Skip to main content

एक विचार

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 02/02/2015 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला. मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की. आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते. पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का? आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का? मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता. म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे. त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम. त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे. लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.' आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे. आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे. आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.

वाचने 37566
प्रतिक्रिया 185

प्रतिक्रिया

छान विचार आहे अशा वेळी स्वाती ठकार यांची आठवण येते। कुठे गेल्या बरे स्वाति ताई ।।।।।।

In reply to by सामान्य वाचक

स्वाती ठकार मिपावर होत्या? ये तो न्यूज हय मेरे लिये! एक पाय मुडपून बुचकळ्यात पडला आहात का कधी? आधी मजा येते आणि मग येतो घाम. पाठोपाठ लसणाचा उग्र दर्प.

In reply to by आदूबाळ

पण हा लेख वाचून वाटले की हव्या होत्या ईथे अशा सुरेख आणि विचार प्रवर्तक लेखासाठी तसेच सुजाण वाचक हवेत ना

In reply to by बॅटमॅन

भालकी कारवारच्या संग्रामाचे लसणीच्या भाप्कार्याचे उलटे चालत जाण्याचे पाकातल्या उंदरांचे एका हातात चिकन तलवार आणि बेफाम सायकल चालवण्याचे ... ...थरथरीचे ...गेले ते दिन गेले

In reply to by बॅटमॅन

मी रोज कोबीची भाजी खात असे. तलवारींनी कोबी कापायची आणि त्याच्यावर सांभार मसाला मी भुर्भूरायची. एक डोळा शत्रूवर तर दुसरा भाजीवर अश्या अवतारात मी तासंतास बसायची. हा झाला माझा अनुभव. तुमचा पण सांगा नां... लसणाची चटणी खावून सराव करावा.. भपकारा येतो

In reply to by बॅटमॅन

  • कविता दर्शित चौधरी हि आमच्या कौलोनीत राहते आणि हि लोकांचे भांडे चोरण्यात पटाईत आहे. माझ्या घरून तवा पळवून नेला. मी हुंकार दिला आणि घराबाहेर जाऊन गर्जना केली. तेव्हा आली बाहेर गाऊन मध्ये आणि दिला तवा परत. आत्ता प्रतिक्रिया देतेस काय? येऊ का घरी उद्या परत? करू का गर्जना? वटारू का डोळे?
  • हि गोष्ट वाचून मला माझीच एक कहाणी आठवली. माझा धाकटा मुलगा प्रथमेश तेव्हा १३७ महिन्याचा होता. मी निघाले घरून घर शोधायला. तोंडात मी पुटपुटत होते.. "काहीतरी कुठेतरी कसेतरी थांबा"... अशे शब्द. इतक्यात भरधाव वेगानी एक माणूस धावत गेला. मी पण काही कमी नव्हते.. मी दुडक्या चालीत त्याच्या मागे गेले बघायला कि जातोय कुठे. मी तिरपी चालत असतांना शिंक आली. मी एकदम सरळ झाले. मग मी गुडघे दुमडून चालायला लागले. एका हातात शंख होता आणि दुसर्या हातात पिशवी. पिशवीत चिकन. तोंडात भात आणि कानात डूल. अश्या अविर्भावात मी शोधत होते घर.

In reply to by अनुप ढेरे

हा लेख वाचून मी खिक कन हसले. ओळखतो का रे मला तू सम्मित? दहावीत आहेस का रे? परीक्षा झाल्यावर उलट धावायचं सराव कर. गुढघा दुमडून शिंक देऊन बघ कशी मजा येते ते. मी पण दहावीत अभ्यास करायची. जेव्हा गूढ रात्र व्हायची आणि दूर कुत्रे भुंकत असायचे तेव्हा मी चिखल तुडवत एकटीच बाहेर पडायची आणि लिंबाच्या झाडावरून लिंब काढून आणायची.. आणि बसायची चोखत... एकटीच, शांत, आणि मग्रूर.. डोळ्यात पेटायचा अंगार.. आणि श्वास व्हायचा गरम.

