसंबंधित किस्सा काल्पनिक नव्हे तर खराच घडलेला आहे. सध्याचे पोप यांच्याविषयीचा तो किस्सा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/19/2015 - 14:33

Permalink

हल्ली डिबेट नावाचा जो काही

हल्ली डिबेट नावाचा जो काही कॉमन राडा कम वायझेडपणा चालु असतो तो पाहुन टाळकच सरकत माझं ! नुसती आरडा-ओरडी ! त्यातही डिबेटचा सुत्रधार { अर्णब पासुन सगळे } दुसर्‍याला बोलण्याचा पूर्ण वेळ देतच नाहीत. अर्णबच्या आरडा-ओरडीची स्टाईल बाकीच्या मंडळींनीपण आत्मसात केली आहे ! { झी-न्यूजचा कोण एक मोटु आहे, तो वेळा वेळाने विचारत असतो, व्हॉट्स युअर टेक ऑन धिस ? } डिबेट संपल्यावर डिबेटचा विषय काय होता ? हेच तुम्हाला समजणे कठीण जाईल इतका शाब्दिक गोंधळ घातला गेलेला असतो... न्यूज चॅनल आणि सासू-सुन मालिका यात काही अंतर नाही, कारण यांच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि अंत यात काही संबंधच सापडत नाही ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on गुरुवार, 02/19/2015 - 14:44

Permalink

त्या आवाजाला संगीत म्हणणं

त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे.
ब्रेकिंग न्यूज१: आशिश नेहराका अपमान ब्रेकिंग न्यूज२: मिसळपाव नामकी साईट पे हुआ अपमान ब्रेकिंग न्यूज३: मिसळपाव मराठी की जानीमानी साईट ब्रेकिंग न्यूज४: 'आशिश नेहरा की बॉलिंग विवादास्पदः चिनार' ब्रेकिंग न्यूज५: चिनार मराठी के जाने माने खेल पत्रकार ब्रेकिंग न्यूज६: '६ बजे: क्या कहते हैं राज ठाकरे विवादास्पद मुद्दे पे'.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 02/19/2015 - 14:58

In reply to त्या आवाजाला संगीत म्हणणं by काळा पहाड

Permalink

:lol:*lol*

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: लेख लिहीण्या ऐवजी एवढंच वाक्य टाकलं असतं की हो !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/19/2015 - 23:11

In reply to त्या आवाजाला संगीत म्हणणं by काळा पहाड

Permalink

बाकी काय म्हाय्त नाय, पन...

बाकी काय म्हाय्त नाय, पन... ब्रेकिंग न्यूज३: मिसळपाव मराठी की जानीमानी साईट ह्ये यकदम बराबर हाय आसं अंतर्गत गोटातूण कळ्ते :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 02/19/2015 - 14:47

Permalink

निसर्गाकडे वळा

टी.व्ही.,स्मार्टफोन, दुचाकी,चारचाकी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा. मग बघा, जीवन किती सुखद होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 02/19/2015 - 20:49

In reply to निसर्गाकडे वळा by तिमा

Permalink

वळलो होतो.

वळलो होतो. मागच्या येळला निसर्गाकडं वळलो हुतो तेव्हा आबा बोल्ले "त्ये "सुलभ" बांधलंय नव्हं, तिकडं वळा.." आता तवापासून समदं आवगड झालय बगा. :))))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/19/2015 - 23:42

In reply to वळलो होतो. by हाडक्या

Permalink

अग्गाग्गागागागा =))

अग्गाग्गागागागा =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अमित खोजे on गुरुवार, 02/19/2015 - 22:57

