✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

ए
एस यांनी
गुरुवार, 01/01/2015 - 00:20  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत. प्रवेशिका १५ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.
हा बदल फक्त ह्याच स्पर्धेपुरता मर्यादित राहिल. एक सूचना: स्पर्धेचे इतर सर्व नियम तेच असल्याने प्रत्येकी एक प्रवेशिका स्वीकारली जाईल. एकाहून जास्त प्रवेशिका ज्यांनी दिल्यात त्याना एक चित्र कोणते घ्यावे ते सांगायची संधी देत आहोत. नाहीतर बाय डिफॉल्ट पहिले चित्र विचारात घेऊ.
-- संपादक मंडळ
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या स्पर्धेचा विषय आहे 'व्यक्तिचित्रण अथवा पोर्ट्रेट फोटोग्राफी'. इथे साधारणपणे १८ वर्षांवरील वयाच्या एखाद्या व्यक्तीची आपण काढलेली प्रतिमा स्पर्धेसाठी पाठवू शकता. (लहान मुलांचे व्यक्तिचित्रण आणि त्यातही शिशु अथवा तान्हुल्यांचे छायाचित्रण हा नंतर कधीतरी स्वतंत्र विषय होऊ शकतो.)

स्पर्धेचे निकष:

कॅमेरा, लेन्स, इत्यादी तांत्रिक बाबींपेक्षा उपलब्ध साहित्याच्या क्षमतेचा कल्पक आणि पुरेपूर उपयोग. उदा. कमी प्रकाशात डीएसएलआर आणि फास्ट लेन्स वापरावी लागते. पण केवळ साधा मोबाइल कॅमेरा असेल तर दिवसा जास्त प्रकाश असतानाही चांगले फोटो येऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे भारीतले कॅमेरे नाहीत म्हणून सहभाग घ्यायला बिचकू नका.

कॉम्पोजिशन (रचनाविचार) किती परिणामकारक आहे आणि उपलब्ध लाइटिंग (प्रकाशयोजना) चा वापर किती जाणीवपूर्वक केला आहे ह्याला जास्त प्राधान्य दिले जाईल.

कृपया सेल्फी पाठवू नये. ;-)

ग्रुप पोर्ट्रेट हा वेगळा विषय आहे. त्यामुळे सिंगल पोर्ट्रेट हवेत.

तांत्रिक माहिती नाही दिली तरी चालेल. उदा. कॅमेरा, लेन्स, आयएसओ, अ‍ॅपर्चर, शटरस्पीड, पोस्टप्रोसेसिंग इत्यादी. पण हा फोटो तुम्हांला का घ्यावासा वाटला आणि का आवडतो ह्यामागची लहानशी 'स्टोरी बिहाइंड द पिक्चर' सांगायची असेल तर चार-पाच वाक्यांत जरूर लिहा.

पोर्ट्रेट फोटोग्राफी ही स्टुडिओ सेटअप मध्येच केली पाहिजे असे काही नसते. नैसर्गिक प्रकाशात आणि आउटडोअर प्रकारच्या प्रकाशयोजनेतही कमालीचे व्यक्तिचित्रण करता येते. खाली दिलेली माहिती ही केवळ त्यातील मूलभूत संकल्पना सांगण्यासाठी आहे. हेच केले पाहिजे असे काही नाही. शेवटी छायाचित्रण हे एक रचनात्मक (क्रिएटिव्ह) कौशल्य आहे.

काही टिप्स:

पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये डोळे व्यवस्थित शार्प (सुस्पष्ट) येणे महत्त्वाचे असते. व्यक्तीने दरवेळेस कॅमेर्‍याकडेच थेट पाहिले पाहिजे असे नाही. पण डोळे दिसत असतील तर त्यात थोडी चमक असावी. त्यामुळे छायाचित्राला एक प्रकारचा जिवंतपणा येतो.

