Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्तसुनीत on Tue, 11/11/2008 - 10:28
  • Log in or register to post comments
  • 6228 views

प्रतिक्रिया

Submitted by मनिष on Tue, 11/11/2008 - 10:49

Permalink

noir

noir हा फ्रेंचमधे नुऑsर असा उच्चारला जातो! "र" चा पाय मोडलेला, अस्पष्ट उच्चार करायचा. - मनिष
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 11/11/2008 - 18:42

In reply to noir by मनिष

Permalink

सहमत

उच्चारांच आपलं अंमळ वाकडं .. त्यामुळ शॉली ... बाकी (पब्लिक चिमटे काढेल , पण मदत करेलच !) सहमत ... इथेच मला काही असे मित्र भेटले ज्यांच्याशी थोडा पर्सनल लेव्हलला जाउन संवाद साधू शकतो .. बाकी आयुक्षात असं घडण विरळच ... बरोबर ना लोक्स ? - (आमच्या कंपुचा शिलेदार) टाराजी मालुसरे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 11/11/2008 - 11:04

Permalink

मुक्तराव, ह

मुक्तराव, हा धागा चांगला आहे बर्र का! :) आपला, (शंकेखोर) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/11/2008 - 11:08

Permalink

नुवॉ

मी ऐकलेला उच्चार नुवॉ असा आहे. मनिष म्हणतो तसा 'र' असेलच तर अगदीच सायलेंट असतो. आणि 'जॉनर' पण तसेच ऐकले आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 11/11/2008 - 12:11

Permalink

फ्रेंच उच्चार

बव्हंशी फ्रेंचमध्ये, शेवटी e आला की त्यापूर्वीचे व्यंजन पूर्ण उच्चारले जाते. नाहीतर नाही. बर्‍याचदा शब्दाच्या स्त्रीलिंगी रूपाच्या शेवटी e येतो. जसे - Simon - पु. - उच्चार सिमाँ, आणि, Simone - स्त्री. - उच्चार सिमॉन या नियमाला, काही वेळा c, r, f, l यांचा अपवाद आहे. (लक्षात ठेवायचे असेल तर 'केअरफुल'मधली चार व्यंजने.) या दोन शब्दांचा मूळ उच्चार जॉनर्आ आणि (वर मनिष यांनी म्हटल्याप्रमाणे) नुऑsर असा असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Tue, 11/11/2008 - 12:54

Permalink

पळा.....

मिपा वर परत शुद्धलेखनाची चर्चा सुरु झाली......
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 11/11/2008 - 13:04

In reply to पळा..... by महेश हतोळकर

Permalink

छंदशास्त्र

छंदशास्त्र ह्या विभागात टाकल्यास शुद्धलेखनावरील चर्चा मिपाला मंजूर आहे, असे हल्लीच लक्षात आलेले आहे. शुद्धलेखन : छंदशास्त्र बोलीभाषा: मुक्तछंद किंवा शुद्धलेखनः शास्त्रीय संगीत मुक्तछंदः हिमेश रेशमिया असे सगळीकडे सब्स्टिट्यूट करा. मजा येईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Tue, 11/11/2008 - 13:47

In reply to छंदशास्त्र by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

ह्म्म्म्म

शुद्धलेखनः शास्त्रीय संगीत मुक्तछंदः हिमेश रेशमिया हरकत नाही. एवढं करता आलं तरी खूप आहे. छंदमुक्त महेश
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 11/11/2008 - 13:44

Permalink

काय पावणं ?

काय पावणं अलिबागहून आलात का ? (ट्रीटमेंट हवी होती ना ? ही घ्या.) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 11/11/2008 - 14:32

Permalink

अलिबाग, नव्हे भागलपूर

"अलिबागहून आलात" हा वाकप्रचार समस्त मराठी माणसांचा अपमान करणारा आहे तेव्हा त्यात ताबडतोब बदल करून "भागलपूरहून आलात" असा वाकप्रचार रूढ करावा अशी माझी मागणी आहे! सुनील ठाकरे Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 11/11/2008 - 14:45

In reply to अलिबाग, नव्हे भागलपूर by सुनील

Permalink

ठ्यॉ

"अलिबागहून आलात" हा वाकप्रचार समस्त मराठी माणसांचा अपमान करणारा आहे तेव्हा त्यात ताबडतोब बदल करून "भागलपूरहून आलात" असा वाकप्रचार रूढ करावा अशी माझी मागणी आहे! =)) तसं गोरखपूरही खूप "छान" आहे. अवांतरः ensemble, entrepreneur चे उच्चार नक्की कसे होतात आणि त्याला काही नियम आहेत का? अतिअवांतरः मी पुण्याहून आले आहे. (यालाच पाव्हण्याच्या जोड्याने साप मारणे असंही म्हणता येईल.)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 11/11/2008 - 18:37

In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

'ऑन्सॉम्बल'

'ऑन्सॉम्बल' (इथे ऐका) आणि 'ऑन्त्रप्रनुअर'(इथे ऐका)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 11/11/2008 - 18:37

In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

'ऑन्सॉम्बल'