In reply to by सामान्य वाचक

स्वाती ठकार, पोतदार पावसकर मॅडम, सप्तर्षींचं मांजर आणि ब्रम्हेबुवा ट्रीपला गेलेत ब्रम्हेंच्या नव्याकोर्‍या ९९ सी.सी. लुनावरुन क्वाड-सीट... :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

क्वाड-सीट.
काय राव तुमी तुमाला आमी अस्सल मराटी शब्द सांगतो हिते.. जसे डब्बल शीट तसे टिब्बल शीट आणि चौब्बल शीट. कळ्ळे का ?

In reply to by हाडक्या

हे अगुदरपासुन म्हैती हाये हाडुकराव!!! क्वाड शीट वेगळ्या कारणासाठी लिवलयं. ब्रम्हेंचा सुप्रसिद्ध लेख आणि त्यावरच्या सुप्रसिद्ध प्रतिक्रिया वाचा मग समजेल :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्रह्मेंचा लेख (आणि त्यावरच्या ऐतिहासिक प्रतिक्रिया) कितीक वेळा वाचलाय हो पण दर वेळेस नवीन काही तरी गवसते. तुमचा रेफरन्स नाही लक्षात आला मज पामरास. जळ्ळा आमचाच अभ्यास कमी, जरा करा दिवा-बत्ती तुमीच.. ;)

In reply to by सामान्य वाचक

मला तर बाई प्रातःस्मरणीय रामतिर्थकर बाई आठवल्या. त्यांच एक वाक्य मला फार फार आवडतं.."तुम्ही डॉक्टरीण असा, इन्जिनिरीण असा, पायलटीण असा, सिए असा, आय्टी वाली असा तुम्हाला भाकरी करता यायलाच हवी." पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..

In reply to by स्वप्नांची राणी

पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल.. येत नसेल तर शिका, नवर्‍याला सांगा नायतर हाटेलात्न मागवा. च्यामारी तुमाला भाकरी करता येत नाही तर मिपाकरांना कशाला शरम वाटंल?

In reply to by यसवायजी

"नवर्‍याला सांगा..."...हा हन्त हन्त..एक कुटुंब वत्सला असं काहि कमावता पुरूष असलेल्याला म्हणू तरी शकेल का? तुमच आपलं काहितरीच! "हाटेलात्न मागवा.." असं कसं असं कसं...मग मी 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' कसं बनवू..???

In reply to by स्वप्नांची राणी

घरी भाकरी केल्याच् पाहिजेत. बाकि पुरुष मंडळी ना लष्कर च्या भाकरी भाजण्या तुन वेळ कसा मिळणार

आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.
ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? फोडणीचा भात / फोडणीची पोळी ही बेष्ट न्याहारी असते. मला भरपुर आवडते. हे जे काही खाल्याची लाज म्हणा किंवा ओशाळलेपणाची भावना आहे ना, ती पालकांच्या फाजील लाडानी बिघडलेल्या मुलांना असते फक्त.

कुटुंब वस्तला, दुभती, शुभ शकुनी, (शकुनी????) गाय गौतमी आखूड शिंगी मस्तक लिंगी मध्ये द्वारका शेपटीत लक्ष्मी पाप जाईल दर्शनी

आले मेले मिपाकर ओरडत.एक जण कुटुंबवत्सल असेल तर शप्पथ.या बुवा लोकांना कधी चारी ठाव स्वैपाक येणार कधी अाम्ही खाणार,आमचे चष्मे जाणार :( माझ्या मुलाच्या चष्म्याचा नंबर जास्त आहे याला फालतु स्वैपाक करणार्या नवर्याचाच दोष आहे.कधी चुकुन मेल्याकडनं जास्त पोळ्या भात बनत नाही.कुठुन मिळणार आम्हाला पौष्टिक शिळं,फोभा फोपो :( कालच हाटिलातनं मागवून खाल्लं.काय सांगायच्या या व्यथा.मेला कामावरुन घरी येताना पार्सल आणतो.जरा कणिक मळुन ठेवेन,भाजी चिरुन ठेवेन असा विचार करत येत नाही.म्हणून तर समाज देश आम्ही सगळे सुदृढ होत नाही आहोत आणि त्याला त्याचं तर काहीच नाही.कंपनीत पण लंच अवर मध्ये आज तू घरी जाऊन काय बनवणार वगैरे चर्चा नको करायला? तेही नाही.त्यापेक्षा कसं काय वरचे डोळे शेकर्स शेअर करत बसतात. काय सांगू माझं दुःख :(