In reply to निसर्गाकडे वळा by तिमा

Permalink

टिव्ही

खरं सांगायचं तर टिव्ही या माध्यमापासुन दूर असल्याने माझे जीवन खरंच खूप छान चालू आहे. भरपूर पुस्तके वाचता येतात. बाहेर फिरता येते. घरातल्यांशी गप्पा मारता येतात. मी अमेरीकेत रहातो. त्यामुळे तसं पहायला गेलं तर भारतीय टिव्ही तसाही माझा सुटलाच आहे परंतु मी इथलाही टिव्ही बघत नाही. कोणतेही चॅनल घेतलेले नाही. पण याचा अर्थ असा नाही कि मी टिव्ही बघतच नाही. घरी नेट कनेक्शन आहे. त्यावरती नेट्फ्लिक्स आहे, युट्युब आहे. हवे ते कार्यक्रम हव्या त्या वेळेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विनाजाहिराती - व्यत्यय न येता बघता येतात. भारताची क्रिकेट्ची मॅच बघायची आहे? इ.एस.पी.एन.वर हव्या त्या मॅचेस तुम्हाला अगदि नाममात्र किंमतीमध्ये बघण्यासाठी उपलब्ध आहेत. नविन प्रदर्शित झालेला सिनेमा बघायचा आहे? प्रदर्शनानंतर थोड्याच आठवड्यात तो अधिक्रुत (चुकिचा क्रु आहे. बरोबर कसा टाइप करायचा इथ?) वेबसाईटवरती येतो. अगदी नाममात्र पैसे भरून तो बघता येतो. मग कशाला हवंय त्या भरमसाठ जाहिराती मध्येमध्ये? अगदी जाहिरातीच बघायच्या आहेत का? त्यापण जालावर मिळतील. मराठी मालिका बघायच्या आहेत? भारतात प्रदर्शित झाल्याच्या दुसर्या दिवशी त्या युट्युबवरती आलेल्या असतात. आता कुणी म्हणेल कि काय राव! जगात काय चाललंय ते माहिती करायला तरी टिव्ही बघायलाच पाहिजेच कि. त्यावर माझे स्पष्ट म्हणणे आहे की जगात रोज काय चाललंय ते रोज माहिती करून घ्यायची मला माझ्यापुरती तरी गरज वाटत नाही. जर खरंच काही खूप महत्वाची घटना असेल तर ती या ना त्या मार्गाने आज नाही तर उद्या कशीही तुम्हाला कळेलंच. अशा घटना आपल्याला जेव्हा च्या तेव्हा मिनिटाच्या फरकाने कळायला आपले जीवन काही संपूर्णपणे शेअर मार्केट्वरती अवलंबून नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/19/2015 - 23:14

In reply to टिव्ही by अमित खोजे

Permalink

चुकिचा क्रु आहे. बरोबर कसा

चुकिचा क्रु आहे. बरोबर कसा टाइप करायचा इथ? असा : kRu = कृ
  • Log in or register to post comments

Submitted by नाटक्या on Fri, 02/20/2015 - 03:40

In reply to टिव्ही by अमित खोजे

Permalink

तंतोतंत!!

मी पण अमेरिकेतच रहातो. आणि आपण सांगितलेले सर्व तंतोतंत मला लागू पडते. एक फ़रक म्हणजे माझ्याकडे गेली १२ वर्षे टिव्हीच नाही. जे काही बघायचे, वाचायचे ते संगणकाच्या पडद्यावर. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर "अशा घटना आपल्याला जेव्हा च्या तेव्हा मिनिटाच्या फरकाने कळायला आपले जीवन काही संपूर्णपणे शेअर मार्केट्वरती अवलंबून नाही."
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 02/19/2015 - 14:50

Permalink

मिडीया , बॉलीवूड , राजकारणी ,

मिडीया , बॉलीवूड , राजकारणी , क्रिकेट खेळाडू यांच्यावर सर्वसामान्य पब्लिक जरा जास्तच खार खाऊन असतात . फेम , पैसा , glamor हे असले पर्क असल्यामुळेच बहुदा या क्षेत्रातले लोक collective jealousy चा निशाणा बनत असावेत अशी एक थेयरि वाचली होती . वास्तविक इतर कुठल्याही क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्राचे चे आणि इथल्या लोकांमध्ये गुण आणि दोष आहेत . पण प्रसिद्धी च्या प्रकाशझोतात असल्याने यांचे दोष / वाद विवाद पटकन लोकांच्या डोळ्यात भरतात आणि सरसकट करण करणे हा आपला राष्ट्रीय गुणधर्म असल्याने आपण चटकन लेबल लावून मोकळ होतो .
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/19/2015 - 23:18

