करा! करा!! करा!!! क्रापाव राईस!! (अ थायी राईस!)
हॅप्पी न्यु इयर मिपाकर्स!! हॅप्पी न्यु इयर!!
करु करु म्हणत, गेल्यावर्षी मागे राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्याच असं मनोमन ठरवुन, मी या वर्षी गेल्या वर्षीची आणखी एक गोष्ट पुरी करतेय.
त्याच काय झालं; गेल्या वर्षी शिर्डीला जन्मात पहिल्यांदाच जाणे झाले. इतकी वर्षे उठसुठ नाशिकला जाउन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यायच्या व्यसनापायी शिर्डी राहूनच जायची!! :( गेल्या वर्षी मात्र एखाद्या कानात वारं भरलेल्या वासरासारख उनाडायला मिळाळं, अन ते ही समवयिन पै तै बरोबर.) मिपाने मला काय दिलं असं जर विचारायचं ठरवलं, तर परिघाबाहेरचे समविचारी लोक, अन त्यांच्या बरोबर नेहमीचे कुटुंब, नातेवाईक यांची बोटं न धरता स्वच्छंदी फिरणे या दोन गोष्टी मी ठासून सांगेन. घरातल्यांबरोबर अथवा नातेवाईंकाबरोबर असताना जो एक रोल प्ले असतो तो येथे नाहीसा होउन, मी म्हणुन आवडेल ते करता, खाता येते ते मिपाकरांबरोबरच!!
तर असो!! तर अश्या आम्ही शिर्डीला दर्शनासाठी गेल्या असताना, मी जन्मात पहिल्यांदा सब्जा पाहिला!!! काय नवल आहे ना? भारतात राहून मला सब्जा ही वनस्पती फक्त ऐकून माहिती होती, फालुद्यात घातलेल्या सब्जा बिया मला माहित होत्या, पण ही वनस्पती मी कधीच पाहीली नव्हती. भारताबाहेर मात्र, थायी बासिल, अथवा स्वीट बासिल म्हणुन मी हिच्या अगदी प्रेमात होते. तर तो सब्जा पाहून मी,"अग ही बासिल!! बासिल!!" करुन भरपूर गोंधळ घातला!!
तर या बासिलने अनेक थायी डिश बहारदार होतात, त्यातली एक डिश म्हण़जे "क्रा पाव राईस"!!
कोणत्याही हॉटेल मध्ये गेलं की कायम काहीतरी वेगळं मागवायचं अशी माझी खोड आहे. त्याच माझ्या स्वभावाला जागून मी एकदा हा राईस मागवुन खाल्ला, अन काय सांगू महाराजा!!! आक्शी घासा घासाला अहाहा!!
अन लागत तरी असं काय या रेसिपीला? अहो चक्क शिळा भात!! आहात कुठे? तर नेहमी आदल्या दिवशीच्या भाताचा तोच तोच फोडणीचा भात करुन कंटाळलात? फ्राईड राईसला चव नाही उरली? न्युट्रीशीअस व्हॅल्यु वाढवायची आहे जेवणात? पाहूण्यांना काहीतरी नविन करुन घालावसं वाटतयं? तर करा! करा!! करा!! आमचा क्रापाव राईस करा!!
तर आता गप्पा थांबवा!! उगा काम सोडुन विषय कोठल्या कोठे नेला राव तुम्ही?? तुमची पण ना! कम्मालच आहे बाई!!
तर चला!! चला!! चला!! सामग्री गोळा करा.
सामग्री:-
२ वाट्या थंड मोकळा भात.
(२ वाट्या म्हणायला, असेल नसेल तेव्हढा सगळा भात घ्या आदल्या दिवशीचा. :) मी तर सगळ्यांचे डबे भरायला म्हणुन जरा जास्तच भात लावते आदल्या रात्री. सकाळी हवा तसा भात तैयार!!)
