" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ?...."
"महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एकमहान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एकमोठा प्रश्न निर्मान होतो. भारतामधील कोणत्याही प्रांतात राहणार्या व्यक्तीला दुसर्या कोणत्याही प्रांतात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, हे आम्हालाही मान्य आहे.पण जो माणुस ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वाडवडीलांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी त्या मराठी माणसाला जिवण जगण्याकरता त्याच्याच जन्मस्थान असलेल्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्य नसावे हे कुठपत योग्य आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक दुसर्या राज्यातील लोक येउन व्यवसाय करत आहे व एक आनंदी जिवण जगत आहेत, मराठी माणसाचा त्याला नक्कीच विरोध नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या परप्रांतीय लोकांसाठी मराठी माणसाचा काहीही विरोध नाही हे खरे असले तरी पण महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल. महाराष्ट्रामध्ये कोणीही हिंदु नाही तर मुसलमानही नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार्या माणसाचा धर्म आणि जात ही मराठी आहे.महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणुन १००हुन अधिक लोकांनी बलीदान दिले आहे, तेव्हा कुठे मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राला म्हणजेच मराठी माणसाला मिळाली. परंतु या मुंबई मध्ये आज अनेक परप्रांतीयांचे लोंढेचे लोंढे येत आहे, या लोंढ्याच्या गर्दीमध्ये मराठी माणुस हरवुन गेलेला दिसत आहे.मुंबई मराठी माणसाची हे परप्रांतीय लोंढे मानायलाच तयार नाही, कारण मराठी माणसाला गुलामगिरीची सवय झालेली आहे असा समजपरप्रांतीय लोंढ्याचा झालेला दिसत आहे.परंतु मराठी माणुस शांत आहे पण षंढ नाही हे ही त्या परप्रांतीयांनी लक्षात घ्यायला हवे.
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना, राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या विषयावर अनेक पक्षांनी मतासाठी राजकारण केल. परंतु ते पक्ष मात्र या विषयावर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत असे अजुनतरी दिसत नाही आहे.महाराष्ट्रामधील "मुबई मध्ये काय व्यवसाय करता? मुबंई मध्ये ट्राफीकजाम मध्येच तुमचा बराच वेळ वाया जातो, तुम्ही आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा पुरवु " हे वाक्य आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांन
ी वापरलेले. आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एकमोठा प्रश्न निर्मान होत आहे.
मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्य
े कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कसकाय सहन करतोय?, हा संशोधनाचा विषय बनला आहे.महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कोण असणार? हे सर्व दुसर्या राज्यामध्ये राहणारे नेते ठरवत होते व ठरवत पण आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण राहणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ?हे मराठी माणुस का ठरवु शकत नाही, मराठी माणसाची बुद्धी एवढी षंढ झाली आहे का? की ती षंढ करण्याचा प्रयत्न परप्रांतीय लोक करतायत. ? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी मराठी माणुस असला तरी महाराष्ट्रामधील कोणतेही निर्णय घेण्याकरता त्याला दिल्ली कडेच का पाहावे लागते? हा ही एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कोणताही निर्णय घेताना दिल्लीकडे बघावे लागणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेकडेच बघावे लागेल. असे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी तरी येईल का?. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमक राहणार्या राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांना मराठी माणसाच्या हिताकरता राजकीय स्वार्थ सोडुन एकत्र येण्यास काय हरकत आहे? हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. मराठी माणसाला या दोघांकडुन बर्याच प्रमाणात अपेक्षा आहे, या दोघांच्या भांडणामध्ये मराठी माणसाचे मतांतर होउन मराठी माणसाचेच नुकसान होत आहे व परप्रांतीय समाजाचे लोक हे आपल्या मराठी माणसांमध्ये फुटपाडुन महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतो आहे व आपल्याच माणसाला हाताशी धरुनतो राज्य करताना पणदिसत आहे.महाराष्ट्रामधील मराठी लोकांच्या अस्मितेला असणारा धोका टाळण्यासाठी मराठी माणसाला आपसातील भांडणे विसरुन एकत्र यावेच लागेल व मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अस सरकार आणावेलागेल की ज्याचा मुख्यमंत्री कोण्या दिल्लीवरुन नाही तर महाराष्ट्राच्या एखाद्या शहरामधुन, गावामधुन किंवा गल्लीमधुन ठरवला जाईल .......
संजयराजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 09561730189
EmailId: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
वाचने
30230
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकाच दिवसात एवढ्या जिलब्या ?
रतीबच टाकताय जनू.
धन्यवाद सर, तुमच्या
मराठी मानसावर एवढा अन्याय होत
थंडीमुळे?
In reply to मराठी मानसावर एवढा अन्याय होत by Sanjay Kokare
द. गोलार्धातला मराठी माणूस
In reply to थंडीमुळे? by आजानुकर्ण
त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यु
In reply to द. गोलार्धातला मराठी माणूस by अनुप ढेरे
जर थंडीतच काकडला तर लोक थंडीतच राज्य करतील आपल्यावर
हो पण
In reply to जर थंडीतच काकडला तर लोक थंडीतच राज्य करतील आपल्यावर by Sanjay Kokare
आपल घरच तर हिरावण्याचा प्रयत्न आहे त्यांचा
कुणाचा?
In reply to आपल घरच तर हिरावण्याचा प्रयत्न आहे त्यांचा by Sanjay Kokare
बास झालं की आता ?
In reply to कुणाचा? by आजानुकर्ण
आजाणुकर्ण सर परप्रांतीयाचा
धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती
आपला प्रामाणिकपणा आमच्या
In reply to धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती by बॅटमॅन
संजय कोकरे हा तुमचा डूआयडी तर
In reply to आपला प्रामाणिकपणा आमच्या by धर्मराजमुटके
हा ! हा !
In reply to संजय कोकरे हा तुमचा डूआयडी तर by खटपट्या
तुम्हाला अस का वाटतय, हा लेख
In reply to संजय कोकरे हा तुमचा डूआयडी तर by खटपट्या
मुटके सर, आपल्या 'धर्मराज'
In reply to आपला प्रामाणिकपणा आमच्या by धर्मराजमुटके
नक्कीच तुमच स्वागत आहे बॅटमन
अरे पन!
पिडां-काका
In reply to अरे पन! by पिवळा डांबिस
मुंबैकर बेपारी..
In reply to पिडां-काका by इरसाल
हे हे
In reply to अरे पन! by पिवळा डांबिस
मराठी माणसा साठी राजकिय पक्ष
जरा
ओ कोकारे साह्येब काहाले धतिंग
"मिपावर मराठवाडी माणसांचे
मोर्शीत मागं दंगल झाली म्हणे ?
हाहाहाहा
नुकताच एक आयडी ब्लॉक झाल्याचं कळलं
माझ्याबद्दल
हायला....तुम्ही अल्लादिनचा
In reply to माझ्याबद्दल by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
नान ओरु तडव सोन्ना, नूर्रु
In reply to माझ्याबद्दल by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
अहो सोडा सगळ्यात होपलेस मराठी
ठ्ठो !!!
In reply to अहो सोडा सगळ्यात होपलेस मराठी by llपुण्याचे पेशवेll
च्यायला छोटा राजनचे नाव नाय
In reply to ठ्ठो !!! by अर्धवटराव
ह्या बाकी खरा हां. अरुणभौ
In reply to च्यायला छोटा राजनचे नाव नाय by हाडक्या
बरे झाले लिहिलेत!
आज आयसीआय्सीआय वाल्या बाईचा
वेल्लाभट्ट सर लय भारी
In reply to आज आयसीआय्सीआय वाल्या बाईचा by वेल्लाभट
संजयजी महाराष्ट्र तुम्हाला