Skip to main content

मन...

लेखक शब्दवेडा यांनी शुक्रवार, 28/12/2007 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन पाखरांची किलबिल ओल्या हिरव्या रानी.. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. मन मुग्ध वसंताची चाहूल मन बोचर्या शिशिरातील पानगळ.. मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन शोध सुखाचा दूरवर.. मन दु:ख दडलेले खोलवर.. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल...
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3606
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर कविता... मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी सर्वात जास्त आवडल्या... (मनस्वी) तात्या.

मन टपोरा मोती आळवाच्या पानावर मन नाजूक ज्योती थरथरे दिव्यावर... - प्राजु. शब्दवेडे राव, आपली कविता खूपच छान आहे. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. ही ओळ खास.. - प्राजु

छानच लिहिले आहे. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी खासच.