एम. एस. ई. बी. आणि संस्कार !
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.?
पलीकडून - हं बॉला?
म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये.
पलीकडून- बरं .
म्हया बिलंदर - अहो, बरं काय? कोणाला तरी पाठवून बिघाड दुरुस्त करून घ्या.
पलीकडून - हं, येईल १५ मिनटात .
म्हया बिलंदर - कोण?
पलीकडून - कोण म्हणजे?
म्हया बिलंदर - कोण म्हणजे, वीज की तुमचा माणूस?
पलीकडून - माणूस.
म्हया बिलंदर - मग वीज?
पलीकडून - तिथून पुढं १५ मिनटात.
म्हया बिलंदर - अहो, संध्याकाळ झालीये पूर्ण काळोख पडलाय. मुलांचा आभ्यास जेवण सगळं राहिलंय आणि…
(पलीकडून खड्याक. फोन ठेवला)
==========================================
तासाभराने
==========================================
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.?
पलीकडून - हं बॉला?
म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये.
पलीकडून- बरं .
म्हया बिलंदर - अहो नव्याने ऐकल्यासारखं काय बोलताय? तुमचा माणूस आणि वीज दोन्हीही आलेले नाहीत.
पलीकडून - हा, तो तर कधीच पाठवलाय काम करत असेल लायीट येईल थोड्याच वेळात….
म्हया बिलंदर - छान, हेच शिकवता का घरी स्वतःच्या मुलांना?
पलीकडून - क्काय?
म्हया बिलंदर - हेच संस्कार देता का मुलांना?
पलीकडून - काय संस्कार?
म्हया बिलंदर - अहो, मी तुम्हाला गेट च्या बाहेरून गेला तासभर बघतोय. घरून फोन आला आणि समजलं वीज नाही. म्हंटल इथून कोणाला तरी सोबत घेऊनच निघावं. तासाभरा पूर्वी फोन केला तेंव्हा तो इथेच गेट वरून. तुम्ही माझा फोन उचलायला आत गेलात बोललात बाहेर येउन बसलात तासभर पेपर वाचलात. पुन्हा फोन आला म्हणून पुन्हा आत गेलात. हे सगळं मी इथून पाहिलं. तुम्ही कोणत्याही माणसाशी बोलला नाहीत, कोणाला पाठवलं नाहीत आणि वर खोटं बोलताय?
पलीकडून - अहो तसं नाही इथे मी एकटाच आहे ना दुसरा कोणी असता तर मीच आलो असतो….
म्हया बिलंदर - म्हणून खोटं बोलताय? घरी मुलांना जर समजलं की त्यांचा बाप सर्रास खोटं बोलतो तर काय परीणाम होईल त्यांच्यावर? काय मत होईल त्यांचं तुमच्याबद्दल?
पलीकडून - चला, मी येतोच तुमच्याबरोबर.
म्हया बिलंदर - अहो पण मग इथे?
पलीकडून - ते बघू हो. कोण नाय मरत ईथे.
याद्या
4245
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
मस्त लिवलंय
एम.ए,सी.बी. मध्ये काही चांगली
In reply to मस्त लिवलंय by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही एमेशिबियन
In reply to एम.ए,सी.बी. मध्ये काही चांगली by गणेशा
नाय , माझा बा होता
In reply to तुम्ही एमेशिबियन by म्हया बिलंदर
+१
In reply to एम.ए,सी.बी. मध्ये काही चांगली by गणेशा
+++१११ टु एक्का!
In reply to मस्त लिवलंय by डॉ सुहास म्हात्रे
एम. एस. सी. बी. चा
खिक्क
माझा मामा आहे एम्.एस्.ई.बी
काही निरीक्षणे
सरसकटीकरण्ण!!
In reply to काही निरीक्षणे by सस्नेह
हा घ्या एम एस ई बी चा अजून एक
हाहा!