बर्यापैकी अगोदर संयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ काढण्यास सोयीचे असते या हिशेबाने कट्टा फेम मुवि यानी
कशेळे वनविहार कट्टा मिपाकरांसाठी खूप वेळ देऊन घोषित केला होता. त्यानुसार उत्साहात एक पाहिली यादी जाहीर झाली काहींच्या अचानक आलेल्या अडचणींमुळे त्यातून काही नावे गळाली. पण कट्टा पार पडला.
एकमेकाना फोनाफोनी करता पुण्याहून चिंचवडमार्गे एकूण साडेनउ माणसे जाणार हे नक्की झाले. पण हे सर मुविना ( आपल्या मिपाचे सर रविद्र जडेजा )कळविण्यासाठी त्यांच्याशी नेटवर्क हे नेटवक्र झाल्याने संपर्क होईना. शेवटी चला तसेच जाउ पाहू या पुढे असे ठरले. पुण्याहून अतृप्त आत्मा यांच्या " गाडीत गाडी परागची गाडी " या नेहमीच्या आमच्या व्हाईट अल्टो मधून समीर२०, अआ व फक्त ५० हे पहाटे साडेपाचलाच पुण्याहून निघाले . वाटेत चौकटराजा व अन्या दातार हे त्याना येउन मिळाले. निगडीहून गाडी सुटताच बुवांना एकदम आपण अमेरिकेत गाडी चालवत असल्याचा भास झाला व ते राईट साईड ड्रायव्हिग करू लागले. नशीब असे की पुढून कोणी इंडीयन ट्रक आला नाही. बुवाना चूक कळून आली व गाडी डाव्या लेनला आली.सगळ्यानी ( बुवासकट) सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात 'चौ रा, तेवढी दरवाज्याच्या खिट्टी लावून घ्या " अशी सूचना आली . ती पाळली गेली पण मस्करी करायचा मूड आलेल्या चौरानी " अरे खिट्टी लावायची राहिली चौरा दिसत नाहीत ते .....अ रा रा वाईट झाले. आता पेट्रोल च्या कॉन्ट्रीव्यूशन मधला एक कमी झाला !! " असे चौरानी म्हणतात एकदम हास्य कल्लोळ झाला. व सहलीचा मूड चालू झाला. देहुरोड ला चहा घेतल्यावर फक्त पन्नास गाडी चालवायला बसले. पण सुरवातीला त्यांचे व बुवांच्या गाडीचे काही ट्यूनिंग जमेना. " बुवा, तुमच्या गाडीला परपुरूषाचे वावडे दिसतेय" असे चौरा यानी म्हणतात पुन्यांदा हास्याचा फवारा. तेवढ्यात वल्ली साहेब उर्फ दूदू दू दू दू अगोबा यांचा फोन आला. " आपण न आल्यामुळे जरा मद्यार्क कमी पडला आहे ! अशी चौ रा यांची कॉमेंट येताच पुन्हा हा हा हा हा !
कुठेतरी मिसळ हाणायची म्हणून लोण्यावळ्यात अगदी महामार्ग सोडून आडवळणाला गेलो तर हॉटेलाचे कामगार नुकतेच आळोखे पिळोखे देत असलेले दॄष्य .पुढे आण्खी गप्पा मारीत घाटाचा प्रवास करून खोपोलीत दाखल झालो तरी मिसळवाल्या हॉटेलाचा पत्या नाही. मग आम्हाला वाटू लागले थेट वनविहारालाच नाष्टा करायचा की काय ? खोपोली कर्जत रस्त्याने मार खात व मार्ग काढीत काढीत कर्जत रे स्टे लगतच्या पुलाजवळ आलो. मग पाव उसळ, मिक्स भजी, वडा पाव असा भरपेट नाष्टा झाला.
फक्त ५०,समीर२०, अन्या दातार व अ आ व टेबलावर नाष्टा आहेच .
