तसे विचित्र पोजेस देऊन स्वतःचे कसलेही फोटो काढून घेण्यात नेतेलोक मग्न असल्याचे आपण सर्वांनी पाहिलेच आहे, पण एखाद्या विशेष खात्याचा मंत्री त्या खात्याचं मोजमाप काटा घेऊन मोजताना मी तरी पहिल्यांदाच पाहतोय.
दप्तरांचे ओझे वाढते आहे वाढलेले आहे हि काही आत्ताची बोंब नाही. व ते निश्चितच कमी व्हायला/ करायला हवे. निर्विवाद.
ते किती वाढतेय यावर बर्याच वाहिन्या/ संस्थांनी सर्वे देखील केलेत पण म्हणून मंत्री महोदय लगेच काटा घेऊन मोजायला निघालेच. अरे काय !!
मी या फोटोचं रसग्रहण वगैरे लिहित नाही पण हा फोटो पाहिल्या पाहिल्या आधी मजा वाटली मग आश्चर्य आणि मग खेद.
या फोटोत शी-कि-श्यान मंत्री दप्तराचं ओझं काट्याला लाऊन भलतेच एक्स्प्रेशन देताना दिसतात. व दप्तराचा मालक(हमाल म्हणा हवं तर) त्यांच्याकडे बघत असताना "नेमकं आजच कमी आणलं राव" असे एक्स्प्रेशन देताना दिसतोय.
तर ह्या दुसर्या फोटोत सगळ्या चिमण्या "कोण ग हा @#@$?" असा चिवचिवाट करताना दिसताहेत. (निदान मला तरी)
या पुढे पुस्तकातील मजकूर, गुणवत्ता लक्षात न घेता त्याच्या वजनावर मुलांचे भविष्य लिहितील शी-कि-श्यान मंत्री असा विचार आला कि त्यांच्या हातातील काटा माझ्या अंगावर येतो.
वाचने
3128
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कहर
विनोद तागडे ?
In reply to कहर by माईसाहेब कुरसूंदीकर
आता आरोग्य खात्याच्या किंवा
आरोग्य मंत्र्यांनी काय घोडे
In reply to आता आरोग्य खात्याच्या किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अवघड आहे.
+१
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे