✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आणि ते

स
स्पा यांनी
Wed, 01/14/2015 - 13:15  ·  लेख
लेख
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही अस्मादिक हि याला कसे अपवाद असतील.या वर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला चला, नावनोंदणी करून टाकू, जाहिरात करायला आता आम्ही मोकळे, बस झाले उंडारणे.माझ्या परवानगी सारख्या मामुली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यक्यता वाटली नाहीच,काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबर वरून फोन यायला लागले.ते "तेच" होते,भेटायचं म्हणत असायचे मी मेल वर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो त्यातल्या त्यात माझे सुदैव असे कि घरी पत्रिका हा मुद्दा महत्वाचा असल्याने मी सुखी होतो, जल्ला एकही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता. पण त्यांनी आक्रमणाचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले.काल काही समदुक्खी मित्र wats app वर गप्पा मारत असताना हा विषय निघाला, एक एक किस्से एवढे वाढत गेले,कि हे दुख्ख इथवर मर्यादित ण ठेवता सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले आखिर दर्द बाटनेसेही तो कम होता हे म्हणून हा प्रपंच प्रसंग एक :- रात्री ९ च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो, "ते" बसलेले होते, पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले कोण ब्वा हे.. मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो वर पासून खालपर्यंत स्क्यान्निंग झालं. मग नमस्कार चमत्कार बाबांनी विचारलं मुलगी काय करते, बस्स इतकच विचारायची वाट बघत होते वाट्त ते , धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती हि महत्वाची माहिती पण मिळाली पोटात मरणाचे कावळे बोंबलत होते.तरी तसाच हां हु करत पुराण ऐकत होतो.शेवटी समजल कि ढोर मेहनत करून मुलीने मास्टर्स केले आहे IT मध्ये. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला आत आलो, मागोमाग आई .. अरे भयंकर शिकलेली दिसतेय हि मुलगी तिला चालेल का पण , नाहीतर डॉक्टर , इंजिनिअर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या हल्ली, म्हटल मला काय विचारतेस, तुम्ही आणलाय न हे .. तुम्हीच विचारा, परत बाहेर आलो समोरून स्तुतीसुमनांचा धबधबा कोसळतच होता, तरी तशीच तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेन मध्ये चढलो,विचारलं नोकरी कुठे करते ? एखाद्या भिकार्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईल ला सुट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत, शोधतेय तरी म्हटलं ओह, (अच्चा अच्च जाल तल - हे मनातल्या मनात) अजून २० मिनिटे पुराण ऐकवल्यावर त्याने तिचा बायो डेटा माझ्याकडे सरकवला, आई बाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता, मी पण सहज नजर टाकली, शिक्षण: बी.कॉम ( सेकंड क्लास), tally, आणि आणि
MSCIT.
फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा) म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो, तेही मोफत आहात कुठे ? मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी. मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ? ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो. ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो ) मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे. ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो) हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची) ते : मी xxxx,सर्प मित्र आहे मी : अरे वा ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज ) साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात मी : मुलगी काय करते ? ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ? अजून साधारण पंधरा मिनिटांनी मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ? ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला मी: पत्रिका देताय णा ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली) ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (
तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती
) मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही) आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :( त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय, बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!! -धक्क्याला लागलेला (स्पा )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
58773 वाचन

💬 प्रतिसाद (189)

प्रतिक्रिया

अगागागगगगगग!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/14/2015 - 18:43 नवीन
अगागागगगगगग!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ईईईई

दिपक.कुवेत
Sun, 01/18/2015 - 17:52 नवीन
अतिशय बेक्कार हसतोय बिकांच्या कमेंट्वर.....धड लिहिताहि येत नाहिये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्क

टवाळ कार्टा
Wed, 01/14/2015 - 21:24 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिका.........

सविता००१
गुरुवार, 01/15/2015 - 10:40 नवीन
पियू की भावनाओं को समझो जरा! आप भी ना.........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(No subject)

स्पा
गुरुवार, 01/15/2015 - 10:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

च्यायला माझा बाजार ..........

पियुशा
गुरुवार, 01/15/2015 - 11:24 नवीन
च्यायला माझा बाजार ................. अय्यो...... बिका हम आप्को नही चॉडेगा , आप मिलो एक बार, हम भी पिशवी मे धामन लेके आयेन्गा फिर देको कौन तेज बागती तुम की धां म ण :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच

बॅटमॅन
गुरुवार, 01/15/2015 - 11:35 नवीन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच

स्पा
गुरुवार, 01/15/2015 - 11:40 नवीन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो
मि पण =)) वारल्याच गेलो एकदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खी खी खी तरी बरं अर्थ ठीकच

बॅटमॅन
गुरुवार, 01/15/2015 - 11:44 नवीन
खी खी खी =)) तरी बरं अर्थ ठीकच आहे =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अब्बे ....ए़ ......कार्ट्यानो

पियुशा
गुरुवार, 01/15/2015 - 11:54 नवीन
अब्बे ....ए़ ......कार्ट्यानो क लिवलय मला बी सान्गा ना हसताय का गधड्यानो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फारच सोज्वळ ब्बॉ तुम्ही

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/15/2015 - 12:47 नवीन
फारच सोज्वळ ब्बॉ तुम्ही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आला का टवाळ खोर ? ये ये तुझिच

पियुशा
गुरुवार, 01/15/2015 - 14:48 नवीन
आला का टवाळ खोर ? ये ये तुझिच कमी होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स.म. माझी प्रतिक्रिया उड्वुन

पियुशा
गुरुवार, 01/15/2015 - 14:50 नवीन
स.म. माझी प्रतिक्रिया उड्वुन टाका , लोकानी कै च्या कै अर्थ़ काढन्यापेक्षा ते बरे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

रौ दे की...मला मस्करी समजते

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/15/2015 - 15:20 नवीन
रौ दे की...मला मस्करी समजते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

होय रे बॅट्या माझीही तिच

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 01/15/2015 - 11:58 नवीन
होय रे बॅट्या माझीही तिच अवस्था झाली प्रथमार्ध वाचल्यानंतर. मी ऑफिसच्या बाहेर पार्कींग लॉट मध्ये पळालो मगच फुटलो. आयायाईग. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/15/2015 - 13:56 नवीन
@प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो >>> =))))) अत्यंत सखोल आणि खोचक आहे,हां खाटुक! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाहाहा

Pain6
गुरुवार, 01/15/2015 - 14:51 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच

सूड
गुरुवार, 01/15/2015 - 15:45 नवीन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो
हो ना राव!! लै मंजे लैच हसतोय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बिपिन कार्यकर्ते

Pain6
गुरुवार, 01/15/2015 - 14:58 नवीन
फारच संकुचित मनाचे ब्वा तुम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(No subject)

मोहनराव
गुरुवार, 01/15/2015 - 15:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आयला! वेड्यासारखा हसतोय तो

सूड
Wed, 01/14/2015 - 15:28 नवीन
आयला! वेड्यासारखा हसतोय तो धामणवाला किस्सा वाचून!! येवढे पेशन्स? अपमान करु नको पाह्यजे तर, पण एखादा शालजोडीतला तरी द्यायचा.
  • Log in or register to post comments

अफलातून

MaheshW
Wed, 01/14/2015 - 15:30 नवीन
हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते,
.....हा हा हा आजून हसतो आहे .............
  • Log in or register to post comments

मी सुटलो रे.....

नन्दादीप
Wed, 01/14/2015 - 15:32 नवीन
मी ह्या सगळ्या विषयातून सुटलो...नशिबच माझ.... (तरी सांगत होतो तुला, आधीच सेटींग लाव म्हणून) असो....... तुझ्या निमित्ताने जुने लोक परत आलेले बघून ड्वॉले पाणावले......
  • Log in or register to post comments

तुझ्या निमित्ताने जुने लोक

स्पा
गुरुवार, 01/15/2015 - 10:17 नवीन
तुझ्या निमित्ताने जुने लोक परत आलेले बघून ड्वॉले पाणावले......
ह्येच बोल्तो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

स्पा बाब्या क्याटेगरीत कैक

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/15/2015 - 18:35 नवीन
स्पा बाब्या क्याटेगरीत कैक वर्षांपूर्वीच आला होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान

सस्नेह
Wed, 01/14/2015 - 15:33 नवीन
लेख म्हणून छान आहे.पण प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळेच दिसते. परवाच एका वधु-वर मेळाव्याला गेले होते. (गैरसमज नसावा, स्वयंसेविका म्हणून ). तर तिथे 'वर-वर' मेळावाच लागलेला दिसला. .. 'वरा' च्या कक्षात पाचशे-एक मुले नटून थटून बसलेली आणि वधूंच्या कक्षात शुकशुकाट ! मग आयोजिका बाईंनी बरीच फोनाफोनी केल्यावर सताठ 'वधू' अनिच्छेने घरच्याच वेशभूषेत अवतरल्या. पण मेळावा संपेपर्यंत काही थांबल्या नाहीत. एकेका वराने शिक्षण इ. परिचय द्यायला सुरु केल्यावर एक तुच्छ कटाक्ष टाकून स्कूटरींवरून भुर्रं उडाल्या !
  • Log in or register to post comments

अगायायो =))

बॅटमॅन
Wed, 01/14/2015 - 15:41 नवीन
अगायायो =)) =)) =)) अजून या भानगडीत पडलो नाही, त्यामुळे किरकोळ चकमकींवरच भागतंय. च्यायला स्पांडू तर फुल सुलतानढव्यात सापडलेला दिसतोय =)) _/\_
  • Log in or register to post comments

लेख आवडला . एकदम खुसखुशीत .

पिंपातला उंदीर
Wed, 01/14/2015 - 15:53 नवीन
लेख आवडला . एकदम खुसखुशीत . On serious note मराठवाडा भागात लग्नाळू मुलांची परिस्थिती भीषण आहे . माझे कितीतरी जवळचे सुस्थिती मधले मित्र निव्वळ मुली मिळत नाहीत म्हणून नाईलाजाने ब्रम्हचारी आहेत .
  • Log in or register to post comments

अविवाहित

कपिलमुनी
Wed, 01/14/2015 - 16:07 नवीन
मित्र निव्वळ मुली मिळत नाहीत म्हणून नाईलाजाने ब्रम्हचारी आहेत .
तुम्हाला अविवाहित म्हणायचा आहे का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

>>तुम्हाला अविवाहित म्हणायचा

सूड
Wed, 01/14/2015 - 16:08 नवीन
>>तुम्हाला अविवाहित म्हणायचा आहे का
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

(No subject)

पिंपातला उंदीर
Wed, 01/14/2015 - 16:22 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अग्गागा

टवाळ कार्टा
Wed, 01/14/2015 - 16:13 नवीन
अग्गागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

(No subject)

शिद
Wed, 01/14/2015 - 17:06 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एका माजी पंप्र साहेबांचे

बॅटमॅन
Wed, 01/14/2015 - 17:47 नवीन
एका माजी पंप्र साहेबांचे ष्टेटमेंट आठवल्या गेले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हसताहि येत नाहि

पदम
Wed, 01/14/2015 - 15:58 नवीन
अहो ऑफ्फिस मधे बसुन वाचतेय. त्यामुळे जोरात हसताहि येत नाहि. बाकि मस्तच.
  • Log in or register to post comments

प्रसंग १ आणि २ कहर आहेत.

आदूबाळ
Wed, 01/14/2015 - 16:01 नवीन
प्रसंग १ आणि २ कहर आहेत. ब्याक्कार हसतोय. ओळखीच्या काकवा/मावश्या "हा कधी (ना कधी) तरी उपवर होईल, आणि हे स्थळ आपल्या चुलतभावजयीच्या पुतणीसाठी योग्य असेल" असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतो.
  • Log in or register to post comments

असे आडाखे बांधून आगोदरच

सूड
Wed, 01/14/2015 - 16:06 नवीन
असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतो.
भारी म्हणजे अत्यंत भारी असतो आणि फिल्डिंग कोसळल्यावर होणारा त्रागा अत्यंत करमणूक करणारा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

खी खी खी, एकच नंबर =))

बॅटमॅन
Wed, 01/14/2015 - 17:46 नवीन
खी खी खी, एकच नंबर =)) =)) =)) अतिशय नेमके =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओळखीच्या काकवा/मावश्या "हा

प्रसाद१९७१
Wed, 01/14/2015 - 18:35 नवीन
ओळखीच्या काकवा/मावश्या "हा कधी (ना कधी) तरी उपवर होईल, आणि हे स्थळ आपल्या चुलतभावजयीच्या पुतणीसाठी योग्य असेल" असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतो
कुठल्या जमान्यात आहात आदूबाळ. मुलाचे लग्न होण्यासाठी फक्त मुलगी असावी एव्हडीच अपेक्षा असावी अशी वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नाही हो. माझ्या जवळच्या

आदूबाळ
Wed, 01/14/2015 - 19:14 नवीन
नाही हो. माझ्या जवळच्या नातेवाईकांचं जुन्या पद्धतीचं वधूवरसूचक मंडळ आहे. तिथल्या निरीक्षणानुसार अजून तरी इतकी वाईट परिस्थिती आल्याचं जाणवलं नाही. म्हणजे मुलांच्या वीस फायली असतील तर मुलींच्या जवळजवळ तेवढ्याच. (अर्थातच नक्की मोजून पाहिलं नाहीये.) जेंडर रेशो बिघडल्याचं गेल्या १० वर्षांत ऐकायला मिळालं आहे. त्याआधी जन्मलेल्या, म्हणजे सध्याच्या उपवर मुलांबाबत तितकासा प्रॉब्लेम नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नुस्ते नगाला नग असून चालत

टवाळ कार्टा
Wed, 01/14/2015 - 21:29 नवीन
नुस्ते नगाला नग असून चालत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

दादूस+१

नाखु
गुरुवार, 01/15/2015 - 08:56 नवीन
शिवाय गेल्या १०-१२ वर्षात मुलींच्या अपेक्षा ( अर्थात तिच्या आडून आई-बापांच्या) महागाई निर्देशांकापेक्षा १० पटीने वाढल्यात हे नजरेआड केले जाते. =-O =O =-o =0 O_O O_o o_O O_0 o_0 0_O 0_o स्पा ने जरा जहाल शब्दात सांगीतले इतकेच. बाकी लेखावरील प्रतिक्रियाही मासलेवाईक आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

वेल्लाभट
Wed, 01/14/2015 - 16:17 नवीन
काय रे हे संकट ! बाबाबाबाबा ! साप्प्पाचा सीन बाकी सुम्साट झाला असणार. तुझ्या तोंडून संस्कृत भाषा नाय काय निघाली त्या व्यक्तीने साप काढल्यावर? म्हणजे मॉडिफाइड संभाषण असं झालं असतं..... मी: पत्रिका देताय णा ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण मी : आयच्या गावात हे काय??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली) ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती) मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला, ते: अरे बघून तर घे रे मी: अहो..... (चायला) (अपने रंग मे आते हुए) अरे ए बाबा! आवर ना; इथे फाटलीय माझी ! नीट सांगतोय ना नको म्हणूण???? तू आणि तुझा साप दोघेही निघा इथून ! (तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, मी: अरे ए....वेडझव्या ! (मोठ्याने पब्लिक ला उद्देशून) मी यांना ओळखत नाही (हे म्हणता म्हणताच CCD बाहेर धूम ठोकत)
  • Log in or register to post comments

हेटाळणी नाही बरं का

वेल्लाभट
Wed, 01/14/2015 - 17:58 नवीन
तो सापाचा किस्सा वाचताना आणि हसताना सहज सुचलेली गंमत लिहिली आहे वर. कुणाचा अपमान, हेटाळणी इत्यादी करण्याचा हेतू, इच्छा, प्रवृत्ती नाही. पुढचे प्रतिसाद वाचून आधीच सांगावं म्हटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

(No subject)

आतिवास
Wed, 01/14/2015 - 16:21 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

भन्नाट...

शैलेन्द्र
Wed, 01/14/2015 - 16:31 नवीन
भन्नाट... अजुनही असे बरेच अनुभव येतील.. त्याआधीच फडके रोड जवळ करावा..
  • Log in or register to post comments

मस्तच...

ब़जरबट्टू
Wed, 01/14/2015 - 16:45 नवीन
कहर... :)
  • Log in or register to post comments

जबराट आहेत एकेक किस्से...

शिद
Wed, 01/14/2015 - 17:06 नवीन
जबराट आहेत एकेक किस्से... :))
  • Log in or register to post comments

विनोदी लेखन म्हणून छान आहे.

कंजूस
Wed, 01/14/2015 - 17:14 नवीन
विनोदी लेखन म्हणून छान आहे. वधुपिते प्रामाणिकपणे आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी सांगत असतात आणि त्यावर काम होईल असे त्यांना सारखे वाटत असते तेव्हा हेटाळणी नको असे माझेही मत आहे. (फक्त हातभर फाटली हा वाकप्रचार काढ).
  • Log in or register to post comments

हेटाळणी नको सहमत.

मराठी_माणूस
Wed, 01/14/2015 - 17:34 नवीन
हेटाळणी नको
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा