पनीर /चीझ/मटार गुजिया /करंजी
णमस्कार्स मिपाकर्स ....
आज खुप दिवसानी मिपावर जिलबी पाडु योग आलाय ;)
नेहमी मी जे ठरवील ते बनेलच असा काही नियम नाही ( म्हणजे माझा नेम नाही )
म्हणजे यु के जाना था जापान और पहुच गये चीन अस वरचेवर माझ्या बाबतीत तरी घडत असत
बनवायला घेतला होता पनीर चीझ रोल अन झाली मटार पनीर चीझ करंजी / गुजिया ईत्यादी ईत्यादी .
दिमाखात किचन मध्ये प्रवेश केला होता आज काही झाल तरी मी पनीर चीज रोल बनवणारच !
पण भाजी तयार झाल्यावर पहिला रोल बनवला तर भाजी इकडून तिकडून बाहेर डोकावू लागली मग कडा पाणी लावून बंद केल्या तर आतली बाजू कच्ची राहिली , मग आधी पोळी बनवून ती एका बाजून शेकून घेतली शेकलेल्या बाजूने सारण घालून बंद करायला गेले तर मेली पोळी वातड झाली काही केल्याने बंद होइना :(
तो पर्यंत असे २ रोल नासवल्यावर रोल्स चा नाद करायचा नाही असे मनोमन ठरवून (स्वताला मनातल्या मनात २-४ शिव्या घालून ) आहे त्या साहित्यात हा प्रकार बनवून टाकला अन माझ नशीब थोर म्हणून आवडला सगळ्यांना ;)
साहीत्य :
१.वाफावलेला मटार - १ वाटी.
२. चीझ - ३ क्युब्स
३. पनीर (किसलेल )- १ वाटी.
४. फ्लॉवर (बारीक चिरलेला ) - १ वाटी.
५. लाल तिखट तुम्हाला झेपेल तितक , मी २ छो. चमचे घेतल
६.आमचुर पावडर - १ चमचा
७. गरम मसाला - २ चमचे
८. मीठ चविनुसार
९. कांदा २ मोठे ( बारिक चिरलेले )
१०. २ सिमला मिरची ( बारिक चिरुन )
११. चाट मसाला ( ऐच्छीक )
१२. मैदा
१३. तेल तळन्याकरीता
१४. ओवा १ छो चमचा (ऐच्छीक)
१५. भाजलेली बडीशेप १ छो चमचा( ऐच्छीक)
१६. रवा २ चमचे
कृती :
मैद्यात १ चमचा तेल , २ चमचा रवा अन चविपुरत मीठ घालुन कणीक भिजवतो तसा भिजवुन मौ मळुन घेणे
आता कढैत ३ चमचे तेल घेउन त्यात बारिक चिरलेला कांदा घालावा तो हलका परतला की फ्लॉवर घालावा कारणफ्लॉवर आपण वाफवलेला नाही , मग त्यात अनुक्रमे सिमला मिरची अन वाफावलेला मटार घालावा सगळे
छान परतले की त्यात लालतिखट अन गरममसाला घालावा चविनुसार मीठ घालाव भाजी छान एकजीव
परतली की त्यात किसलेल पनीर अन चीझ घालाव वरतुन आमचुर पावडर, ओवा ,बडीशेप, चाट मसाला. घालावा हेझाल आपल सारण तय्यार !
आता मैद्याच्या छोट्या पुर्या लाटाव्या त्यात हे सारण भरुन कडा व्यवस्थीत बंद करुन मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्यात . गरमा गरम सर्व कराव्यात गार झाल्यावर नरम पड्तील बहुदा !
(स्टेप बाय स्टेप फाटू काढ्याच्या नादात आम्ही क्यामेरा तेलात तळून काढला असता म्हणून …. जाऊ दे आपल्याला नै जमणार दिपक भाऊ अन सानिका सारख स्टेप बाय स्टेप :)
आपली नम्र
जिल्बुषा :)


वाचने
13692
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
झकास .............
रेशिपी बरी आहे, फोटु कुठल्या
In reply to रेशिपी बरी आहे, फोटु कुठल्या by सूड
@फोटु कुठल्या साईटवरनं
In reply to रेशिपी बरी आहे, फोटु कुठल्या by सूड
(No subject)
In reply to (No subject) by पियुशा
बरं! बरं! बरं! खले
मस्त गं पिवशे...
वाह ! वाह !
खल्लास
वाहवा!
वावा..
पाकृ व फोटू छान आहेत.
पियुशा इज बॅक!मस्त पाकृ आणि
काहीतरी इंटरेस्टींग प्रकार
In reply to काहीतरी इंटरेस्टींग प्रकार by आनन्दिता
नक्की??
वाह!!!
ह्या करंज्या प्रचंड आवडतं
मस्त दिसतायत करंज्या. नक्कीच
मस्त..
नगरकर ईज बॅक !! जिल्बी, आपलं
छान करंज्या आणि छान कल्पकता.
कल्पक पाकृ
खुसखुषीत करंज्या!! चविष्त
जबरी पाकृ गो पिवशे.
मस्त दिसतायत!
क्या ट्वीटी... अपुनको एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }मस्त पदार्थ ग पियुषा...फोटो
खूप छान आलाय फोटो...कल्पकता
सर्व प्रतिसादकर्त्याचे आभार
बनवायला घेतला होता पनीर चीझ
In reply to बनवायला घेतला होता पनीर चीझ by गणेशा
तळताना पण फोटो .. नक्की
वा वा !
करंजी उचलून तोंडात टाकावीशी
सुरेख