In reply to मिडीया , बॉलीवूड , राजकारणी , by पिंपातला उंदीर

Permalink

फेम , पैसा , glamor हे असले

फेम , पैसा , glamor हे असले पर्क असल्यामुळेच बहुदा या क्षेत्रातले लोक collective jealousy चा निशाणा बनत असावेत अशी एक थेयरि वाचली होती. याऐवजी; "फेम , पैसा , glamor हे असले पर्क मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जायला कमी करत नाहीत यासाठी ते निशाणा बनत असावेत." ही थिअरी जास्त विश्वासू वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 02/20/2015 - 21:10

In reply to फेम , पैसा , glamor हे असले by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो . बर ते जाऊ दे . कुठल्या क्षेत्रात अस पब्लिक नसत ? कळावे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/20/2015 - 21:47

In reply to मुळात वयाचा आणि अभ्यासाचा by पिंपातला उंदीर

Permalink

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो. माझ्या प्रतिसादात "वय अथवा अभ्यास" हे शब्द कुठे दिसले ??? याबाबतीत तुमची गल्ली चुकली आहे :) असो. माझे वरचे म्हणणे अजून थोडे इस्काटून सांगतो... "फेम , पैसा , glamor यापैकी एका अथवा अनेक पर्क मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जायला कमी न करणार्‍या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्ती असेच निशाणा बनतात." निशाणा बनण्यासाठी इथे क्षेत्र नाही तर वर्तणूक महत्वाची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/19/2015 - 21:35

Permalink

काय झालं ?

इतकं का पेटलाय हो ? बातमांच्या नादात एखादी महत्वाची एनिव्हर्सरी विसरलात कि काय ?? :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/19/2015 - 23:21

Permalink

दहा बारा वर्षांआधी एकदा

दहा बारा वर्षांआधी एकदा सुट्टीत आठ दिवस घरी आलो असतांना दिवसाचे सोळा तास नुसता न्यूज चॅनल बघत लोळत होतो. काय माहिती काय नशा चढली होती. पण त्या आठ दिवसात सगळा इलेक्ट्रोनिक मिडिया कोळून प्यायलो आणि तेंव्हापासून हा प्रकार अजिबात बंद आमच्याकडे. चुकुनही कोणत्याही चॅनलवर स्क्रीनचे २/४/६/८ भाग दिसले की आपोआप पुढे ढकलल्या जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/19/2015 - 23:42

Permalink

बाकी ते ७ च्या बातम्या सुरू

बाकी ते ७ च्या बातम्या सुरू होतानाच्या म्युझिकचा व्हिडो हाय काय कुणाकडं? यूट्यूबवर वगैरे असेल तर लिंक द्या की म्हणावं, लय आवडायचं ते म्युझिक.
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Fri, 02/20/2015 - 00:43

In reply to बाकी ते ७ च्या बातम्या सुरू by बॅटमॅन

Permalink

ट्युन

हीच ट्युन आहे का? जरासा फाईन केला असावा असं वाटतयं त्याच्या आधीचा ८० च्या दशकातला वेगळा होता असं वाटतयं.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 02/20/2015 - 02:36

In reply to ट्युन by सखी

Permalink

बरोबर हीच, एकदम बालपण आठवलं !

बरोबर हीच, एकदम बालपण आठवलं !!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/20/2015 - 22:28

In reply to ट्युन by सखी

Permalink

क्या बात!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

क्या बात!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बहुत धन्यवाद सखी. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com