चौकात स्थानिकांशी चौकशी करून उल्हास नदीवरील पूल ओलांडून कडाव गावात आलो. इथे आंबिवली चौकशी करून मार्गस्थ झालो. सात किलो मीटर वर असलेल्या कोटिंबे गावाल नेणार्या फाट्याने उजवीकदे वळून त्या गावात आलो. पुन्हा एक नदीपूल पार करून मुविना फोन लावला.तो लागला..कुठेही न वळता सरळ या " असे त्यानी सांगितल्यावर पाचच मिनिटात वनविहार येथे पोहोचलो.
समीर२० , अन्या दातार, बुवा व फक्त पन्नास पुण्याचा पहिला ग्रूप व अर्थातच मागे गाडीत गाडी परागची गाडी वनविहार येथे पोहोचल्यावर
वनविहार चे प्रवेश द्वार - वनविहार हे एक पर्यटकांसाठी तयार केलेले छोटेसे स्थळ आहे. एका नदीकाठी वसलेले. नदीवरून भीमाशंकर चा डोंगर दिसतो.हे वनविहार एक रम्य ठिकाण आहे. बॅडमिटन खेळायची सोय, बाहेर एक हॉल, दोन प्रकारच्या सुविधा असलेले निवास , स्वयंपाक घर व जेवणाचा हॉल अशा सोयी आहेत. शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळते. सदर अतिथी गृह एका सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येते व वीकेंड व रविवारी इथे गर्दी असते असे समजले. श्री शिवाजी मिस्कर हे व्यवस्थापक स्वयंपाकी, वाढपी अशी सर्व कामे करतात. बुकिंग वाढले तर तात्पुरते जादा लोक कामाला घेतो असे त्यानी सांगितले. याची स्थापना होऊन २५ वर्षे उलटून गेली असून हे कर्जत जांबरुंग रस्त्यावर आहे.
मुवि व सौ मुवि यानी स्वागत केले. आमचाच ग्रूप त्यांच्या खेरीज प्रथम पोहोचलेला होता. पुण्यातील मितान व त्रिवेणी या आपापले श्री ना घेऊन निघाल्याचा एसेमेस मला आला होताच तो मुविना कळवल्यावर भरली वांगी, फ्लावर बटाटा रस्सा,कांदा भजी भाकरी असे चालेल ना? असा सवाल त्यानी केला व त्याला ओके उत्तर मिळाल्यावर त्यानी फिरून वनविहारातील सोयी दाखवल्या. एव्हाना डॉक खरे हे ही खरेच येऊन पोहोचले. अजया प्रकृति तक्रार करत असतानाही ही मितान च्या येण्याला प्रतिसाद म्हणूनच की काय कॅन्सलेशन चा बेत कॅन्सल करून येऊन पोहचल्या बरोबर श्री अजया होतेच.
चौकटराजा यांचे कॅमेर्यात निसर्गाची ही अनोखी कला बद्ध झाली आहे.
कंजुष काका सगळ्यांशी ओळख करून घेत होते. सुहास झेले, मिस्टर व मिसेस किनकिनाट , श्री व सौ मामलेदार- पंखा ई आल्यानंतर स्वत:ची ओळख करून देण्याचा कार्यक्रम थोडक्यात आटपला. काही जणांनी तेथील पोह्यांचा स्वाद घेतला. बाकी चहाचे घुटके घेत घेत कंजूश काका लहानपणीचे मित्राचे काही किस्से सांगून मनरंजन करीत होतेच.
मस्त हास्यविनोदी मूड मधे बुवा डॉक खरे जी व समीर२०
काही जण अजूनही वाटेवर असल्याने त्यांची प्रतिक्षा करीत जमल्यात गप्पा.
समीर२० अन्या, चौरा, कंजुसकाका, फक्त५० व मुविभॉय कट्टावाला सौ सह. चहाचा आस्वाद घेताहेत.
आला रे बाबानो पुण्याचा दुसरा ग्रूप - हे स्पेशल साडेचार- मितान , श्री मितान, चिं सगुणा, श्री व सौ त्रिवेणी.
कट्ट्यातील एक गोड कार्यक्रम- चिं सगुणा बड्याना खाउ देतेय ! .
मिपाकरांचा बर्डस आय व्ह्यू - खास करून खरे व मुवि
नंतर जरा परिसरात भटकून यावे म्हणून कंजूस काकांच्या मार्गदर्शना खाली जवळच असलेल्या नदीच्या पात्राकाठी असलेल्या गुफा पहाण्यासाठी हा जिना उतरून गेलो.नदीला फारसे पाणी नसले तरी ते नितळ मात्र दिसत होते. पलिकडी दूरवर भीमाशंकरच्या हनुमान तळ्यावरून वर गेले असता ही रिज लागते, तिची किनार दिसत होती. त्या उंच भितींच्या सावलीत कलावंतीण बुरूज दिसत होता.
भीमाशंकर चा हनुमान तळे येथून वर गेल्यास एक रिज आहे . तीवरून खाली पाहिल्यास पोटात गोळा येतो. त्या रिजचे दर्शन नदीकाठावरून. बाजूला डावीकडे कलावंतीण सुळका दिसत आहे
. नदीच्या पलीकडे एक दरी व अलिकडे ही जांबरुंग दरी आहे अशी माहिती कंजूस काकानी दिली. मग सर्वानी गुफात प्रवेश करून तेथील थंडावा अनुभवला. काही मूर्तीही होत्या. भेट देणार्या लोकांची मनोगते लिहिलेली एक वही ठेवण्यात आली होती. फत ५० त्यात डोकावून पहात होते. मग तेथे एक मोठा ग्र्रूप फोटो झाला. मग पायरीवर काही लोक गप्पा मारत बसले तर काहीनी नदी पात्रात प्रवेशून थोडासा पाण्यात पाय बुडविण्याचा आनंद मिळविला.
अत्रुप्त आत्मा, अन्या, मामलेदार प़ंखा व डॉं खरे यांची " खडी मैफिल"
ही दुसरी एक महफिल- सौ व श्री किनकिनाट मुवि व कंजुस काका.
भोजन आस्वादात मग्न असलेला एक कोपरा
थोड्या थोडयाने सगळे जण तो जिना दमत दमत चढत येऊन पुन्हा वनविहारात आले. जेवण तयार असले तरी आम्हा सर्वाना एकत्र भोजनाचा आनंद मिळावा म्हणून दुसर्या एका ग्रूप ला जेवावयास बसविण्यात आले. तो पर्यंत काही जण क्रिकेटची कॉमेण्ट्री एकण्यात मग्न तर काही जण बाहेरील बाकडयावर विश्रांत होउन बसले. जेवण्याच्या हॉल मधे कुणाला काय प्राणी पाळायचे याचा काही नेम नसतो या विषयाला धरून्ही एक अल्प परिसंवाद घडला. अचानक पैसे मिळण्याचे आपले अजब मनोराज्याचा कसा फज्जा उडाला याची दोन मिनिटात हकिगत चौकट राजा यानी सांगितली. जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सामिष व निरामिष असे दोन गट वेगवेगळे बसले. भोजन होईपर्यंत तीन वाजायला आले होते. भारताने मॅच जिंकली . सहलीला यायला एक नवे ठिकाण दिसले , मिपावरील काही नावे प्रत्यक्ष भेटली याचा सर्वानाचा मनस्वी आनंद वाटला. एकमेकांचा दृद्य निरोप घेऊन पुढच्या फेबू मधे इथे चौपट संख्येने येऊ असा ठराव करून सगळे पांगले.
निरोप घेउन पुन्हा फेब्रू २०१६ मधे एकत्र येण्याचा ठराव.
कॅमेरा न २ असलेले टोळके जातानाही तुफान हास्यकल्लोळ करीत निगडीत येऊन पोहोचले मुविंच्या उत्साहाची आठवण काढीत.
वाचने
18205
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्च्या
छान वृत्तांत!
@तिथे एका टोळक्याने बखर
In reply to छान वृत्तांत! by अजया
गाडी सुटताच बुवांना एकदम आपण
चौरा ईष्टाईलचे चिमटेदार वर्णन
फोटो आणि वृत्तांत जबरदस्त.
मस्त हलकाफुलका वृत्तांत..
कट्ट्याला जी काही खलबते झाली
इथे आगवाले भरपूर बंब कमी ....
In reply to कट्ट्याला जी काही खलबते झाली by टवाळ कार्टा
छान व्रुत्तांत्त !!
मी
तुमचे "स्थान" चुकले असेल
In reply to मी by नाखु
चौराकाकांनी मस्तच चिमटे
वृत्तांत, निसर्ग, खादाडी आणि
सुंदर
"एका लेणीची खरडवही" असा पुढचा
'एका दर्पणसुंदरीची खरडवही' हे
In reply to "एका लेणीची खरडवही" असा पुढचा by अन्या दातार
चौराष्टाईल वृत्तांत!! यादिवशी
मस्त खुसखुशित वृत्तांत.
नाय नाय
In reply to मस्त खुसखुशित वृत्तांत. by प्रचेतस
भारी वर्णन चौरा काका!
तो बर्डस आय व्ह्यु +१
In reply to भारी वर्णन चौरा काका! by स्पंदना
पहिल्या चित्रात.....
हाहाहाहा! अगदी अगदी!
In reply to पहिल्या चित्रात..... by चौकटराजा
...........वनविहार - मिपा
छान. उत्तम उपवृत्तांत.
In reply to ...........वनविहार - मिपा by अत्रुप्त आत्मा
जबरदस्त ... एकदम झकास लिवलय
In reply to ...........वनविहार - मिपा by अत्रुप्त आत्मा
ह ह पो दु
न्हाय न्हाय
In reply to ह ह पो दु by चौकटराजा
चौराकाका व आत्मूबुवांचा
+१
In reply to चौराकाका व आत्मूबुवांचा by रेवती
वाहवा!
दुष्ट दुष्ट बुवा,तुमची
येतिया! वैच थांबा!
In reply to दुष्ट दुष्ट बुवा,तुमची by अजया
@तुमची खरडवहीतली अॅडिशन कुठेय
In reply to दुष्ट दुष्ट बुवा,तुमची by अजया
मस्तच लिहिलं आहे अतृप्तबुवा
येतिया! वैच थांबा!
छान वृत्तांत आणि
आत्मुस ही हा हा
एकमेकांची खेचणे ही सुप्त
कॅमेरा नं ४से वृत्तांत!
इनोचे चार मोठे डबे इकडे
In reply to कॅमेरा नं ४से वृत्तांत! by अजया
हा जरा वेगळा प्रतिसाद......
In reply to कॅमेरा नं ४से वृत्तांत! by अजया
सहमत हो काका!
In reply to हा जरा वेगळा प्रतिसाद...... by चौकटराजा
अंदाजाने सर्व ओळखु आले.पण
In reply to कॅमेरा नं ४से वृत्तांत! by अजया
घरी ठेवलेला कॅडबरीचा खोका
In reply to अंदाजाने सर्व ओळखु आले.पण by टवाळ कार्टा
तुम्हाला पण कट्ट्याला
In reply to घरी ठेवलेला कॅडबरीचा खोका by अजया
झैरात!!!! फ्लेक्स छापुन घे रे
In reply to अंदाजाने सर्व ओळखु आले.पण by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to झैरात!!!! फ्लेक्स छापुन घे रे by कॅप्टन जॅक स्पॅरो
वाह
वॄतांत आवडला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?इथे वनविहारात खासगी आणि
सगळे वृत्तांत मस्तच !!!
सगळेच वृत्तांत