४-५ वाट्या वेगवेगळी भाजी. ( या मध्ये मी कॅप्सिकम, ब्रोकोली, चॉप्सॉय अन गाजर घेतलं आहे. पण तुम्ही फ्रीजवर धाड टाकून त्यातल्या सगळ्या भाज्या वापरु शकता. या रेसीपीत पालेभाजीसुद्धा चालते. एक वेगळाच गोडवा येतो. मशरुम्स चालतात नव्हे पळतात!! मी असलेले मशरुम्स विसरले :) )
३-४ लसणाच्या पाकळ्या सोलुन, अन तुकडे करुन.
१ टेबलस्पून साखर.
१ टेबलस्पून सोयासॉस.
१ टेबलस्पून थायी मिरचीचे तुकडे ( सोसण्यावर!! माझ्या घरात ही बुलेट मिरची आणली तरी चालत नाही. मी फोटोत दाखवली आहे ती बाटलीतली,चायनिज क्रंची मिरची वापरते. तुम्ही सरळ आपली ओली लाल मिरची वापरा)
१ वाटी स्वीट बासिल अथवा सब्जाची पाने धुवुन.
१ वाटी छानसा चिरलेला कांदा. (हा मात्र जरा बारीक चिरा. मस्त एकसारखे चौकोनी तुकडे!!)
४-५ काड्या कोथींबीर.
२ पळ्या तेल.
आणि
चवीनुसार मिठं.
आता पाककृती:-
एका कढईत २ पळ्या तेल गरम करा. त्यात कापलेले लसूण तुकडे टाकून चांगले सोनेरी होइतो परता. आता त्यात मिरचीचे तुकडे मिसळा अन परत एकदा दोन मिनिटं परता. मग त्यात सगळ्या भाज्या घाला अन परत एकदा चांगले परतुन कढईला झाकण ठेवुन एक ३-४ मिनीट भाज्या मऊसर होउ द्या. असे नका डोळे मोठ्ठे करुन पाहू!! मला माहिती आहे आपल्याकडे कांदा आहे बारीक चिरलेला.

आता भाज्या साधारण शिजल्या असतील, तर त्यात सोया सॉस घाला. आणखी एकदा परता आणि थंड भात मोकळा करुन त्यात मिसळा. हवं असेल तसं मिठ घाला. (माझ्या भातात मिठ नसते त्यामुळे मला भाज्या अन भात या दोन्हीच्या वाटणीचे घालावे लागते.)

आता या भाताला अन भाज्यांना मिळुन एक मस्त दणदणीत वाफ आणा. परत झाकण काढुन आता, हो आत्ताच!! या भातात साखर, कांदा, बासिलची चिरलेली पाने मिसळा.
आणखी एकदा मस्तपैकी मिसळा सगळ एकत्र अन वरुन चिरलेली कोथिंबीर घालुन गॅस बंद करा.
झाला तयार थायी क्रापाव राईस!! रोजच्या डब्याला आणखी एक नवा पर्याय!! इतक्या सगळ्या भाज्या असल्याने जास्त न्युट्रीशीयस!! यात चिकन मिसळायचे असेल तर चिकनचे तुकडे भाज्यांबरोबर वाफवुन घ्या.
सो पेश है!! क्रापाव राईस!!
( मध्यंतरी सोयासॉस बद्दल बरच काही ऐकलं. त्यात सोया सॉस अंगावर पडल्यावर तेथे त्वचेवर सोयासॉसच्या रंगाचा डाग पडुन दुसर्या दिवशी खाज अन रॅश आल्याचे एका मैत्रीणीने सांगितले. तेंव्हापासून निदान मी तरी सोयासॉस न वापरताच हा भात करते! छान होतो. इव्हन साखर मी कधी घालते, कधी नाही.)
ताजा कलमः - कुणाला अंडी घालायची हौस असेल, त्याला आमची ना नाही!! ;)
कळावे
__/\__
अपर्णा.