'ऑन्सॉम्बल' (इथे ऐका) आणि 'ऑन्त्रप्रनुअर'(इथे ऐका)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 11/11/2008 - 18:46

In reply to 'ऑन्सॉम्बल' by बहुगुणी

Permalink

भेरी फस्ट

>>'ऑन्त्रप्रनुअर' भेरी फस्ट हमने इस बुडबख्त शब्दवा को आंत्रपुच्छ ऐसन पढा. और हम तो धनबादसे आया हुं !!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 11/11/2008 - 18:41

In reply to अलिबाग, नव्हे भागलपूर by सुनील

Permalink

जौनपूर

जौनपुराहून आलात काय आपला (भैय्या) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Tue, 11/11/2008 - 18:41

Permalink

खुप दिवस

खुप दिवस छळणारा प्रश्न. सार्वजनिक संडास किंवा मुतारीला 'स्वछतागृह' का म्हणतात? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/13/2008 - 15:57

In reply to खुप दिवस by गणा मास्तर

Permalink

कारण

कारण इथे जाऊन माणसं आप्-आपली पोटं स्वच्छ करून घेताता
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 11/11/2008 - 18:52

Permalink

धन्यु !

मंडळी , चिमटे आणि उत्तरे , दोन्ही बद्दल मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Fri, 11/14/2008 - 02:54

Permalink

genre ह्याचा

genre ह्याचा उच्चार अमेरिकन लोकं 'जान्रा' करतात असं निरिक्षण आहे noir चा उच्चार वाईन संबधी असेल तर 'पिनो नुआर' असा करताना पाहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 11/14/2008 - 08:49

In reply to genre ह्याचा by कोलबेर

Permalink

नाय हो!

वाईन मधली ती "पिनोन्वा" पण अमेरिकनांना उच्चारातलं काय कळतंय म्हणा...... अहो "दिक्षित" चा उच्चार "डीप्-*ट" असा करतात!!!! :))
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 11/14/2008 - 10:16

In reply to नाय हो! by पिवळा डांबिस

Permalink

किंवा

किंवा 'डिक-*ट' ;) (आता दोन्ही शब्दांच्या दुसर्‍या अक्षरा ऐवजी फुली टाकली असती तर काहीच कळलं नसतं. दोन्ही शब्द तेवढेच अश्लील आहेत. अश्लील वाटल्यास प्रतिसाद ऊडवावा ही मा. संपादक मंडळींना विनंती)
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 11/14/2008 - 03:02

Permalink

मी जॉन्र(न

मी जॉन्र(न चा पाय कसा मोडायचा!? आणि र जरा सायलेंट.. अवघड आहे! ) असाच ऐकला उच्चार.. मलाही हा प्रश्न पडला होता! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 11/14/2008 - 03:18

Permalink

वेबस्टर वरती

genre चा उच्चार 'जाऽन्र' असाच ऐकू येतोय! noir/cafe noir/pinot noir ह्या तीनही शब्दात उच्चार 'नुआर' असाच ऐकू येतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 11/14/2008 - 08:25

Permalink

आभार , पुढचा प्रश्न

मंडळी , पुन्हा एकदा , सगळ्यांचे आभार. या धाग्याला विषयाचे बंधन नाही. माझा पुढचा प्रश्न : आमचा पोरगा आहे चार वर्षांचा. मी अलिकडे पहातो : तो मूड असला वगैरे की एरवी बोलतो पुष्कळ ; पण हल्ली विचारलेल्या प्रश्नांना उत्तर बर्‍याचदा देत नाही. त्याला कुठली गोष्ट हवी असेल तर, (एरवी उत्तम संभाषण अवगत असूनही) स्पष्ट बोलायच्या ऐवजी, उं उं करतो. म्हणजे आम्ही "समजून" त्याला हवे ते द्यायचे ! अलिकडे काही निमित्ताने त्याच्या केजीमधे जाणे झाले ; त्याच्या मित्रांच्या संगतीत त्याला दूरून पहात होतो. चिरंजीव फार बोलायला तयार नाहीत ; बुजल्यासारखे. काय करावे ? कुणाचा काही अनुभव ? काही सूचना ? आगाऊ धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 11/14/2008 - 09:11

In reply to आभार , पुढचा प्रश्न by मुक्तसुनीत

Permalink

लहान मुले आणि आपण!

लहान मुलांशी वागण्याची कोणतीही एक पद्धत नसावी. प्रत्येक मुलाच्या स्वभावाप्रमाणे त्यात बदल करावा लागतो. तरीही काही समान गोष्टींचा अवलंब बर्‍याच वेळा यशस्वी ठरतो असे लक्षात येते. एखादा मुलगा/मुलगी आपल्याशी नीट बोलत नसेल तर आपण त्याच्यासमोर बोलताना मुद्दाम चुकीचे बोलावे की मग न बोलणारे मुल देखिल बोलते होते असा माझा अनुभव आहे. आपल्या चुका ते दुरुस्त करते आणि बघता बघता संवाद साधला जातो. आपण नुसतेच जर प्रश्न विचारले तर मात्र मुलं त्यांच्या पद्धतीने आणि मनात असेल तरच प्रतिसाद देतात.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com