मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic Sauce)
जर्मनीतील नाताळच्या मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. कडाक्याच्या थंडीत हे मश्रुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन हे कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ सुख. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. नाताळ मार्केट्सच्या स्टॉल्स वर बघून कसे करतात याचा अंदाज आला होता, सोप्पा वाटला. आंतरजालावर अजून थोडी शोधाशोध केली. त्यावरून मी केलेली पाककृती येथे देत आहे. यात तुम्ही आवडीनुसार बदल करू शकता.
साहित्य -
५०० ग्रॅम मश्रुम्स (शक्यतो लहान आकाराचे घेतले तर जास्त चांगले)
१ मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून
चवीपुरते मीठ
२-३ टेबलस्पून तेल
मिरपूड
कोथिंबीर
गार्लिक सॉस/डिप साठी
४-६ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या (आवडीनुसार कमी जास्त)
१/३ वाटी घट्ट दही/योगर्ट
१/३ Crème fraîche / सावर क्रीम
१/३ वाटी मेयोनीज (ऑप्शनल)
कृती -
गार्लिक सॉस विकत मिळाल्यास ते थोड्या दह्यात मिसळून किंवा तसेच वापरू शकता. अन्यथा हे खालीलप्रमाणे घरी करू शकतो.
१/३ वाटी घट्ट दही, १/३ Crème fraîche / सावर क्रीम (Sour Cream), १/३ वाटी मेयोनीज (Mayonnaise) हे सगळे एकत्र करून घ्या. यात चवीपुरते मीठ घाला. लसूण पाकळ्या बारीक करून घाला. आवडत असल्यास सुकवलेली कोथिंबीर, शेपू, कांद्याची पात किंवा तत्सम हर्ब्ज घाला. सर्व मिसळून घ्या. सॉस तयार आहे.
मेयोनीज वगळून सुद्धा हे करता येते. लसणाची अजून चव हवी असल्यास लसूण पावडर सुद्धा वापरू शकता.
मश्रुम्सचे देठ काढून घ्या. मोठे मश्रुम्स असतील तर अर्धे तुकडे करू शकता.
एका भांड्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला. कांदा ब्राउन होत आला की मश्रुम्स घाला. दहा ते पंधरा मिनिटे मश्रुम्स ब्राऊन रंगावर परता. मश्रुम्स शिजत आले की मीठ आणि मिरपूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळे एकत्र करून २ मिनिटे परता.
गरमागरम मश्रुम्स प्लेटमध्ये काढून त्यावर गार्लिक सॉस घाला. आवडीच्या ब्रेड सोबत सर्व्ह करा.
आवडत असल्यास वाफाळती ग्लुवाईन घ्या आणि खायला सुरुवात करा.
Guten Appetit!
इतर प्रकार -
यात तेलाऐवजी बटर देखील वापरले जाते.
काही जण कांद्याची पात पण घालतात.
एका जर्मन माणसाने दिलेल्या पाकृत त्याला आवडतो म्हणून त्याने गरम मसाला घातला होता. :)
चाट मसाला, पुदिना चटणी असे आवडीप्रमाणे यात बदल करता येतील.
अजून काही सुचले तर करून बघा आणि सांगा.
इतर प्रकार -
यात तेलाऐवजी बटर देखील वापरले जाते.
काही जण कांद्याची पात पण घालतात.
एका जर्मन माणसाने दिलेल्या पाकृत त्याला आवडतो म्हणून त्याने गरम मसाला घातला होता. :)
चाट मसाला, पुदिना चटणी असे आवडीप्रमाणे यात बदल करता येतील.
अजून काही सुचले तर करून बघा आणि सांगा.
वाचने
23641
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
सुरेख दिसत आहे!!
In reply to सुरेख दिसत आहे!! by जुइ
मध्येच घुसलीस .. पहिला नंबर
In reply to मध्येच घुसलीस .. पहिला नंबर by स्रुजा
लोळ
In reply to लोळ by जुइ
(No subject)
आयला ! कसलं भारी दिसतंय ! हे
In reply to आयला ! कसलं भारी दिसतंय ! हे by स्रुजा
सावर क्रीमला नाही गं पर्याय
छान दिसतायेत मश्रुम्स....
केले गं मी. मी जरा मेयो जास्त
छान पाक्रु! एकदम वेगळी!
In reply to छान पाक्रु! एकदम वेगळी! by रेवती
हो. मलाही तसच वाटतय. मश्रुमला
छान लागेल.
इंटरेस्टिंग...
मला मश्रुम लयं लयं आवडत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीकधीकधी मशरुमची तहान फ्लॉउरवर
मश्रूम अत्यंत आवडते असल्याने
In reply to मश्रूम अत्यंत आवडते असल्याने by मितान
करेक्ट.. गरिबांसाठी काय ते
हा तेच सावर क्रीम च्या ऐवजी
छान रेसिपी
मशरुम आवडत नसलेने पास!!
मस्तच..
In reply to मस्तच.. by इशा१२३
तू त्या डिप मध्ये मारी
In reply to तू त्या डिप मध्ये मारी by स्रुजा
हाहा. अगदी.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. by मधुरा देशपांडे
ओक्के. करून बघते.
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. by मधुरा देशपांडे
हां हे घट्ट दही कळीचा मुद्दा
एक वेगळी पा.क्रु. दिल्याबद्दल....
वॉव
मश्रुम आवडत नसल्याने नुसती
अ मु ल चे क्री म चा ले ल का?
In reply to अ मु ल चे क्री म चा ले ल का? by त्रिवेणी
अमुलचे क्रीम म्हणजे कुठले
काय टेंम्प्टिंग दिसतायत
रेसिपी आवडली, करून पहाणार!
In reply to रेसिपी आवडली, करून पहाणार! by बहुगुणी
या व्हिडिओत दाखवलेले टेक्स्चर
In reply to या व्हिडिओत दाखवलेले टेक्स्चर by मधुरा देशपांडे
अगं सायटं दही तेवढं घट्ट असेल
In reply to अगं सायटं दही तेवढं घट्ट असेल by स्रुजा
हो क्रीमी टेक्श्चर आणि सावर
माझी आवडती डिश
छान पाकृ!
हे डिप म्हणजे तर रँच ड्रेसिंग
In reply to हे डिप म्हणजे तर रँच ड्रेसिंग by सविता
या सावर शब्दामुळे त्या होडन
व्हिडीओमद्ज्ये दाखवलेल्या
मस्त..