Skip to main content

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

Published on गुरुवार, 15/01/2015
(लेखमालिकेतील उरलेले लेख पोस्ट करायचे आहेत, मात्र आजची ही घटना मला शेअर करायलाच हवी, त्यामुळे लेखमालिकेला ब्रेक जरा.. ! :) ) मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अ‍ॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील! 'द वे आय सी इट', 'डिफरंट.. नॉट लेस' ही पुस्तकं वाचनीय व अभ्यास करण्याजोगी आहेत. या डॉ. टेंपल ग्रांडीन यांन मी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर फॉलो करू लागले आणि आज दुपारी हे नोटिफिकेशन माझ्या फोनवर! Dr.TempleGrandin WOW! Dr. Temple Grandin!? Such Notable, remarkable and famous person from Autism community/ Autism activist following me? :) I know she might have whole PR team to manage her twitter account and everything. And what do you really need to follow a person on twitter? But anyway, this gave me real shock( good one) when I received this notification on my iphone. For more information read: http://www.grandin.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2719
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अभिनंदन, तुम्हाला त्यांनी फॉलो केले यात काही आश्चर्य वाटले नाही. तुमचे सखोल लेख, बाळाच्या बाबतीतले अविश्रांत, नाविन्य्पुर्ण प्रयत्न, उमेद, सकारात्मकता लेखातुन समजतेच. तुमचे लेख वाचुनच उभारी मिळाल्यासारखे वाटते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

अभिनंदन ! ऑटिझमवर इतर उत्तमोत्तम लिखाण जगात असेल आणि आहेच... पण त्यामुळे तुमच्या योगदानाचे महत्व कमी होत नाही. लिहीत रहा.

अभिनंदन. खूप छान. तुमच्या प्रयत्नांना देखील असेच यश येवो. बेस्ट लक. :)

खरच तुम्ही अफलातून लिहिता. तुमची तळमळ आणि सकारात्मक विचारसरणीच इतकी जाणवते की ही Dr. Temple Grandin! सारखी सुरेख आश्चर्ये आपल्या वाट्याला सतत येवोत.

देव एक दिवस नक्की तुम्हाला यश देईल.

अग! तुझं आईपणं भावलं असेल त्यांना. मलातर तेच आवडलं. बाळासाठी योग्य ते करण्याची तुझी धडपड पाहून मन अगदी भरुन येतं!! (सॉरी एकेरी बोलावते आहे) आजवर लिहीलेल्या पुस्तकात थेअरी असेल, पण या लिखाणात एका मातेचा पराकाष्ठेचा प्रयत्न आहे. स्वतः बरोबरची धडपड आहे. यश अपयशाचा चढ उतार आहे. अभिनंदन!!

In reply to by स्पंदना

खूप आभार तुमच्या चांगल्या शब्दांसाठी! :) त्यांना कुठे मराठी येतंय? ऑटीझम शब्द पाहून केले असेल त्यांनी/त्यांच्या टीमने फॉलो. पण माझ्यासाठी फारच इन्स्पायरिंग होते ते. अ‍ॅज इफ माझ्या प्रयत्नांना चक्क देवाचा सपोर्ट आहे असं काहीसं फिलिंग आले. :)