फॅशन पोर्ट्रेटमध्ये मॉडेलच्या चेहर्‍यावरच्या सूक्ष्म सुरकुत्या, डाग इत्यादी दिसू नयेत म्हणून नेहमीच्या शार्प लेन्सेसऐवजी किंचित धूसर परिणाम देणार्‍या लेन्सेस वापरल्या जातात. त्यामुळे अशा पोर्ट्रेट्समध्ये एक प्रकारचा मुग्धपणा, ड्रीमीनेस जाणवतो. तुम्हांला पोस्टप्रोसेसिंग येत असल्यास हे ट्राय करून पहायला हरकत नाही. डोळे शार्प ठेवायचे पण गाल, कपाळ इत्यादी ठिकाणी किंचित ब्लर इफेक्ट द्यायचा. फास्ट लेन्स असेल तर f/1.8, f/2.8 सारखे मोठ्यातले मोठे अ‍ॅपर्चर वापरूनही हे साध्य करता येईल.

रचनाविचार साधण्यासाठी मॉडेल फ्रेमच्या मधोमध न ठेवता थोडेसे एका बाजूला घेतल्यास आणि दुसर्‍या बाजूला थोडी मोकळी जागा सोडल्यास जास्त चांगले दिसेल. ह्याव्यतिरिक्तदेखील रचनाविचारात कल्पकतेने प्रयोग करता येतील.

खाली काही 'बेसिक फ्रेमिंग' शॉट दाखवले आहेत.
१. लॉन्ग शॉट. यात मॉडेलच्या पायापासून केसांपर्यंत पूर्ण पोर्ट्रेट घेतले जाते. सोबतच काही पार्श्वभूमीसुद्धा चौकटीत येते. दिवसाची वेळ, आजूबाजूचे पर्यावरण या शॉटमध्ये समाविष्ट करता येत असल्याने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाच्या स्वरूपाचा वेध घेण्यासाठी अशा फ्रेमिंगचा वापर करतात. LongShot
२. मीडिअम शॉट. या शॉटमध्ये गुढघा किंवा कंबरेपासून वर शरीराचा अर्धा फ्रेममध्ये येतो. यात व्यक्तिमत्त्व जास्त ठळकपणे दिसते. MediumShot
३. मीडिअम क्लोजअप् शॉट. याला 'बस्ट शॉट' असेही म्हणतात. खांदे व छातीपर्यंतचा भाग फ्रेममध्ये येतो. MediumCloseupShot
४. क्लोजअप् शॉट. चेहर्‍यावरील हावभाव अतिशय संवेदनशीलपणे दाखवण्यासाठी अशा टाइट फ्रेमिंगचा वापर केला जातो. CloseupShot
५. एक्स्ट्रिम क्लोजअप् शॉट. खास डोळ्यांसाठी अथवा ओठांसाठी वापरला जाणारा शॉट. ExtremeCloseupShot (*प्रतिमा सौजन्य - पिक्साबे.कॉम)

व्यक्तिचित्रणात ज्याला फ्लॅटरिंग पोर्ट्रेट म्हटले जाते तो एक प्रकारचा त्रिमितीय परिणाम साधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या दिशांतून विषयवस्तूकडे प्रकाश पाडला जातो. त्याचे काही मूलभूत प्रकार खाली दाखवले आहेत. १. की लाइट किंवा मुख्य प्रकाश. 'की' म्हणजे प्रमुख स्रोत. ह्याचा अजून दुसरा उपयोग हा डोळ्यांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे चमक येण्यासाठी आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या सुरकुत्या झाकण्यासाठीसुद्धा होतो. २. फिल लाइट किंवा दुय्यम प्रकाश. फिल म्हणजे भरून टाकणे. की लाइटमुळे विरुद्ध दिशेला निर्माण झालेल्या सावल्यांच्या भागात थोडा प्रकाश पडावा ह्यासाठी फिल लाइट वापरली जाते. हा प्रकाश शक्यतो मोठ्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करून मिळवला जातो. की लाइट आणि फिल लाइटसाठी सॉफ्टबॉक्स वगैरे वापरून हे प्रकाशझोत सौम्य व विखुरलेले असे केले जातात. ३. हेअर लाइट / सेपरेशन लाइट किंवा तृतीय प्रकाशस्रोत. हा प्रकाशझोत अरुंद आणि थोडा तीव्र असतो. त्यामुळे केसांवर एक प्रकारचा त्रिमितीय भास निर्माण होतो. पुष्कळदा ग्लॅमर जगतातील मासिकांतील फोटो पाहिले असता व्यावसायिक छायाचित्रकारांच्या आणि हौशी छायाचित्रकारांच्या प्रतिमेत जो फरक जाणवतो तो ह्या हेअर लाइटमुळे जाणवतो. ४. बॅकग्राउंड लाइट. हा प्रकाश फक्त पार्श्वभूमीतील बारकावे झाकण्यासाठी किंवा कधीकधी मॉडेलच्या चेहर्‍यामागे 'हालो' प्रकारचा प्रकाश निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्यक्ती छायाचित्रात उठून दिसते. ५. अ‍ॅम्बियंट लाइट. हा प्रकाश म्हणजे स्टुडिओत किंवा बाहेर, जिथे फोटो काढतोय तिथे सर्वत्र असलेला नैसर्गिक प्रकाश. खालील उदाहरणात सर्व कृत्रिम प्रकाशझोत बंद केले तरी खिडकीतून येणारा सौम्य स्वरूपाचा प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला आहे. केवळ ह्या प्रकाशाचा आणि एखाद्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करूनही खूप चांगले फोटो काढता येतात.

