बहुतेक आपल्या मिपावर आधीही आली आहे याची पाककृती.
पण म्हटलं मिपा आहे घरच तर होवु दे खर्च. आता अपर्णा ताई आणि मितान सारखे रसाळ वर्णन करून लिखाणाची माझ्याकडे प्रचंड कमतरता असल्याने आपली साधी सरळ डायरेक्ट पाककृतीच देते.
साहित्य-
भरताची वांगी(हिरवी) – 1 किलो,
कांद्याची पात – अर्धी जुडी,
लसूण+ मिरची पेस्ट- आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेवुन,
शेंगदाणे—1 वाटी,
तेल- 1 वाटी,
मीठ,
कोथंबीर.
कृती—
भरताच्या वांग्याना टोचे मारून तेल लावून गॅसवर छान भाजुन घ्यावे.
भाजलेले वांगे गॅसवरुन उतरवल्यावर लगेच झाकण ठेवावे. यामुळे वांगे छान मऊ होते.
सगळी वांगी अर्धा तासाने सोलून घ्यावीत. वांगी सोलताना त्यात थोडे तेल आणि वाफेचे पाणी दिसेल ते तसेच ठेवावे.
सोललेली वांगी एकदा चेक करून घ्यावीत, नाहीतर नोन-व्हेज भरीत खावे लागेल.आता ही वांगी बडगीत घेवुन मस्त कुटून घ्यावे.
ही बडगी
आता एका कढईत वाटीभर तेल(यात कंजूषी करू नये) चांगले तापवून शेंगदाणे छान तळून घेवुन बाजुला काढून ठेवावेत.
त्याच तेलात लसूण+मिरची पेस्ट मस्त फ्राय करून कांद्याची पात फ्राय करावी.
खुप शिजवु नये पातीला नाहीतर पात काळपट दिसेल. आता त्यात कुटलेले भरीत घालून एक वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. सगळ्यात शेवटी कोथंबीर घालुन गॅस बंद करावा.
खांन्देशात यात हळद घालत नाहीत. आणि उगाच थोडा टमाटा घातला असेही करू नये.
मी या बरोबर कळण्याच्या पुर्या केल्या होत्या.
कळण्याच्या भाकरी, पुरीची रेसीपी उद्या देते. त्याचे फोटो नवर्याच्या मोबाईल मध्ये आहेत.
फोटोची क्वालिटी मोबाईल ने घेतल्याने बर्यापैकी खराब असल्याची कल्पना आहे.
जाहिरात- आपला एक कॅमेराचा धागा रेफर करून नवीन कॅमेरा मागवण्यात आला आहे. आजच मिळणार असून तिकडे कॅमेरा दाखवण्यात येईल.

वाचने
28655
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
संमं फोटो थोडे मोठे करुन द्या
मस्त गं ! खमंग लागत असेल
नाही. कोणताही मसाला, तिखट
त्रिवेणी..
भुसावळ ला.
:)
In reply to भुसावळ ला. by त्रिवेणी
पाहिजेच होती ही त्रि स्पेशल
त्रिवेणी, सुंदरच करतेस तू
मस्त पा.क्रु.
जळगाव वरून आमचे नातेवाईक
In reply to मस्त पा.क्रु. by मुक्त विहारि
तशी वांगी घेवुच नयेत. वांग
मस्त मस्त !!! आता परत करावे
आह्ह... मला वांग्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }द्राभा नाही हो, दराबा.
In reply to आह्ह... मला वांग्याच्या by मदनबाण
ओह्ह... यस यस्स... करेक्ट
In reply to द्राभा नाही हो, दराबा. by विशाखा पाटील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }अहाहा..
मस्तंच गं !!
खाल्ल्या भरीताचा प्रतिसाद ग
खांदेशी भरीत नाव काढले की कधी
अहाहा! काय आठवण करून दिलीस!
. . . .
मस्तच!
गैर्ह भारी
आढी म्हणजे कुढी रे भो?
In reply to गैर्ह भारी by इरसाल
अापल्याले तं भेटता भो वांगे
In reply to गैर्ह भारी by इरसाल
भरीत खुप आवडतं, त्याचाही
कालच भरीत केलं होतं तेंव्हा
मस्तच गं त्रि. आवडता प्रकार.
मधुरा, मला पण सिंगापुरात
In reply to मस्तच गं त्रि. आवडता प्रकार. by मधुरा देशपांडे
हो अगं मी जांभळी वांगीच आणते
In reply to मधुरा, मला पण सिंगापुरात by मनुराणी
छान टिप मनुराणी .
In reply to मधुरा, मला पण सिंगापुरात by मनुराणी
कळणा= बाजरी+अक्खे उडीद
In reply to छान टिप मनुराणी . by स्रुजा
प्रचंड जळजळ होतेय
वांग्यांनचा सिजन आहे अजुन.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि
त्रिवेणी - कट्टयाला
मग तो मसाला कुठं वापरू गं?
शेंगदाणे तळले होती त्याच काय
येस ! हे भारी असतं !
आम्हीबी खानदेशी
त्रीवेणी तुझ्या हातच्या
अहो शेंगदाणे बाजूला काढलेत
हाच प्रश्न पडलाय
In reply to अहो शेंगदाणे बाजूला काढलेत by काकाकाकू
व्वा. तोंडाला पाणी सुटले.
भरीत.
आज हे केले