एक दिवस शिक्षकांनी वर्गात सांगितले कि उद्या तुमच्या वर्गाचा ग्रुप फोटो काढायचा आहे तरी सर्वांनी प्रत्येकी ५० रुपये फोटोसाठी आणावेत
त्याच वर्गात आपला बाळ्या पण होता, ज्याला लहानपणीच नेता बनायचं किडा चावला होता ...आणि तोच सर्व वर्गाचा नेता होता. जशी त्याने हि सूचना ऐकली ...तशी तास संपल्यावर रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांना म्हणाला कि "हि तर खुली लुट आहे...हे शिक्षक हि शाळा आपल्याला अशीच लुटत राहणार ...मला सांगा कि फोटो प्रिंटआउटला ५० रुपये लागतात का ?...प्रिंटआउट १० रुपयात मिळते ....हि शाळा आपले सर्व शिक्षक राहिलेले ४० रुपये आपआपसात वाटून घेणार. आपल्या वर्गात 60 मुले आहेत....म्हणजे २४०० रुपयाचा भ्रष्ठाचार आपल्या डोळ्यादेखत होतो आहे. अश्या भ्रष्टाचारी लोकांमुळेच देश मागे पडला आहे.तरीच मला वाटले कि हे शिक्षक रोज नाश्त्याला मिसळ आणि सामोसे कसे खातात. भलाईचा जमाना राहिला नाही"
भाषण देवून बाळ्या घरी आला आणि आईला म्हणाला
"आई उद्या शाळेत फोटो काढायचा आहे त्यासाठी १०० रुपये प्रत्येकी आणायला सांगितले आहेत"
आई : "१०० रुपये ? शाळा आहे कि दरोडेखोरांची टोळी ? दर वेळेस असे पैसे घेत असतात त्यात फी वेगळी. आपल्या पैशावर ऐश चालू आहे तुमच्या शिक्षकांची ...आमच्या काळात असे काही नव्हते. थांब तुझे बाबांकडून पैसे घेवून तुला देते"
बाबा कामावरून घरी आल्यावर
आई : अहो ऐकलेत का बाळ्याचा उद्या शाळेत ग्रुपफोटो काढायचा आहे...शाळेने २०० रुपये मागितले आहेत"
हि साखळी अशीच पुढे चालू आहे
अश्याच तऱ्हेने महागाई वाढत आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2567
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरुवात फोटोग्राफर पासुन झाली
चान चान
मस्त
माई
In reply to मस्त by माईसाहेब कुरसूंदीकर
"ह्यां"चं मत राहीलच की ओ
In reply to मस्त by माईसाहेब कुरसूंदीकर
माईंचे हे
In reply to "ह्यां"चं मत राहीलच की ओ by डॉ सुहास म्हात्रे
छे
In reply to माईंचे हे by बोका-ए-आझम
एक गिर्हाईक फोटोग्राफर कडे
लय भारी...
In reply to एक गिर्हाईक फोटोग्राफर कडे by जेपी
आयटीवाल्यांचा उल्लेख नसल्याने
अच्र्त ब्व्ल्त
In reply to आयटीवाल्यांचा उल्लेख नसल्याने by बॅटमॅन
मस्त!
आवडलं