>> आले मेले मिपाकर ओरडत.. >> बघ ना, तरी वरच्या लेखात 'याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव' असं स्पष्ट लिहीलय!

जे वाटतं ते लिहिता येणं हे कौशल्य कमी लोकांमध्ये असते. लिहीत रहा. इतरांचेही विचार कळतील. बाकी दंगा कंपनीला गुदगुल्या होण्याचे कारण नेमके लिहिलेत तर लेखिकेला कळेल. अन्यथा उपयोग नाही. नुसता दंगाच घालायचा असेल तर चालू द्या... :)

In reply to by मितान

ओके ग अाज्जे.तुझ्या काळात तू घरी होतीस.निवांत उकडशेंगोळे नातवंडांना करुन घालायचीस.काय काय खाऊ बनवुन नातवंडांच्या ढेर्या वर यायच्या, अगदी सुदृढ पोरं!!.तेव्हा आजोबा फक्त जेवायलाच माजघरात येत असत.पण आमच्या काळात आम्ही दोघंही बाहेर पडतो.काम करतो,दमतो पण एक विचार फक्त 'ती'नेच करायचा हे जे गृहितक गंडलंय त्यावर वरचा प्रतिसाद आहे.लेखिकेने आपले विचार छान मांडलेत,प्रश्नच नाही पण तिने नकळत स्वतःलाच फक्त देशाच्या समाजाच्या मुलांच्या सुदृढतेला फक्त घरी बसून मुलाना चारी ठाव जेऊ घालणारी स्त्रीच असते हे गृहित धरलंय ते खटकलन् हो!!

अतिशय व्हॅलिड विचार आहे आणि खूप महत्वाचा दुर्दैवाने बहुतांश पालकांना या गोष्टीची काळजी नाही. म्हणजे मुलाला/मुलीला काही झालं आणि एखाद्या डॉक्टरच्या औषधाचा चटकन गुण आला नाही, तर ते डॉ़क्टरला शिव्या घालतील, डॉक्टर बदलतील, 'अगं यांच्याकडे जा, स्पेशलिस्ट आहे इथे प्रॅक्टिस करतो, अमूक आहे इतकी गर्दी असते' इत्यादी चर्चा करतील, पण मुळात आजारी पडतातच का अशी वारंवार मुलं, हे त्यांच्या मेंदूला शिवणार नाही. मार्क शेजारच्या मुलापेक्शा कमी मिळाले तर ओरडतील/मारतील, पण 'तो नं ही भाजी खातच नाही, तिला ना हे मुळी आवडतच नाही' हे एखादं भूषण सांगितल्याप्रपणे सांगतील. आयपॅड घेऊन देतील. का? 'आमच्यावेळी नव्हते आमच्या पालकांकडे पैसे. आमच्याकडे आहेत. मग काही कमी पडायला नको मुलांना' पण दिवस दिवस त्यावर गेम खेळत बसला मुलगा तर खुपणार नाही यांना. संध्याकाळी घराबाहेर हाकलून (चांगल्या अर्थी) मैदानी (मैदानं कमी झाली आहेत हा मुद्दा वेगळा) खेळ खेळायला प्रोत्साहन देणार नाहीत. हे असं सगळं चाललेलं असताना कशी काय मुलं सुदृढ होणार? म्हणजे बहुतांश पालकांनाच जर सुदृढतेचं महत्व कळत नसेल, तर मुलांना ते कसं पटणार?

ज्योतिताई, पण शेवटच्या ३ पॅरामधले विचार खरच योग्य आहेत का याचा तुम्हीच विचार करून पहा. १. लंचअवर मधल्या गप्पा इतक्या मर्यादित विषयांवर असणेही गोष्ट भूषणास्पद आहे का ? २. बागेत वगैरे फिरायला नेणे या गोष्टी आजचे पालक मुलांसाठी करत नाहीत असे म्हणायचे आहे का ? ३. मुलांचा, कुटुंबाचा त्यांच्या आरोग्याचा विचार फक्त स्त्रियांनीच करावा असे तुमचे मत आहे का ? ४. ऑफिसात जादा काम करून दमलेल्या स्त्रीने उशीर झाला तर बाहेरून खाणे मागवणे वाईट आहे तर तिच्या शक्तीबाहेरच्या गोष्टींसाठी तिने काय करावे ? ५. सुदृढ समाज, देश यांना सुदृढ बनवणे म्हणजे स्त्रियांनी(च) धावाधाव करणे असे आहे का ? ६. मुले, कुटुंब, समाज देश यांची जबाबदारी नवरे/पुरुष यांच्यावर नाही का ? तूर्त इतकेच पुरे. तुम्ही याची उत्तरे जरूर द्याल अशी आशा आहे.

अतिशय विचारी आणि उत्तम लेख ! बूऱ्झ्वा समाज्यात अस्ले काही लिहिले की तुम्ही ताबड्तोब प्रतिगामी .. अपर्णा रामतीर्थकर वगैरे ... ! स्त्री - पुरुष समानतेच्या फाजीलपणाने कुटुंब संस्थेचा कणाच मोडला आहे हे सत्य तुम्ही मांडले आहे आणि या धड्धडित सत्याकडे डोळसपणे पाहण्याची निर्भिड्ता आहे कुठे ? पैसे मिळवता आले म्हणजे आमची निसर्गदत्त वैषिष्ट्ये आम्ही टाकून द्यावीत की काय ? बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे .. एखाद्या घरात (आणि हल्ली असे बर्‍याच घरात असते ) बायको नवर्‍यापेक्षा अधिक कमावू लागली की नवर्याने मुले प्रसवावीत की काय ? निसर्गाने अतिशय सुसंगतपणे स्त्री- पुरुषाच्या शरिराची रचना केली आहे आणि त्याच्या सुसंगतपणे राहीले तर आयुष्य सुखकर होते. पण आयुष्य सुखकर हवयं कुणाला ? लोकांना फक्त पैसा हवा आहे ! आधिक सुख म्हणजे अधिक पैसा असले भंपक सिद्धान्त उराशी बाळगले की आयुष्याची कुत्तर ओढाताण होतेच होते ....! आणि स्त्रीया पुरुषांपे़क्षा अधिक मिळावायला लागल्या म्हणजे आली का स्त्री -पुरुष समानता ? थांबले का स्त्रीयांवरील अत्याचार ? स्त्रीयांनी फक्त चूल आणि मूल करावे असे आता कोणीच म्हणणार नाही , ते चूकीचेच आहे, पण मिळवलेले ज्ञान हे फकत पैसे मिळवण्यासाठीच वापरायचे ? बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ? ते महत्वाचे विषय नाहीत ? की ज्याचा मोबदला पैशात मिळतो तेच काम फकत महत्वाचे ? अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी, आपल्याबरोबर इतरांचे जगणे ही सुन्दर करण्याची क्षमता असणारर्‍या माता भगिनीनी खरोखर घराच्या बाहेर पडून आप्ल्या जागी आपल्या सहचार्‍याला घरचे काम द्यावे , जर खरोखरच तशी अलौकिक्प्रतिभा असेल तर जरूर !! पण बहुतांशी नोकर्‍या करणार्या भगिनी एकतर आय टी हमाल किंवा कारकून ! जिथे पैसे मिळतात हेच आकर्षण ! त्यालाच करियर हे गोंडस नाव ! समानता ही देखील मनात असावी लागते .. ओरबाडून घेता येईल का ?

In reply to by विटेकर

एकदम जबर्‍या!! 'अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या' पुरूषांनीही खर म्हणजे शिकारीला किंवा युद्धावरच जायला हवं..होतात आपले आयटी हमाल नाहीतर कारकून..

In reply to by स्वप्नांची राणी

तुमचा रोख समजला. परंपरेने परिवाराची अर्थिक जबाबदारी पुरुषांकडे असते आणि आपापल्या क्षमतेनुसार ती त्याला पार पाडावी लागते .. मम्ह्णून हमाल तर ह्माल .. त्याला पैसे कमवून आणावे लागतात. म्हणून त्याला शिकारिला जाता येत नाही

In reply to by विटेकर

चुक!! आज ऑस्ट्रेलियात तीन कुटुंब पहाते आहे. नवर्‍याला जॉब नाही, बायको कमावते आहे. नवरा घरी मुले, स्वयंपाक आणि साफ सफाई पहातो. ग्रोसरी वगैरे भरतो. कुछ कम नही है इन परिवारोंमे॥ अ‍ॅन्ड फॉर युअर काईंड इन्फर्मेशन मराठी कुटुंब आहेत हो. नायतर म्हणाल पर प्रांतिय अथवा इंग्लीस असतील म्हणुन. आयला नका होउ ना हमाल मग!! त्या हमाली पेक्षा घरी बसा मुलांना चार चांगल्या सवयी लावा, त्यांचा अभ्यास घ्या! माझ्या घरात माझा नवरा माझ्यापेक्षा चांगल बाल संगोपन करतो आणी अतिशय प्रेमाने. मला जमलच नसत इतक मुलांच न कंटाळता करण. काय तरी काय!! छ्या!! विटू काका, तुम्ही लय वंगाळ बाजू उचलुन धरली.

In reply to by विटेकर

बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे ..
पुरुषाने मुले प्रसवावीत असे कुणीच म्हणत नाही. पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ? पिता का नाही करू शकत ?
बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ?
शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?
अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी,
मग नवरा कमावत नाही त्या कामकरी वर्गातील स्त्रियांनी काय उपाशी मरावे ? आणि प्रतिभावंत, बुद्धीमान नसलेल्या स्त्रीने बालसंगोपन / होम मेकर शिवाय दुसरे काहीच करू नये ? आयटी हमाल किवा कारकून या दोन्ही नसलेल्या लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत आणि त्यांची कुटुंबेही सुविद्य, समृद्ध आहेत हे आपल्याला माहिती आहे काय ? ( विटेकरकाकांचा प्रतिसाद उपरोधिक नसावा असे समजून लिहिले आहे...)

In reply to by सस्नेह

किंवा कारकुन असण्यात काय वाइट आहे? तिला जे आवडेल ते तिला करू दे की . आणि तसेही पुरुष समर्थ बुद्धिमान वेग्रे वेग्रे असतात तर कुटुंब व्यवस्था जीवंत ठेवायाची खंबीर वेग्रे जबाबदारी घेऊ देत की त्याना.

In reply to by सामान्य वाचक

आय टी हमाल किंवा कारकून असेल तरी स्त्रीला घराबाहेर पडण्याची स्वातंत्र्य उपभोगण्याची त्या निमित्ताने चार लोकांशी बोलण्याची जग पाहण्याची संधी मिळते हे काय वाईट आहे? नवर्याला संध्याकाळी "दमून" घरी आल्यावर हात चहाचा कप किंवा शिरा पोहे हे मिळणार नाहीत. किंवा बायको त्याच्या वर आर्थिक दृष्ट्या "अवलंबून" राहणार नाही. पण तिच्या स्वातंत्र्याची हि थोडीशी किंमत द्यायला काय हरकत आहे? आणि नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांचे संगोपन चांगले होत नाही या विधानाला कोणताही शास्त्राधार नाही. माझ्या मते या निवडीचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असायला पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

आपले काही तरी ग्रह करून घ्यायचे आणि तेच बरोबर म्हणून दामटत रहायचे. स्त्री च्या सुखाचा स्वातंत्रया चा बली देऊन कशाला टिकायला हवी तुमची संस्कृति? आणि संस्कृति म्हणजे कुठली हो? २०० का ४०० का १००० का २००० वर्षा पूर्वीची? कारण वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी वेग वेगळ्या प्रथा अणि संस्कृति नांदत होत्या. केरल मधे काही कालापूर्वी पर्यन्त मातृसत्ताक पद्दत होती मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे बाकी संस्कृति अणि समाजा पेक्षा. समाजाचा एक अविभाज्य भाग असलेली स्त्री सुखी नसेल तर तुमचा समाज कसा सुखी होणार हो? स्त्री ही माणुस आहे. समाज संस्कृति इ इ टिकवून ठेवण्याचे साधन नाही

In reply to by विटेकर

म्हणजे काय समजून घेणार का नाही? समजून घ्यायला जमणार की नाही? समजून घ्यायची इच्छा आहे की नाही? समजून घेण्याची पात्रता आहे की नाही? नक्की काय ते कळत नाही त्या बर्र मधून

In reply to by सुबोध खरे

घराबाहेर पडल्याने खरोखरच स्वातंन्त्र्य मिळते का हो ? पुरुष जे जे अगोदर करत होते ते सगळे सगळे ( शिक्षण / व्यवसाय / नोकरी ) केल्यामुळे स्वातंत्र्य येते का हो ? आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?

In reply to by विटेकर

आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?
त्या घराबाहेर पडतात हेच तुमचे दुखणे दिसते. म्हणून असे प्रश्न येताहेत.

In reply to by बॅटमॅन

घर आणि नोकरी करताना ज्याने आपल्या आईची आणि बायकोची ओढाताण बघितली आहे त्याला आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी तरी स्त्रियांनी घराबाहेर पडावे असे वाट्णार नाही. जाऊ दे , तुम्हाला नाही समजाणार ब्याट्मन भाऊ... परदु: ख शीतळ असते ....

In reply to by विटेकर

बायकांनी नोकरी केल्यामुळेच सावरलेली कुटुंबेही पाहिली आहेत. स्वतःच्या केसमध्ये काय झाले त्यावरून जनरलाईझ करणे हे पटत नाही.

In reply to by विटेकर

विटेकर काका तुअम्च्या आई आणि बायकोची ओढाताण नोकरी करण्यामुळे झाली नसून तुमच्या "बायकांची कामे आणि पुरुशांची कामे" या मानसिकतेमुळे झाली आहे अस मला वाटतं. माझ्या हाताला चव आहे, मग मी स्वयंपाक करते, तर नवरा भांडी आवरतो, मी कपडे धोपटते,( हाय हाय वॉशींग मशीन हाय्,पण काही कपडे जरा हाताने धोपटून काढावे लागतात. बर असते ते मनस्वास्थ्याकरता ;) ) नवरा पिळून घेतो. (त्याच्याही मनस्वास्थ्याकरता बरे पडते पिळवणुक ;) ) ही अशी मनाची पारंपारिकता आडवी न आणता जर मिळुन कामे होत गेली तर तुम्ही म्हणता ती ओढातण झालीच नसती. असे कसे हो तुम्ही आई दमून आली तरी आयते पानावर बसलात? मग बायकोला तर मदत करायचा विचारही शिवणार नाही तुम्हाला.

In reply to by स्पंदना

अपर्णा ताई , मी बायकोला अथवा आईला मदत करतं नाही , "आयते" पानावर बसून खातो हा निष्कर्ष तुम्ही काढलात , धन्यवाद ! केवळ वादाकराता तुम्ही हे उदाहरण घेतले अन्यथा तुम्हाला इतके "पर्सनल" व्हायचे नव्हते असे मी समजतो. पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे, तसा माझाही वैयक्तिक अनुभव आहे. बाकी चालू द्या. आता या धाग्यावर मी थांबायचे असे ठरवले आहे.