तर या बासिलने अनेक थायी डिश बहारदार होतात, त्यातली एक डिश म्हण़जे "क्रा पाव राईस"!!
कोणत्याही हॉटेल मध्ये गेलं की कायम काहीतरी वेगळं मागवायचं अशी माझी खोड आहे. त्याच माझ्या स्वभावाला जागून मी एकदा हा राईस मागवुन खाल्ला, अन काय सांगू महाराजा!!! आक्शी घासा घासाला अहाहा!!
अन लागत तरी असं काय या रेसिपीला? अहो चक्क शिळा भात!! आहात कुठे? तर नेहमी आदल्या दिवशीच्या भाताचा तोच तोच फोडणीचा भात करुन कंटाळलात? फ्राईड राईसला चव नाही उरली? न्युट्रीशीअस व्हॅल्यु वाढवायची आहे जेवणात? पाहूण्यांना काहीतरी नविन करुन घालावसं वाटतयं? तर करा! करा!! करा!! आमचा क्रापाव राईस करा!!
तर आता गप्पा थांबवा!! उगा काम सोडुन विषय कोठल्या कोठे नेला राव तुम्ही?? तुमची पण ना! कम्मालच आहे बाई!!
तर चला!! चला!! चला!! सामग्री गोळा करा.
सामग्री:-
२ वाट्या थंड मोकळा भात.
(२ वाट्या म्हणायला, असेल नसेल तेव्हढा सगळा भात घ्या आदल्या दिवशीचा. :) मी तर सगळ्यांचे डबे भरायला म्हणुन जरा जास्तच भात लावते आदल्या रात्री. सकाळी हवा तसा भात तैयार!!)
४-५ वाट्या वेगवेगळी भाजी. ( या मध्ये मी कॅप्सिकम, ब्रोकोली, चॉप्सॉय अन गाजर घेतलं आहे. पण तुम्ही फ्रीजवर धाड टाकून त्यातल्या सगळ्या भाज्या वापरु शकता. या रेसीपीत पालेभाजीसुद्धा चालते. एक वेगळाच गोडवा येतो. मशरुम्स चालतात नव्हे पळतात!! मी असलेले मशरुम्स विसरले :) )
३-४ लसणाच्या पाकळ्या सोलुन, अन तुकडे करुन.
१ टेबलस्पून साखर.
१ टेबलस्पून सोयासॉस.
१ टेबलस्पून थायी मिरचीचे तुकडे ( सोसण्यावर!! माझ्या घरात ही बुलेट मिरची आणली तरी चालत नाही. मी फोटोत दाखवली आहे ती बाटलीतली,चायनिज क्रंची मिरची वापरते. तुम्ही सरळ आपली ओली लाल मिरची वापरा)
१ वाटी स्वीट बासिल अथवा सब्जाची पाने धुवुन.
१ वाटी छानसा चिरलेला कांदा. (हा मात्र जरा बारीक चिरा. मस्त एकसारखे चौकोनी तुकडे!!)
४-५ काड्या कोथींबीर.
२ पळ्या तेल.
आणि
चवीनुसार मिठं.
आता पाककृती:-
एका कढईत २ पळ्या तेल गरम करा. त्यात कापलेले लसूण तुकडे टाकून चांगले सोनेरी होइतो परता. आता त्यात मिरचीचे तुकडे मिसळा अन परत एकदा दोन मिनिटं परता. मग त्यात सगळ्या भाज्या घाला अन परत एकदा चांगले परतुन कढईला झाकण ठेवुन एक ३-४ मिनीट भाज्या मऊसर होउ द्या. असे नका डोळे मोठ्ठे करुन पाहू!! मला माहिती आहे आपल्याकडे कांदा आहे बारीक चिरलेला.

आता भाज्या साधारण शिजल्या असतील, तर त्यात सोया सॉस घाला. आणखी एकदा परता आणि थंड भात मोकळा करुन त्यात मिसळा. हवं असेल तसं मिठ घाला. (माझ्या भातात मिठ नसते त्यामुळे मला भाज्या अन भात या दोन्हीच्या वाटणीचे घालावे लागते.)

आता या भाताला अन भाज्यांना मिळुन एक मस्त दणदणीत वाफ आणा. परत झाकण काढुन आता, हो आत्ताच!! या भातात साखर, कांदा, बासिलची चिरलेली पाने मिसळा.
( मध्यंतरी सोयासॉस बद्दल बरच काही ऐकलं. त्यात सोया सॉस अंगावर पडल्यावर तेथे त्वचेवर सोयासॉसच्या रंगाचा डाग पडुन दुसर्या दिवशी खाज अन रॅश आल्याचे एका मैत्रीणीने सांगितले. तेंव्हापासून निदान मी तरी सोयासॉस न वापरताच हा भात करते! छान होतो. इव्हन साखर मी कधी घालते, कधी नाही.)
ताजा कलमः - कुणाला अंडी घालायची हौस असेल, त्याला आमची ना नाही!! ;)
कळावे
__/\__
अपर्णा.
वाचने
22480
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
मस्त पा.क्रु.
हायला...सहीच हाये बे बाकी
दिसायला तवा पुलावासारखा
मस्तच , चविष्ट असणार याबद्दल
छानच गं
मस्त तोंपासू आहे पाकृ.
एक गरीब प्रश्न - आपलं
अपर्णा द ग्रेट इज बॅक!
मस्त पाकृ! फोटूवरून तरी
याच्या भारतीय आवृत्तीला "तवा
मस्त टेम्प्टिंग डिश !
वा वा!
रसाळ लिखाण,मस्त रंगीत फोटो
मस्त पाकृ. तोंपासू.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी..
झकास दिसतोय क्रापाव राईस.
वा थाई तवा पुलाव
In reply to वा थाई तवा पुलाव by दिपक.कुवेत
मायबाप !! तुम्हांसाठी बनवताना
In reply to मायबाप !! तुम्हांसाठी बनवताना by स्पंदना
ओके
तोंपासु पाकृ ! जरूर करवून चव
वा वा ! काय मस्त फोटो आलेत!
मस्त! मस्त!!
करुन बघण्यात येईल
खास अपर्णाताईच्या शैलीतले
मुवि, टका, खटपट्या,कविता
अफलातून
In reply to अफलातून by सविता००१
(No subject)
सक्काळी सक्काळी भूक चाळवली ना
In reply to सक्काळी सक्काळी भूक चाळवली ना by अत्रुप्त आत्मा
बुवा तुम्हाला घालायची आहेत का??
In reply to बुवा तुम्हाला घालायची आहेत का?? by दिपक.कुवेत
अरे बाप्प रे! ब्वॉर!
मस्त प्रकार आहे हा भाताचा
सुरेख रंगसंगती
लेखन झक्कास, पाकृही झक्कास.
मस्त रेसेपी!!! आणि तू लिहीणार
खूप छान आहे पाक क्रुति.
आता आम्ही तुम्हाला मेहूण
In reply to आता आम्ही तुम्हाला मेहूण by देशपांडे विनायक
या! या!! निवांत या हो!!
कचकचीत झालाय राईस यम्मी
In reply to कचकचीत झालाय राईस यम्मी by स्पा
ए स्पा!
In reply to ए स्पा! by स्पंदना
अपर्णाताई...
In reply to ए स्पा! by स्पंदना
यालाच धमकी कंपू म्हणतात काय?
छान रेसिपि
मस्त!
In reply to मस्त! by उमा जितेन्द्र
आली.. आली
दिसतोय छान.
चविष्ट
मस्त दिसतोय क्रापाव राईस आणि
भारीच!
तोंपासु
छान रेसिपी.त्या सब्जाच्या
पाणी सुट्या