PortraitLightingBasics1

PortraitLightingBasics2

खाली वेगवेगळ्या दिशांकडून चेहर्‍यावर प्रकाश पडल्यास कसा वेगवेगळा प्रभाव जाणवतो हे दाखवले आहे. हे केवळ माहितीसाठी.

PortraitLightingBasics3 PortraitLightingBasics4

अर्थात, ह्या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिकांमध्ये स्टुडिओ लाइटिंग वापरून घेतलेल्या प्रतिमा बहुतांशी नसतील तरी वरील संकल्पनांचा वापर करून नैसर्गिक प्रकाशातही तुम्ही चांगल्या प्रतिमा घेऊ शकता. उदा. की लाइटसाठी एखाद्या खोलीतील मोठ्या खिडकीचा वापर करता येईल, तर दिवसा ऊन असताना सावलीत अशा स्वरूपाचा प्रकाश मिळू शकेल. हेअर लाइट मिळवण्यासाठी व्यक्तीच्या मागून प्रकाश येईल अशा प्रकारे साधा ऑन-कॅमेरा फ्लॅश वापरूनही मस्त प्रतिमा घेता येतील.

छायाचित्रण हे अभिव्यक्तीचे एक साधन आहे. व्यक्तिछायाचित्रण हे केवळ ग्लॅमर, फॅशन क्षेत्रातच केले जाते असे नाही. रिपोर्ताज, स्ट्रीट फोटोग्राफी, माहितीपर पुस्तिका इत्यादींमध्येही व्यक्तिछायाचित्रण महत्त्वाचे मानले जाते. एक व्यक्ती म्हणून आपण सर्वचजण इतके वेगवेगळे असतो. तेही प्रत्येक क्षणी बदलते. हा वेगळेपणा, युनिकनेस टिपणे हे या अभिव्यक्तीचे ध्येय्य मानायला हरकत नाही. त्यातील गुंतागुंतीच्या तांत्रिकतेमुळे घाबरायचे काही कारण नाही.

ही नॅट-जिओच्या कव्हरवर प्रकाशित झालेली प्रसिद्ध प्रतिमा सर्वांना माहिती असेलच. शरबत गुला ह्या तत्कालीन अफगाण निर्वासित मुलीची स्टीव मॅककरी यांनी ही नैसर्गिक प्रकाशात घेतलेली प्रतिमा आहे.

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
72728 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

बहुदा हरकत नसावी...

मुक्त विहारि
Sun, 01/04/2015 - 23:42 नवीन
पण हरकत घेतलीच तर... "वाघा बॉर्डरवरचा एक 'रुबाबदार' बी.एस.एफ. जवान." हा फोटो मला जास्त आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

शिकार्‍याचे चालक मालक आणि

खटपट्या
Tue, 01/06/2015 - 04:47 नवीन
शिकार्‍याचे चालक मालक आणि पालक थेट युरोपातीलच वाटत आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

त्या सीमेवरच्या चालू घडामोडी

कंजूस
Mon, 01/05/2015 - 01:41 नवीन
त्या सीमेवरच्या चालू घडामोडी पाहता दोनचार फोटोंचा दे दणका योग्यच वाटतो. होऊ दे महागुरुंची पळापळ.
  • Log in or register to post comments

