Skip to main content

टोपणनाव

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ? आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ? प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे". आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे. [संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””] ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त) , (३० वर्षे )- (३३-६६%) , (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी) त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious. उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही. Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते. माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर

वाचने 25175
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

सोडा हो. सामाजिक संकेत इ. च्या नावाखाली हडेलहप्पीचे समर्थन करणार्‍यांना हे समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही राहु द्या की तुमचं टोपननाव.
ते माझं मी पाहीन हो. सेव्हॉयर काँप्लेक्स नका येऊ देऊ फुकटचा. :) तदुपरि तीर मारणार्‍यांना मारू द्यावेत या मताचा मी आहे. चालूद्या तीरंदाजी.

In reply to by बॅटमॅन

तुम्च्यासारखे हजारो पाहिलेत जालावर मला कशाला कोम्लेक्स येतोय. दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...! -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. :) (तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं) तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा अभ्यास नक्कीच तुमच्यापेक्षा फार फार कमी आहे (किंबहूना बर्याच मिपाकरांपेक्षा फार फार कमी आहे) तरीसुध्धा माझे ४ पैसे... आज्काल मिपावर वादावादी जास्तच जाणवायला लागली आहे असे वाटायला लागले आहे (जवळ जवळ दर दुसर्या धाग्यात) म्हणून माझा "कश्याला उग्गीच वाद...गप्पा मारान्नू...हादाडी करवान्नू...कट्टानी लाईफ" हा प्रतिसाद जास्त करून बॅट्यासाठी होता पण कदाचित तुम्ही जास्त मनावर घेतलात...असो ( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही) हे तुम्हीच लिहिलेले आणि त्यावर मी लिहिलेले की मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम तरीसुध्धा तुम्ही तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. Smile (तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं) तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती. हे लिहिलेत...यावर खालील पैकी जो अ‍ॅप्लिकेबल असेल तो प्रतिसाद वाचावा व दुसरा सोडून द्यावा जर हे फक्त मी मनावर घेतो की नाही इतकेच चेक करण्यासाठी लिहिले असेल तर मी इतकेच म्हणेन की असे लिहिणारे तुम्ही मिपावर पहिलेच नाही आणि शेवटचे तर नक्कीच नाहीत...मैनू फर्क नै पैंदा :) पण जर फक्त मला "गप्प बसा" असे सांगायला असे लिहिले असेल तर ... मी कधी बोलायचे आणि कधी बोलायचे हे मी ठरवतो...तुम्ही सुचना केलीत त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही...भारतीय लोकशाहीचा १ नागरिक या नात्याने तो तुमचा हक्कच आहे...पण मी मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम असे लिहिले असतानासुध्धा स्वतःहून टोमणा मारलात...उग्गीच?? यातला तुम्ही कोणता प्रतिसाद निवडलात ते इथेच धाग्यावर सांगा (व्यनी वगैरे छुपाछुपी नको) मग तुमच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद द्यायचा की नाही...दिला तर कसा द्यायचा ते ठरवेन

In reply to by टवाळ कार्टा

बाकी, तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचं अजिबात कारण नाही. मी प्रतिसाद लिहितांना कोनालाच व्य.नि. फिनी करत नाही. जे असतं ते शंभर टक्के धाग्यावर मग मान असो की अपमान. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतके टंकूनसुध्धा पहिला प्रतिसाद घेतलात की दुसरा ते लिहिलेच नाहीत...माझा अंदाज आहे की दुसरा पण म्हटले नक्की करून घेऊ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान...आता कसे क्लियर केलेत...यापुढे मिपावर तुमच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देणार नाही असा शक्य तेव्हडा प्रयत्न करेन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...! काय पण लॉजिक हाय? मान गए!! फ़क्त नावावरुन कुणाच्या xxमध्ये किती दम आहे ते ठरवता येते? .

In reply to by यसवायजी

निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही, असं माझं मत आहे. वाटल्यास तुम्हीही वरीजनल नावाने किती लिहिता येतं. आणि टोपननावाने किती आणि कसं लिहिता येतं ते नक्की पाहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही याचा मला समजलेला अर्थ असाकी,वरीजनल नावामुळे लिहिण्यावर बंधने येतात. म्हणजेच एखादी व्यक्ति पुर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. (पोटात१ आणि ओठावर १ ऎसे)। तुम्ही असे नसाल (नाहीच), पण मग अशा खऱ्या नावामुळे फ़ायदा काय? कुणाचा? आणि तुमच्या दृष्टीने टोपण नावाचा तोटा काय? कुणासाठी?

In reply to by यसवायजी

ब्रोब्र ना..."काश्मिर भारताचे आहे हे" मिपावरच्या "श्रीगुर्जी" आयडीने लिहिणे आणि "माईसाहेब कुरुंदीकर" आयडीने लिहिणे...फरक आहे ना ;) अवांतर - "श्रीगुर्जी" आणि "माईसाहेब कुरुंदीकर" ही नावे इथे फक्त उदाहरणे म्हणून लिहिलेली आहेत...त्या आयडींचा आणि या प्रतिसादांचा काहीही संबंध नाही :)

In reply to by टवाळ कार्टा

@ टवाळ कार्टा ओ त्या कुरुन्दिकर नसून कुरसुन्दीकर आहेत. त्यांच्या "ह्यांना"असे नाव वाकडे केलेले चालणार नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरेरे...यत्ता चौथीतल्यासारखी च्यालेंज देता? फीलिंग ज्यामच नॉस्टॅल्जिक. वाढदिवसाच्या कचकून शुभेच्छा बरं का प्राडॉ.

In reply to by बॅटमॅन

फीलिंग नॉस्टॅल्जिक असु द्या. प्रयोग आपल्यावर करायला काय हरकत आहे ? प्रयोगासाठी आपण योग्य आयडी आहात असे मला वाटते. आपल्या प्रतिसादातला मोकळे ढाकळेपणा वरिजनल आयडीने दिसतो का ? आव्हान स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं ! बाकी, बड्डेच्या माझ्याही तुम्हाला शुभेच्छा आहेतच... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या गोष्टी तुम्हांला या जन्मी कळणे नाही हे बाकी कळून चुकलंय आता. तस्मात वाढदिवसाच्या शुभेच्छा! शान्ति:पुष्टिस्तुष्टिश्चास्तु!

In reply to by बॅटमॅन

जगातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समजायला माणसाला अनेक जन्म लागतील,मलाही तुमच्या न कळल्या गोष्टी समजायला आणखी एखादा जन्म लागू शकतो हे मला मान्य. पण माझा मुद्दा असा आहे की वरिजनल आयडीने लिहितांना तुमच्यात किती फरक पडतो, किती परिणाम करते मुळ ओळख...ओळख लपविण्याचं खरं कारण काय असू शकेल असं मला तुमच्या निमित्तानं समजुन घ्यावं वाटत आहे, बघा कसं जमतं ते मी फार मागे तर तुमच्या लागू शकत नाही ना, नै का ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जे लोक विचारांपेक्षा व्यक्तीला महत्त्व देतात त्यांनाच खर्‍या ओळखीचे अप्रूप आहे, बाकीच्यांना नाही.

In reply to by बॅटमॅन

उलट अनामिक व्यक्तींच्या विचारांना काहीही महत्व नसतं. (असे अनामिक विचार वाट्सपवर फिरत असतात, क्षणभर वाचतो आणि आपण ते विसरुन जातो) माणुस आणि त्यांचा विचार एकमेकांशी जोड्ला गेलेला असतो त्या त्या व्यक्तीच्या विचारांना महत्व असतं. ”महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला आणि त्यांनी कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसात्मक मार्गाचा विचार मांडला. अल्बर्ट आइंस्टीन हे भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांनी सापेक्षातावादाचा सिद्धांत मांडला. कोणतंही शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाई चौधरी यांची कविता आयुष्यात येणा-या उत्तम अनुभवांची कविता असते. म.फुल्यांनी बहुजन समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. वरील सर्व उदाहरणावरुन प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा विचार आयुष्यभर त्यांच्याशी निगडीत राहीला. म.गांधी, अल्बर्ट आइंस्टीन, बहिणाबाई, म.फुले यांनी वास्तविक जीवनात आणि खासगी जीवनात जे केलं असेल ते आपल्या समोर आलं म्हणुन आपण सर्वांना व्यक्ती विचाराचं महत्व पटतं. व्यक्ती आणि त्याचा विचार हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही सारखाच वाटला पाहिजे, असे मला वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"गुणा: पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः" हे विसरलात की काय हो? महात्मा फुलेंचं आडनाव फुले नसतं तर तुम्हांला काय फरक पडला असता? फुले हे नाव महत्त्वाचं की त्यांचे विचार? मुसलमान नाव दिसले की त्याकडून राष्ट्रभक्ती, उच्चवर्णीय नाव दिसले की प्रो-दलित दृष्टिकोन आणि पुरुषाचे नाव दिसले की स्त्रीप्रधानता वदवून घेऊ पाहणारी मनोवृत्ती अशातूनच तयार होते. अशी उदाहरणे मआंजावर कैक पाहिली आहेत. कर्त्याऐवजी कर्म महत्त्वाचं वाटत नसेल तर उद्या गुन्हेगाराचीही जातपात पहावयास कमी करणार नाही तुम्ही. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद वरकरणी पटत असला तरी काही प्रश्न उभे राहतात. १. विचार ह्याची नक्की काय व्याख्या असावी? म्हणजे एखादा कुजकट टोमणा हा काही विचार होऊ शकत नाही. तसेच एखादा विचार स्वतः आचरणात आणला तरच त्याचे महत्व प्रस्थापित होते काय? एखादी कल्पना किंवा विचार स्वबळावर उभी राहू शकत नाही का? आता योग्य ते उदाहरण आठवत नाही पण कदाचित याचा इतिहासात काही पुरावा असेल. २. भूमिकांची अदलाबदल केली तर विचारांचे महत्व कमी होते काय? म्हणजे सुभाषबाबूंनी सत्य अहिंसा यावर व्याख्यान दिले तर ते त्यांच्या एकंदर आयुष्याशी सुसंगत नाही म्हणून नक्की कुणाचे अवमुल्यन होईल? सुभाषबाबूंचे कि अहिंसेचे? विचारांवर कुणाची मालकी असते काय? ३. टोपणनाव घेतल्याने दमन न होता मोकळेपणाने प्रदर्शित होता येते हा बॅट्मॅन यांनी मांडलेला विचार अर्धवट वाटत आहे. माझ्या मते गर्दीमागे दडून "मारो इसको" असा तोंड लपवून ओरडणारा गर्दीचा पुढारी नसतोच आणि त्याची पुढे येउन झाल्या किंवा होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी घेण्याची धमक नसते. टोपणनाव घेऊन कुणी कुजकट टोमणे आणि निरर्थक वाद घालत असेल तर त्याला स्वातंत्र्याचा उपमर्दच म्हणावा लागेल. टोपणनाव घेणाऱ्याला उत्तरदायित्व घ्यायची भीती वाटते का? ४. माझा चौथा प्रश्न बॅट्मॅन यांना आहे. टोपणनाव घेतल्याने अभिव्यक्तीमध्ये खुलेपणा नेमका कसा येतो आणि खरे नाव वापरून त्याची गळचेपी कशी होते हे जर सोदाहरण सांगता आले तर तुमचे मत समजायला बरे पडेल. चाललेल्या चर्चेवरून मला वरचे मुद्दे सुचले. आता माझे व्यक्तिगत मत. आज मी जळी, स्थळी खऱ्या नावानेच वावरतो, भविष्यात पण तसेच करेन. मला कुठेही कसल्याच बाबतीत अभिव्यक्त होण्याची भीती वाटत नाही. मी चुकीचा असेल तर योग्य व्यक्ती मला बरोबर काय ते सांगेलच. व्यक्त झाल्याशिवाय माझे विचार चुकीचे का बरोबर हे कळणारच नाही. कुठलाही मान-अपमान-टोचणी लावून घेत नाही. त्यासाठी टोपणनाव घेण्याची जरूर वाटत नाही. गम्मत म्हणून किंवा जसे वर एकेठिकाणी सांगितल्याप्रमाणे एकसारखी खूप नावं असली तर टोपण नाव गरजेचे असू शकते. पण ओळख लपवणे चुकीचे वाटते. सतत विनोदी लिहिणाऱ्याने पोटतिडकीने काही गंभीर लिहिले तर आणि सतत गंभीर व वैचारिक लिहिणाऱ्याने निखळ विनोदी टिप्पणी केली तर लोक बावरतात हेही खरेच. लोक नावाला प्रस्तुत अनुभवावरून व्यक्तिमत्व चिकटवतात असा अनुभव आहे. आंतरजालावरील विचारांवरून खऱ्या वैयक्तिक आयुष्यात व्यक्तीवर विशिष्ट लेबल लावून व्यवहार होत असेल तर ते चुकीचेच आहे. हे टाळण्यासाठी टोपणनाव वापरत असावेत. तेंव्हा अजून एक प्रश्न उभा राहतो कि असे टोपणनाव घेऊन विचार मांडणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता किती? खूप गोंधळ होतोय यार… उत्तर द्या कुणीतरी… कुठल्याही नावानी द्या पण उत्तर महत्वाचे … बघा परत गोंधळ...

In reply to by संदीप डांगे

आंतरजालावर टोपणनावाने वावरले तर फालतूचा त्रास होत नाही हा फायदा आहे. व्हायचा तो होतोच काही वेळेस पण जनरली कमी. ते फीचर कुणी ट्रोलिंगसाठी वापरत असेल तर तो दोष त्या ट्रोल माणसाचा आहे, त्या फीचरचा नाही. मआंजावर उदाहरणे पाहिली आहेत याची. खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट? असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.

In reply to by बॅटमॅन

आपली वैचारिक पातळी फार उंचीची आहे, हेही मला मान्य आहे. एवढ्या प्रतिसादात मला हा एक चांगला मुद्दा वाटला की फ़ालतूपणाचा त्रास होत नाही. अगदी मान्य आहे हा मुद्दा. मुळात समोरच्याने टोपननावाला थेट शिवी दिली तर ती मुळ आयडीला ती तितकी लागत नाही. टोपननावाने वावरण्याला एकाच्या बदल्यात दोन शिव्या देता येतात हाही एक फ़ायदा असतो. मुळ आयडीवर त्याचं कोणतंही ओझं येत नाही, हा फ़ायदा. एक दिली तर दोन देता येतात. मुळ आयडीला तसं करता येत नाही. टोपननाव घेणारी व्यक्ति भ्याड असतात असं मी तरी म्हटलेलं नाही ती लोक भित्री असतात असं मी म्हटलं आहे, माझं मत चुक असेलही (ती भित्री नसतात हे सीद्ध झालं तर मला आनंदच वाटेल) भित्री यासाठी म्हणतो की आपली ओळख जालावर सिद्ध झाली तर उगं कटकटी नको असा एक विचार असतो त्यांची भीती साधार असेल पण मी म्हणतोय उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा.
जर समजा खर्‍या नावाची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील का? बहुधा हो. त्यामुळे लोक अनेक गोष्टी लिहिताना बिचकतील. समाजात अनेक अप्रिय अनुभवही येत असतात. खरे नाव दिले तर तेवढ्यावरून लोक सुतावरून स्वर्ग गाठतील. आत्ताही गळ टाकणार्‍यांची संख्या कमी नाही, तेव्हा तर अजूनच त्रास होण्याची शक्यता आहे.

In reply to by बॅटमॅन

खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट?
ओके. गॉट इट.
असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.
भ्याडपणाचा अर्थ समजला

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब, प्रतिसाद आवडला. प्रतिसादातला मनमोकळेपणाने भावला. चर्चेतल्या मुद्द्यांवर अजुन लिहितो. तो पर्यन्त केवळ पोच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

What's in a name? that which we call a rose, By any other name would smell as sweet; नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो, तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले, तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार. --- रोमिओ जुलीएट

In reply to by सस्नेह

नव्हे नव्हे - ते नाव घेणारा आयडी ज्याचा आहे, तो/ ती व्यक्ती मद्य पिणारा असतो/ असू शकतो/ शकते . . !

या धाग्याचा टिआरपी चांगला असेल असं दिसतंय म्हणून ही लि़ङ्क टाकत आहे. जरूर बघा:

मी आधी माझ्या व्हर्जिनल नावाने लिहीत असे. नंतर मोबिल्यावरुन लॉगिन करताना नाव आडनाव टाईपण्यात आणि लॉगिन करण्यात प्रचंड वैताग यायचा. दरम्यानच्या काळात एफेम वर सूड नावाचं एक पात्र विनोद सांगायला यायचं, माझ्या नावाचा तो शॉर्टफॉर्म करुन हापिसात पार म्यानेजरपासनं सगळी लोकं सूड हाक मारायला लागली. मग तोच मिपा आयडी झाला. आता मराठीतला अर्थही सार्थ करतो बर्‍याचदा!! ;)

उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली
डॉक, जरा या गोष्टीतली अंदरकी बात सांगतो. आंतरजाल ज्या समाजाने पॉप्युलर केलं* त्यांचं मत हे वरीजीनल आयडीजची सक्ती होवू नये असंच होतं. किंबहुना त्याचमुळे ही टेक्नॉलॉजी मासेस ला द्यायला त्यांचा विरोध होता. फेसबूक आणि व्हाट्सएप नंतर कुठलाही सोम्या-गोम्या-दादा-भाऊ ब्राऊझिंग करून स्वतःचं मत द्यायला लागला. त्यांची कल्पना होती की बाहेर जसे आपले भाट आहेत तसे इथेही असतील. जशी उलट उत्तरं यायला लागली तसं त्यांचं डोकं भडकायला लागलं. पण काय करता येईना. तेव्हा ही जी वरीजीनल आयडीने लिहायची सक्ती आहे ती या सोम्या-गोम्या-दादा-भाऊ पैकी जे राजकारणी होते त्यांची आहे. अर्थातच, त्यांना किती महत्व द्यायचं हे तुम्ही जाणताच. जोक्स अपार्ट, इंटर्नेट वर अ‍ॅनोनिमिटी (अनोळखीपणा) हा महत्वाचा गुण आहे, नव्हे तो त्याचा एकमेव गुण आहे. जर तो काढून घ्यायचा राजकारण्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा 'कच्चा चिट्ठा' काढून तो वेशीवर टांगायला फारसा अवघड नाही. * म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.

In reply to by काळा पहाड

म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.
हा हा हा.. ह्याच्यावर काकू टाका भौ. मग बोलू.. थोडक्यात सांगायचे तर आयटी एक हत्ती आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या समोर जे येते त्यावरुन स्वतःची मते तयार करतो, मांडतो. मला भारतातल्या या क्षेत्रातल्या RnD ची खूपच कमी माहिती आहे पण जेवढे माहीत आहे त्यानुसार या क्षेत्रात भारतात काही दर्जेदार तयार होत नाही बहुतेक. त्याला कारणपण हा असला (आयटी म्हणजे हमाल आणि लवकरात लवकर मुकादम बनावे आणि आराम करावा) दृष्टीकोन ठेवणारे असू शकतात.

टोपण नावाने लिहिणे किंवा न लिहिणे हा ज्याचा त्याचा व्ययक्तित मत आहे , त्या वरून हमारी तुमरी येण हे काही योग्य लक्षण नाही. ज्याला ज्या प्रकारे योग्य वाटत त्या प्रमाणे त्यांनी मोकळ व्हाव :) तसेच ज्या प्रकारे टोपण नाव घेतात त्या प्रकारे लोक त्या प्रकारे लोक प्रतिक्रिया देतात , मला बरेच वेळा माझ्या विचित्र नाव मुळे गमतीदार प्रतिक्रिया येतात , पण उंदीर नाव घेतलेल्या टोपण नावाला लोक कदाचीत सिंहा प्रमाणे ट्रीटमेंट देणार नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे , त्यामुळे मी सुध्धा हलकेच घेतो मात्र कोणी टोपण नावमागे असलेली खरी ओळख जर सातत्याने लपवत असेल तर ते योग्य नाही

येथे मान्यवरान्नी क्रुपया कुसुमाग्रज, गोविन्दाग्रज, आरती प्रभू वगरै विशयान्वर मत मान्डावे. :)

रोजच्या व्यवहारात, समाजात वावरताना कांही व्यक्तीविषयक वाईट अनुभव, राग, संताप येतो पण व्यक्त करता येत नाही. त्यामुळे हा 'कचरा' मनांत साठून राहून त्याचे दुष्परिणाम (स्वभावात नकारात्मक बदल) भोगावे लागू नये म्हणून पूर्वी होळी, शिमगा अशा सणांना एखाद्याच्या नांवाने 'बोंब' मारण्याची मुभा ठेवली आहे. त्यामुळे ह्या साठलेल्या 'कचर्‍याचा' निचरा होऊन मन पुन्हा शांत होतं. आपल्या स्वभावात नकारात्मतेचा शिरकाव होत नाही. पूर्वी कवी, लेखकांनी आपले नांव लांबलचक किंवा कांही कारणाने आपल्या लेखनाला साजेसे न वाटल्याने टोपणनांवे घेतली. पण त्यांनी त्या टोपण नांवांच्या आडून इतरांवर अवमानकारक लेखन नाही केले. संस्थळांचा सुकाळ झाल्यानंतर प्रत्येकाला टोपणनांवाचा मोह होऊ लागला. तसेच 'टोपणनांवांच्या' आडून समोरच्यावर अकारण वार करण्याची वृत्ती वाढीस लागली. 'माझा वार कसा जिव्हारी लागला आणि तो कसा तडफडतो आहे' ह्या असुरी विचारात आनंद शोधणार्‍यांची संख्या वाढीस लागली. टोपणनांवाने लिखाण करण्यात कांही गैर नाही. पण टोपणनांवाच्या आडून कोणीच कोणावरही असभ्य आणि समक्ष भेटीत वापरली जाणार नाही अशी भाषा वापरू नये. स्वतःच्या मूळ नांवाने किंवा टोपणनांवाने लिहिताना कुणाही सदस्याने सभ्यतेची मर्यादा सोडू नये. तेव्हढे ताळतंत्र बाळगले तरी पुरेसे ठरेल. मी माझ्या मुळ नांवाने सर्वत्र वावरतो. मला कधी कुठल्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही.