तात्या... हे माझंच घर आहे. तू कधी आला होतास आमच्या कडे असं वाटतंय मला.
कित्येक वर्षं माझ्या आईने आमच्या घरात असंच पाळणाघर चालवलं आहे. बाबा तिला मदत करायचे. तू जे लिहिलं आहेस त्यातला शब्दन् शब्द मी जगलो आहे. एक वेळ अशी होती की आमच्या घरात ४ महिन्याच्या छोटुलीपासून ७वी मधे जाणार्या ताई / दादांपर्यंत सगळा मेळा (जवळ जवळ १२-१४ मुलं) सुखेनैव नांदत होता. त्यातली बरीच मुलं आज मोठी झाली आहेत. कोणी इंजिनियर, कोणी फार्मासिस्ट असे शिकले आहेत. कोणी जास्त शिकलेच नाही. पण या सगळ्यांचा कॉमन फॅक्टर मात्र 'काकू'. बरीचशी मुलं आणि त्यांचे पालक आजही संपर्कातच आहेत असं नाही तर आमच्या सुखदु:खाच्या प्रसंगात आजही आमच्या जोडीने उभे असतात. गणपती वगैरेला मुद्दाम भेटायला येतात. वाकून नमस्कार करतात. काही कुटुंबं तर एवढी जवळ आली की अजूनही प्रत्येक मुंबई भेटीत त्यांना नाही भेटलं तर धरून मारतिल मला. माझी एक 'बहिण' मला या सगळ्या मुळेच मिळाली. माझ्या लग्नात तिचा पण मानपान झाला होता. :)
दुपारच्या जेवणात सगळे आपापला डबा घेऊन यायचे तरी गरम भात, वरण / आमटी हे आमच्या घरचंच असायचं. एकदा गंमत झाली. एका मुलीच्या आईला कळले की काकू रोज दुपारी वरण भात देतात. तसं आई जे पैसे घ्यायची त्यात वरणभाताची बोली नसायची. त्या बाईंना वाटलं की कशाला काकूंना त्रास. मग त्या बाई त्यांच्या मुलीला भाजी पोळी बरोबर थोडा वरण भात द्यायला लागल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीला घ्यायला आल्या तेव्हा सगळ्यांसमोर तिला तिच्याच मुली कडून हे ऐकायला मिळाले, "आई, तुला काकूंसारखी आमटी कधीच येणार नाही. तू नुसती पोळी भाजीच दे. खरं तर ती पण मला आवडत नाही." ती माऊली पिसाटली होती. :) घरी दूधाला तोंड न लावणारी मुलं आमच्या कडे इतरांच्या नादाने गटागट दूध प्यायची.
खूप कडू गोड अनुभव मिळाले. मिळालेला पैसा तेव्हाच खर्च झाला, पण मिळालेली माणसं मात्र आजही आम्हाला सोबत करत आहेत. याहून अधिक काय पाहिजे?
पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!
आमच्या भाग्याने आम्हाला हा वाटा मान्य करणारे पण खूप लोक भेटले.
बिपिन कार्यकर्ते
आमच्या भाग्याने आम्हाला हा वाटा मान्य करणारे पण खूप लोक भेटले.
नंदावैनीवर लिहिंण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. पण तुझ्या या वाक्यामुळे भरून पावलो..!
आपला,
(भाईकाकांचा ष्टुडंट) तात्या.
गंमत म्हणजे, असा एक छोटा मुलगा कॅनडाला कायमचा जाण्याचा प्रसंग जसाच्या तसा घडला होता. एखादं मूल यायचं बंद झालं की काही दिवस मात्र खरंच चुकल्या चुकल्या सारखं होतं. बाकीची मुलं पण जरा दु:खीच असतात.
अवांतरः आत्ता या क्षणी माझे आई - वडिल सुद्धा हे वाचत आहेत.
बिपिन कार्यकर्ते
लेख कम व्यक्तीचित्र नेहमीप्रमाणेच अप्रतिम जमले आहे.
त्या "रक्तापेक्षा जवळच्या नात्याला" ह्यापेक्षा अजुन मोठ्ठी आदरांजली नाही ....
मस्तच.
लिहा अजुन असेच, पुलेशु.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
फार छान
त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!
कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची!
. . . पु.लं.च्या लेखनाची आठवण आली.
नंदावैनींची कथा एकाच वेळी हृदयाला स्पर्श करणारी आहे आणि त्याच बरोबर प्रेरणादायकही. नवरा गेल्यानंतर आलेल्या परिस्थितीला बाईंनी आपल्याला जे शक्य आहे त्या रीतीने तोंड दिले. आणि या प्रक्रियेमधे अनेकानेक कुटुंबाना अनमोल मदत केली.
राहता राहिले मुलांचे , त्यांच्या पालकांचे नि वैनींचे स्नेहबंध. अशा गोष्टींबद्दल विचार करताना माझ्या सारखा नास्तिकसुद्धा मग अशा अनामिक नात्यांच्या बाबतीत पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असे पटकन म्हणून जातो ! :-)
तात्या , फारा दिवसांनी तुमच्या शैलीतले उत्तम काही लिहीलेत. धन्यवाद !
'अप्रतीम' ... लेखणीत खरच ताकद आहे डोळ्यासमोर व्यक्तिचीत्र उभे करण्याची ! असेच छान छान लिहुन आमच्या डोळ्यांना आणी डोक्याला मेजवानी देत जा बुवा !!
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
तात्या, व्यक्तिचित्र तर मस्तचं जमलय पण माझ्या लहानगीचा सांभाळ करणार्या बेबीसिटरचं(विजया) आणि तुमच्या या वैनीचं वर्णन अगदी मिळतंजुळतं आहे. स्वभावाच आणि दिसण्याचदेखील.वरणभात असतो तिच्याकडे. रोज संध्याकाळी घरी आल्यावर मुलिच्या कपाळावर विभुतीही असते. :).
ईतक्या मुलांना सांभाळणं साधं काम नव्हे. बाईमध्ये कामाचा प्रचंड उरक्,हसतमुख स्वभाव आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे पेशन्स असावाचं लागतो. परक्या भुमीवर विजयासारखी काकु भेटल्यामुळे मी देवाचे अनेकदा आभार मानलेत.
पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..! >>> नक्किचं आहे तात्या.
क्या बात है
अप्रतिम लेखन तात्यासाहेब. तुमचे हार्दिक अभिनंदन.
रोशनी ते मंदावैनी हा तुमच्या लेखनात आवाका खूपच विस्तृत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
सुंदर व्यक्तिचित्रण. आवडले.
>> रोशनी ते मंदावैनी हा तुमच्या लेखनात आवाका खूपच विस्तृत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
- धोंडोपंत
मंदावैनी नव्हे हो...नंदावैनी
प्रतिक्रिया
मस्त
१००% हेच
छान आहे
+१
+१ उत्तम!!!! Fina
छान!
माझंच मनोगत...
आमच्या
गंमत
खरच छान!
असेच..
+१
हेच म्हणतो
+१
असेच म्हणतो ...
छान चित्रण
छान वर्णन, तात्या!
नंदावैनी
व्वा
व्यक्तीचि
छानच
ऋणानुबंध
उत्तम
'अप्रतीम' ...
छान
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छानच आहे
हो ना
मस्त.
मस्त लिहिले आहे.
+१
मस्त.
फर्स्ट क्लास!
तात्यानु
क्या बात
सहमत!
सुंदर
+१
भाईकाका प्रसन्न आहेत आपल्यावर
तात्या,
उत्तम व्यक्तिचित्रण
आपुलकीने