माझा एक प्रयत्न

स्पा
Mon, 01/05/2015 - 13:08 नवीन
गणपती विसर्जनाची अलोट गर्दी, त्यात भरीस भर म्हणून लालबाग चा राजा मंडपाबाहेर आला, अक्खा जनसागर त्याची छबी टिपायला उसळला त्यात ह्या कडकलक्ष्मी वाल्याकडे कोण बघणार,तरीही त्याच्या परीने तो प्रयत्न करत होताच पण चाबूक पाठीवर मारून मारून तोही थकला, एक क्षण त्यानेही राजाकडे पहिले , काय मागणे मागितले असेल त्याचे त्याला ठाऊक, त्याची स्वप्न त्याच्या डोळ्यात काठोकाठ भरलेली दिसली Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच रे स्पा

सौरभ उप्स
गुरुवार, 01/08/2015 - 00:14 नवीन
मस्तच रे स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

'अंदमान' मधली ही एक पंचायत

आतिवास
Mon, 01/05/2015 - 14:07 नवीन
'अंदमान' मधली ही एक पंचायत सदस्य. Image removed. अवांतरः स्त्रियांचे अनेक फोटो आहेत, पण ते प्रकाशित करावेत की नको - अशा संदेहात मी नेहमी असते!
  • Log in or register to post comments

सेल्फ पोर्टेट चालेल काय ?

किल्लेदार
Mon, 01/05/2015 - 19:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments

* पोर्ट्रेट

किल्लेदार
Mon, 01/05/2015 - 19:46 नवीन
* पोर्ट्रेट....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

हम्म्!

एस
Mon, 01/05/2015 - 19:55 नवीन
सेल्फ पोर्ट्रेट आणि सेल्फी यामध्ये बराच फरक असतो म्हणा. सिंडी क्रॉफर्डचे आरशात घेतलेले सेल्फ्-पोर्ट्रेट म्हणा, किंवा आन्सेल अ‍ॅडमचे सेल्फ पोर्ट्रेट ही काही उदाहरणे. तीपण एक कला आहे. पण तुम्ही समजा सेल्फ पोर्ट्रेट पाठवले आणि मग इतरांनी सेल्फी पाठवायला सुरूवात केली तर मला प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा नकोच. सेल्फीज, ग्रुप पोर्ट्रेट्स आणि किड्स पोर्ट्रेट्स सर्वांगीण विचार करूनच वगळली आहेत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

तेही बरोबरच आहे............

किल्लेदार
Mon, 01/05/2015 - 20:04 नवीन
तेही बरोबरच आहे.यासाठी एक नविन स्पर्धा घेऊ म्हणजे मला पण वाव मिळेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सासवड चे आजोबा

येडाखुळा
Mon, 01/05/2015 - 22:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

मुक्त विहारि
Mon, 01/05/2015 - 23:36 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडाखुळा

व्यक्ती चित्रणांत

मुक्त विहारि
Mon, 01/05/2015 - 23:47 नवीन
दोन व्यक्ती चालतील का?
  • Log in or register to post comments

आमचा पण सहभाग...

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:05 नवीन
मुळात आम्हाला प्राण्यांची आवड जरा जास्तच. खरे तर वाघ किंवा सिंहच पाळायचा विचार होता.अगदीच काही नाही तर निदान एक २-४ हत्ती एक १०-१२ घोडे आणि २५-३० उंट पण पाळायचा विचार होता. पण आमच्या तब्बल ६०० स्क्वे.फू. घरात फक्त इतकेच प्राणी कसे काय ठेवणार? बरीच जागा तरी पण शिल्लक राहिली असती, म्ह्णून मग एक छोटी लेडी डायनॅसॉर विकत आणली. आमच्या मोठ्या मुलाचे आणि ह्या लेडी डायनॅसॉरचे फार मेतकूट. तो झोपला की, ही त्याचे रक्षण करत बसते. कधी न्हवे तो आमच्या हातात कॅमेरा आला आणि बॅटरी पण सुरु होती आणि मेमरी कार्ड पण जागेवरच होते, त्यात भर म्हणून बायको टी.व्ही.च्या खोक्यात अक्कल शिजवायला बसली होती. मग काय? मुवि, हाच तो क्षण आणि हीच ती संधी, असा विचार करून काहीतरी टिपले. बघाना आमच्या लेडी डायनॅसॉरच्या डोळ्यात पण चमक आली आणि मुलाच्या चेहर्‍यावरचे, "मी बघतोय बाबा." हे पण भाव तुमच्या लक्षांत आलेच असतील... Image removed.
  • Log in or register to post comments

गणेशा...!

