बिशी बेले भात
साहित्य : १ वाटी तांदूळ, १ वाटी तुरडाळ ,वांगे १ ,टोमाटो १,कांदा १,फरसबी ,गाजर,वाटाणा,लाल भोपळा आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता .तेल ५-६ चमचे ,मीठ चवीनुसार ,चिंचेचा कोळ १ चमचा ,शेंगदाणे आवडीप्रमाणे ,४-५ कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर,सुक्या लाल मिरच्या २,पाणी आणि सर्वात महत्वाचे एम .टी.आर चा बिशी बेले मसाला ३ चमचे .
माझ्याकडे मातीचे भांडे असल्याने मी काही पदार्थ बनवताना आवर्जून यात बनवते त्यातच हा भात हि येतो कारण मातीच्या भांड्यात बनवलेल्या या भाताची चव फारच अप्रतिम असते .पण मातीचे भांडे नसल्यास साध्या कढाई मध्ये हि बनवू शकता .
कृती :
१) सर्व प्रथम डाळ तांदूळ वेगवेगळे धुवून ते नेहमीप्रमाणे डाळ भाताचा जसा कुकर लावतो तसा लावून घ्यावा .४-५ शिट्या होऊ द्याव्यात .
२)एकीकडे भाज्या धुवून त्यातील गाजर ,लाल भोपळा ,वांगे ,बटाटा चौकोनी आकारात कापून घ्या .टोमाटो बारीक चिरून घ्या .कांदा उभा चिरून घ्या .फरसबी चे एक इंचाचे तुकडे करावेत .
३)एका भांड्यात ३ चमचे तेल घालून ते तापले कि कांदा टोमाटो टाकून परता.
४)मग त्यात चिरलेल्या भाज्या टाका आणि वर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून टाकून वाफेवर शिजू द्या .१० मी .भाज्या शिजतील .पूर्ण गाळ होता कामा नये .अक्ख्या फोडी दिसल्या पाहिजेत अशा बेताने शिजवावे ,आणि त्यात ३ चमचे बिशी बेले मसाला टाकावा
५) एकीकडे कुकर गार झाला असेन तर शिजलेली डाळ जरा घोटून घ्यावी.
६) डाळ भाज्या शिजत असलेल्या भाड्यात टाकावी ,नीट मिक्स करावे .त्यात शिजवलेला भात मोकळा करून टाकावा .
७)त्यात चिंचेचा कोळ ,मीठ टाकून नीट एकजीव करावे .अर्धा पेला पाणी घालून ५-७ मी. शिजू द्यावे .
तयार भात असा दिसेल .
८)एकीकडे एका छोट्या भांड्यात फोडणीसाठी २ चमचे तेल तापवावे .त्यात कढीपत्ता पाने ,लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे यांची खरपूस फोडणी करावी आणि त्या तयार झालेल्या भातावर टाकावी,कोथिम्बिर टाकावी .
बिशी बेले भात तयार .
हा भात थोडा मऊसर असतो यात डाळीचे प्रमाण भाता इतकेच असते .भाज्यांमध्ये अजून फ्लॉवर ,शिमला मिरची अशा भाज्या घेऊ शकता .
४)मग त्यात चिरलेल्या भाज्या टाका आणि वर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून टाकून वाफेवर शिजू द्या .१० मी .भाज्या शिजतील .पूर्ण गाळ होता कामा नये .अक्ख्या फोडी दिसल्या पाहिजेत अशा बेताने शिजवावे ,आणि त्यात ३ चमचे बिशी बेले मसाला टाकावा
५) एकीकडे कुकर गार झाला असेन तर शिजलेली डाळ जरा घोटून घ्यावी.
६) डाळ भाज्या शिजत असलेल्या भाड्यात टाकावी ,नीट मिक्स करावे .त्यात शिजवलेला भात मोकळा करून टाकावा .
वाचने
20633
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
एका कन्नड मित्राने सांगितलेली
In reply to एका कन्नड मित्राने सांगितलेली by पिंगू
धन्यवाद!
मस्त पाकृ!
घरी गेलो की बर्याचदा करायला
मस्त पाक्रु....
ह्याची चव मस्त असते.
माझी आवडती डिश
आवडता भात. बरेच दिवसात केला
In reply to आवडता भात. बरेच दिवसात केला by रेवती
हो रेवाक्का फक्त वेलची सोडून
पाकृ आवडली.
In reply to पाकृ आवडली. by मधुरा देशपांडे
+ १ असेच म्हणते !
सादरीकरण आवडले
सादरीकरण आवडले
मी केला होता एकदा!!
आरोही
धुबुक्क!
बरेच दिवसात केला नाहिये.मस्त
मस्त..
मैलार ला (बीदर जवळ ) हा
पुढच्या पुणे ट्रिपला तुच कर
In reply to पुढच्या पुणे ट्रिपला तुच कर by त्रिवेणी
नक्की ग .पण आता पुण्याला कधी
अरे वा.. मस्त पाकृ. एकदा करुन
वॉव भात खुपच तोंपासू दिसतोय
मस्त पाकृ!
बिशी बेले म्हणजे काय ?
In reply to बिशी बेले म्हणजे काय ? by धर्मराजमुटके
वर सांगितल्याप्रमाणेच- "बिसी
मस्त लागतो 'बिसी बेळे भात'
हापिसात खाल्ला एकदोनदा
वावा..
मस्त!
नेहमि करते. खुप आवडतो. हया
भात नाय हो
बिशी बेळे अन्ना
मस्तच
हा...माझा अगदी आवडता प्रकार!!
वन डीश मील....
अरे वा!
पाककृती आवडल्याबद्दल
आरोही ३ चमचे मसल्याने तिखटपणा
In reply to आरोही ३ चमचे मसल्याने तिखटपणा by समिधा
समिधा ३ चमचे मसाल्याने भात
बिसी बेळी हुळी अन्ना
बिशी बेळे अन्ना
MTR
मातीचे भांडे
In reply to मातीचे भांडे by नितिन५८८
नितीन भाऊ ,
In reply to नितीन भाऊ , by आरोही
धन्यवाद
आरोही, केला गं आज तुझा हा