घटना जुनी आहे.१० वी झाल्यावर सगळे करता तस मला सेवायोजन कार्यालयात नावनोंदणी करायला जायच होत.
गावाकडुन गादी पकडुन जिल्ह्याला जायला उशीर झाला..१ वाजला.कार्यालयात पोहचलो.
माझे येण्याचे कारण तिथल्या कर्मच्यार्याला सांगितल..त्यांने बोर्डाकडे बोट दाखबल..कार्यालय १ वाजता बंद..
डोळ्यासमोर तो बोर्ड,कर्मचारी,पुन्हा होणारी चक्कर,वाया जाणारा वेळ आणी पेसा नाचु लागला..
त्या कर्मचार्याला काही तरी करायची विंनती केली...
मी" काहीतरी करा साहेब..पुन्हा यायला जमणार नाही."
तो," नियम म्हणजे नियम नंतर या.."
मी," बघा काही करता येत का.."
तो",मी काय बघु ..तुम्हीच पहा.."
सरकारी कर्मचार्यांच्या सुचक बोलण्याबद्दल ऐकुन होतो..मी हिशोब केला..३ बोट दाखवली..त्यांने आणखीन दोन मिसळली..
काम झाल ...मी तासाभरात गावी वापस..
=================================================================================
वरच्या प्रसंगात मी पहिली लाच दिली..नंतर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात जात राहिलो..कधी स्वतःसाठी..कधी दुसर्यासाठी.
"सरकारी काम-सहा महिने थांब"या म्हणीचा प्रत्यय घेत राहीलो.
मी ही "टाईम ईज मनी" म्हणत टाईम वाचवण्यासाठी मनी देत राहीलो..
चपराश्याला चहापाणी देण्यापासुन .एखाद्या क्लासवन अधिकार्याला मिठाई देत माझी लाचखोरी चालु राहीली.
=================================================================================
वरच सगळ आठवायला कारण कालची एक घटना कारणीभुत ठरली.
बर्याच दिवसानी मुळ गावी आलोय.सध्या कुणी रहात नाही ईथे..काल संध्याकाळी ..लाईट चालु करायला गेलो तर बत्ती गुल.
तेवढ्यात शेजारी सांगत आला..विज मंडळाने आमची विज बिल न भरल्या मुळे आजच कापली आहे.
नेहमी प्रमाणे आधी सटकली कारण दोन महीने बिल भरल नाही हे खर होत..पण दोन दिवसापुर्वी सगळ बिल भरल होत.
मोर्चा विज मंडळाकडे वळवला.६ वाजता गेलो..सगळा शुकशुकाट..दोन जण गप्पा मारत बसले होते..
त्यांना का आलोय ते सांगितल..त्यांनी नेहमी प्रमाणे नियमावर बोट ठेवल आणी उद्या पावती घेऊन यायला सांगितल.
आणी माझी बत्ती पेटली..मी ऑनलाईन बिल भरल होत..त्याच समस मोबाईल मधे होता..ते या लोकांच्या ऑफलाईन नोंदीत अजुन आल नव्हत..त्या कर्मचार्याला सगळ सांगितल..तो पुन्हा सुचक बोलला..
या वेळेस मी ५ बोट दाखवली..त्यांने ५ मिसळली..काम झाल ..........लाईट आली.
जाता जाता. - लाच देण चांगल का वाईट? याचा विचार मी करत नाही.कारण आजपर्यंत कुठल्याही वाईट गोष्टीत भागिदार झालो नाही.
एक प्रश्न विचारतो...तुम्ही कधी अशी लाचखोरी केली आहे ?
( मिपावरील सरकारी कर्मचार्यांनी हलके घ्यावे.मी सरसकटीकरण करत नाही.)
वाचने
7204
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
काम करण्यासाठी नाही
ते केजरीवाल की कोण ते हे सगळे
तो लाख प्रयत्न करेल हो बंद
In reply to ते केजरीवाल की कोण ते हे सगळे by कैलासवासी सोन्याबापु
+१०००
In reply to तो लाख प्रयत्न करेल हो बंद by स्वामी संकेतानंद
आमचं नशीब थोर
हल्ली अॅंटीकरप्शन खात्याच्या
अजून लाच दिलेली नाही किंवा
"टाईम ईज मनी" म्हणत टाईम
पासपोर्टच्या वेळेस
In reply to "टाईम ईज मनी" म्हणत टाईम by लॉरी टांगटूंगकर
भारी आहे!
In reply to पासपोर्टच्या वेळेस by विलासराव
एक "मी नै त्यातली" अवतार
कंपनी कामामुळे
रेकी
रेकी म्हणजे टेहळणी हो.
In reply to रेकी by अनिता ठाकूर
ओ:
असं कसं?
In reply to ओ: by अनिता ठाकूर
बरं!
Reconnaissance (शॉर्टफॉर्मः
In reply to बरं! by अनिता ठाकूर
हो.
वेळ नसेल तर