उल्लेखनीय मराठी साहित्याचा पुस्तक-परिचय करुन हवा
केवळ मराठी भाषा दिवस म्हणून नव्हे तर मराठी भाषेसंबंधी बरच काही चांगल या फेब्रुवारी महिन्यात होत असतं. फेब्रुवारी महिन्याचा आणि मराठी भाषेचा निश्चीत काहीतरी ऋणानुबंध असला पाहीजे.
भालचंद्र नेमांडेंच्या बद्दलच्या धागाचर्चेत आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.) असा मिपा सदस्य स्वॅप्स यांचा प्रतिसाद आला आहे.
या निमीत्ताने एक सुरवात म्हणून मराठी विकिपीडियावर माहिती लिहून हव्या असलेल्या मराठीतील १७ पुस्तकांची नावे देत आहे. हि नावे ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके. ( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)
ऋ
ऋतुचक्र (पुस्तक)
क
काजळमाया (कथा संग्रह)
कोसला
द
दुर्दम्य
प
पानिपत (कादंबरी)
ब
बटाट्याची चाळ
बलुतं
बहिणाबाईंच्या कविता
म
मर्ढेकरांची कविता
माणदेशी माणसं
म पुढे.
मृत्युंजय
य
ययाति (कादंबरी)
युगान्त
व
व्यक्ती आणि वल्ली
स
स्वामी
मराठी विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेख वाचनीय होण्यासाथी सर्वसाधारणपणे प्रती लेख किमान दोन परिच्छेद माहितीची (अंदाजे ४००० बाईट्स) गरज भासते असा अनुभव आहे. उपरोल्लेखीत पुस्तके किंवा तत्संबंधी ओळख, परिचय, रसग्रहण, अथवा समीक्षणे, वृत्तांत, टिका माध्यमातून काही आपण जी काही माहिती गोळा व्हावी असा या धाग्याचा उद्देश आहे.
* मराठी विकिपीडियावरील द्वा
* माहिती देताना कृपया आंतरजालावरील इतरांच्या लेखनाचे संदर्भ चालतील पण कॉपीराईट भंग होणारे च्योप्य पेस्ट टाळावे.
* आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन कॉपीराईट मुक्त गृहीत धरले जाईल.
* चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
प्रतिक्रिया
'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके
पूर्णपणे सहमत
ठिक, 'सर्वोत्कृष्ट' हा शब्द
वरच्या यादीतील बहुसंख्य
कोसला, बटाट्याची चाळ, व्यक्ती
खर म्हणजे मराठी विकिपीडियावर
मराठी वाङ्मयकोश खंड ३ रा
बहिणाबाई आणि मर्ढेकर आहेत.
मराठी वाङ्मयकोशाच्या उपयूक्त