एस
Tue, 01/06/2015 - 00:09 नवीन
तुम्ही सांगताय म्हणून लक्षात आले. फोटो दिसला असता तर अजून व्यवस्थित लक्षात आले असते. ;-)
  • Log in or register to post comments

अरेच्चा...

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:11 नवीन
आता बघा बरे,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

(No subject)

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओके

एस
Tue, 01/06/2015 - 00:12 नवीन
आता दिसतोय फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आता दिसतोय फोटो....

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:15 नवीन
आमचे फोटोग्राफी गुरु होणार का? शिष्याची पातळी-कुवत समजली असेलच. मला जर ही कला शिकवलीत तर, ह्या भुतलावर ते सोडाच अख्ख्या आकाशगंगेत, तुम्ही कुणालाही फोटोग्राफी शिकवू शकाल... फोटोग्राफीत फार माठ मनूष्य आहे मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हा वर्ग सुरु होणार असेल तर मी

टवाळ कार्टा
Tue, 01/06/2015 - 09:44 नवीन
हा वर्ग सुरु होणार असेल तर मी सुध्धा येइन... क्रॅश कोर्स सुध्धा चालेल मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा वर्ग सुरु होणार असेल तर मी सुध्धा येइन... ..

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 10:51 नवीन
तु येणार? मग झालं... शिकणे सोडून टवाळ-गिरीच जास्त होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

उग्गिच...

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 12:03 नवीन
उग्गिच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बहुदा...

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:12 नवीन
आता फोटो दिसत असावा... (स्वगतः फोटो दिअसत असेल तर, भटक्या खेडवालांना एक बियर पार्टी परत लागू....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आता फोटो टाकायचे टेक्नीक समजले आहेच तर....

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:26 नवीन
आम्ही तसे कट्टेकरी, (पण तिथेही आमच्या हातात कॅमेरा नसतो.) असाच कुणीतरी काढलेला अज्जुन एका कट्टेकर्‍याचा फोटो... त्यांनी सांगावे आणि आम्ही ऐकावे... Image removed.
  • Log in or register to post comments

हा आमच्या अज्जुन एका मिपा प्रदक्षिणेतल्या गुरुंचा फोटो..

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 00:38 नवीन
आपला १५ फेब्रुवारीचा कट्टा, ज्या जागेत होणार आहे, त्या जागेतल्या झोपाळ्यावर बसलेल्या आमच्या गुरुंचा फोटो... Image removed.
  • Log in or register to post comments

एकापेक्षा अधिक प्रवेशिका चालतील का?

वाचक
Tue, 01/06/2015 - 02:27 नवीन
म्हणजे आमच्या निवडीचा ताप कमी करुन स्वॅपबुवांच्या डोक्यावर मारायला...
  • Log in or register to post comments

मी नाही त्यातला आणि एक फोटो

कंजूस
Tue, 01/06/2015 - 08:02 नवीन
मी नाही त्यातला आणि एक फोटो टाकला. (मी नाही त्यातली आणि एक सरी घातली ). मायक्रोफोन हातात न घेणारा नंतर हातातून सोडतच नाही. #डिजिटल फोटोग्राफी आल्यापासून एक चांगले झाले कैमऱ्याचाच एकदा काय तो खर्च नंतर फोटो काढणे आणि जगाला दाखवण्याचा खर्चच नाही. (फिल्म कैमरा घेऊन पोळलेला.)
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

प्रचेतस
Tue, 01/06/2015 - 08:55 नवीन
आमच्या एका मित्राचा आम्ही काढलेला फोटू. (त्यांची पूर्वपरवानगी घेऊनच येथे टाकत आहे) Image removed.
  • Log in or register to post comments

कोणाकडे बघू असे झालेय. खूप

खटपट्या
Tue, 01/06/2015 - 10:16 नवीन
कोणाकडे बघू असे झालेय. खूप छान फोटो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फोटो छान !! पण ते मोराला हरिण

सूड
Tue, 01/06/2015 - 14:32 नवीन
फोटो छान !! पण ते मोराला हरिण का दाखवतायेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मोरानी त्याला-पाहिजे ते

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/06/2015 - 14:44 नवीन
मोरानी त्याला-पाहिजे ते बघितलं, Image removed. . . . असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा !! अहो बुवा, ती मुद्रा

सूड
Tue, 01/06/2015 - 14:47 नवीन
हा हा !! अहो बुवा, ती मुद्रा हरणाची आहे म्हणून म्हटलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अत्यंत अपेक्षित प्रतिसाद!

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/06/2015 - 15:35 नवीन
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद! चालू द्या.....................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एकाहून एक सुंदर फोटो येताहेत.

विशाल कुलकर्णी
Tue, 01/06/2015 - 10:36 नवीन
एकाहून एक सुंदर फोटो येताहेत. आत्मारामगुर्जींचातरं लैच भारी :)
  • Log in or register to post comments

माय सिस्टर ...

विशाल कुलकर्णी
Tue, 01/06/2015 - 10:41 नवीन
माय सिस्टर ... काही वर्षांपूर्वी अलिबागजवळ जंजीर्‍याला गेलो होतो. तेव्हा राजापूरीहून शिडाच्या तरीतून जंजीर्‍याकडे जाताना घाबरून डोळे मिटून घेतलेल्या बहिणाबाईंची टिपलेली छबी.. Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

मोहन
Tue, 01/06/2015 - 11:20 नवीन
गानयोगिनी श्रीमती धोंडुताई कुलकर्णींची ही मैफिल शेवटचीच ठरली. धोंडुताई गाणार म्हणुन अनेक दिग्गज कलाकार मैफिलीला उपस्थीत होते. उ. अझीझउद्दीन बाबांच्या प्रथम पुण्यतीथी निमित्त कार्यक्रम होता. ८५ वयाच्या आसपास असलेल्या बाई अप्रतीम गायल्या. मी एकंदर माहोल पाहुन भारावुन आपला फोटोच काढत बसलो. नंतर लक्षात आल्यावर थोडेफार गाणे पण रेकॉर्ड केले. त्यानंतर मात्र वर्ष - दिड वर्षातच त्या गेल्या. आता केवळ आठवणी राहील्या ... याच मैफिलीतली त्यांची एक भावमुद्रा. फोटो क्रॉप करुन ईतर डिटेलस कमी केले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

ओहो.. सुंदर !

विशाल कुलकर्णी
Tue, 01/06/2015 - 12:51 नवीन
ओहो.. सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन

थोडी जुनीच चित्रे

वाचक
Wed, 01/07/2015 - 02:39 नवीन
मागे एकदा टाकली होती बहुतेक तबला नवाझ सुप्रीत देशपांडे Image removed. एक भावमुद्रा Image removed.
  • Log in or register to post comments

इकडे लक्ष द्या!

एस
Wed, 01/07/2015 - 11:57 नवीन
धाग्यातील खालील सूचना येथे उद्धृत करीत आहे - एक सूचना: स्पर्धेचे इतर सर्व नियम तेच असल्याने प्रत्येकी एक प्रवेशिका स्वीकारली जाईल. एकाहून जास्त प्रवेशिका ज्यांनी दिल्यात त्यांना एक चित्र कोणते घ्यावे ते सांगायची संधी देत आहोत. नाहीतर बाय डिफॉल्ट पहिले चित्र विचारात घेऊ.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

बेमिसाल
Wed, 01/07/2015 - 22:18 नवीन
Image removed. Other information Camera: SONY DSC 572 Flash : Used Focal Length: 6mm Exposure time : 0.02s[1/50] F.No. f/28 ISO: 100
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका .....

_मनश्री_
Mon, 01/12/2015 - 14:47 नवीन
शेगावच्या देवळाच्या बाहेर हे बाबा दिसले ..... त्यांना विचारलं ' काका तुमचा एक फोटो काढू का ? अगदी आनंदाने तयार झाले आम्हाला म्हणाले जरा थांबा …. मग त्यांनी फेटा सोडून परत बांधला ,मिशांना पीळ दिला ,लांब दाढी गुंडाळून फेट्यात अडकवली मग म्हणाले ' आता काढ फोटो ' Image removed.
  • Log in or register to post comments

....मी दिलेला पहिला फोटो, क्र. १.......

विनोद१८
Mon, 01/12/2015 - 17:22 नवीन
......वाघा बॉर्डरवरचा एक 'रुबाबदा' बी.एस.एफ. जवान'
या स्पर्धेतली माझी प्रवेशिका म्हणुन घ्यावा, अशी विनंती. धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments

रसाळगडाच्या वाटेवर काढलेला एक

शलभ
Mon, 01/12/2015 - 17:51 नवीन
Image removed. रसाळगडाच्या वाटेवर काढलेला एक फोटो..
  • Log in or register to post comments

माझी पण प्रवेशिका

राघव
Wed, 01/14/2015 - 14:15 नवीन
*** कृपया माझी आधीची प्रवेशिका बाद करून ही विचारात घ्यावी ही विनंती. *** आपण सगळे मिपासदस्य किल्लेदारांना फोटोग्राफीमुळे ओळखतच असाल. आम्ही दोघं अगदी लहानपणापासूनचे मित्र. अर्थात् मी काही तेवढा टॅलेंटेड इसम नाही. पण २ वर्षांपुर्वी या महाभागाचेच काही फोटो काढण्याचा योग आला. आम्ही हिमाचलच्या छोटेखानी टूर वर सोबत गेलेलो असतांना, त्याच्याच कॅमेरानं हे २ फोटो काढलेले आहेत. एरवी या माणसाला एका जागी शांत बसवणं कठीण असलं तरी मी असं म्हणू शकतो की फोटोत का होईना पण याला एका जागी कैद केलेलं आहे. :-) १. साच पास ला चाललो होतो. पण बर्फामुळे पुढे जाता आलं नाही. रस्त्यावर पडलेल्या त्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा फोटो. Image removed. २. मॅक्लीऑडगंजला काढलेला हा त्याचा दुसरा फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments

दोहोंपैकी कोणता फोटो

एस
Wed, 01/14/2015 - 15:13 नवीन
दोहोंपैकी कोणता फोटो तुम्हांला स्पर्धेसाठी द्यायचा आहे? दोन्ही प्रतिसादांत फोटोंच्या क्रमाची अदलाबदल झालीयं म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

दुसरा फोटो घ्यावा.

राघव
Wed, 01/14/2015 - 17:58 नवीन
दुसरा फोटो घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

एक प्रयत्न आमचाही

चौकटराजा
Wed, 01/14/2015 - 18:14 नवीन
Image removed. नैसर्गिक उजेडात फोटो काढण्यास मजा येते. हा असाच फोटो आहे. माहिती खालील प्रमाणे- कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट- ए ५२० - एफ- २.६ , शटर १/१५ सेकंद फ्लॅश नाही- मीटर मोड सेंट्टर वेटेड अ‍ॅव्हरेज एक्स्पोझर कॉम्पेन्सेशन - शून्य. कोणतेही पोस्ट फोटो प्रोसेसिंग व क्रॉपिंग नाही.
  • Log in or register to post comments

चौरा, धाग्यात

एस
गुरुवार, 01/15/2015 - 12:48 नवीन
चौरा, धाग्यात सांगितल्याप्रमाणे ग्रुप पोर्ट्रेट्स नकोयत. आजीचा सिंगल पोर्ट्रेट फोटो द्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

फारच सुंदर फोटो.

नांदेडीअन
गुरुवार, 01/15/2015 - 16:00 नवीन
फारच सुंदर फोटो. नियमात बसला असता तर नक्कीच पहिला क्रमांक मिळाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा केवळ फोटोतील भावासाठी....

चौकटराजा
Wed, 01/14/2015 - 18:30 नवीन
खालील फोटोत " नॉईज" दिसत आहे .तसेच हा फोटो क्रॉप केलेला आहे. बाकी कोणतेही पोस्ट फोटो प्रोसेसिंग नाही. हा आस्वादा साठी. Image removed. माझी आज्जी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा