तर हल्ली त्या इनसिंक वरचे वादक / गायक बघितले कि साधारण लयीत बरोबर चाललेले अचानक तिहायांवर तिहाया आणि काहीतरी तिरकीत धीराकीत करीत समेवर येऊन एकमेकांकडे 'जितं मया' थाटात बघतात हे बघून मला आमच्या गुरुजींनी सांगितलेले काही जुने किस्से आठवले
१. एका प्रख्यात सतारवादक आणि व्हायोलीन वादकाची जुगलबंदी चालू होती ..प्रत्येकाच्या साथीला १ १ मशहूर तबलजी ... जो वाजवत असेल त्याचा तबलजी त्याची साथ करत असे...दोघेही वाजवतांना दोन्ही तबलजी वाजवत होते ...हळू हळू एक जण वाजवतांना दुप्पट तिप्पट चौपट अशा चढत्या लयीत वाजवून मैफिल काबीज करू लागला ... अशक्य तिहाया घेऊन सम गाठतांना पाहून श्रोते भलतेच चेकाळू लागले...हे पाहून दुसर्या वादकाने आपले वादन संपवून पहिल्या कडे देतांना आपल्या तबलजीला सांगितले xxxxखां ठेका चालू रक्खो ...हे ऐकून पहिला वादक चमकला आणि त्याच्या लयक्रीडेला एक्दम खीळ बसली ... आणि मग सगळे छान चालू झाले ..
२ सवाई गंधर्वला एक नर्तक सादर करतांना लय वाढवत वाढवत तबलजीला xxxसादजी और जादा और जादा करत ८ पट लयीत सुद्धा वाढवायला सांगू लागले तबलजी शेवटी तीना तिन्तीना असे अति द्रुत लयीत काहीतरी वाजवू लागले आणि अचानक हे नर्तक मात्र नेहीमिच्या १ पटीत पदन्यास करू लागले ...तबलजी भडकले आणि समरप्रसंग उद्भवला
त्यावरून अजून आठवले कि हल्लीच्या काही प्रख्यात आणि पूर्वीच्या अतिप्रख्यात गायिकांच्या आवाजाची रेंज हि ३-३.५ सप्तके इतकी आहे ...परंतु हल्लीच एक कार्यक्रम ऐकल्या वर तर गाण्याच्या मध्ये आवाज सतत इतका वर ठेवायचा कि ह्यांचे मूळ सप्तक कुठले हेच मुळी लक्ष्यात राहत नाही.....ह्यापुढे त्यांचे गाणे ऐकायचे नाही असे ठरवले ..
असो...तर कुठल्याही चित्तकर्णचाक्षुम्कारिक गोष्टीला टाळ्या पिटायला मिळाल्याशी कारण असे श्रोतेसुद्धा मानतात...आणि हे सगळेच मग फोफावत जाते ...
कालाय तस्मै नम:
वाचने
3331
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
परवीन सुलतानांबद्दल एकदम सहमत
In reply to सहमत by तिमा
अगदी अगदी....
In reply to परवीन सुलतानांबद्दल एकदम सहमत by आदूबाळ
असेच काहीसे नुसरत फतेअलींच्या
तसेच
स्टंटबाजीचं गाणं ऐकून
जे समज्ते ते
In reply to स्टंटबाजीचं गाणं ऐकून by कंजूस
तबला
कानाच्या दोन्ही पाळ्या पकडून
In reply to तबला by राही