भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १
लेखनविषय (Tags)
(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. )
दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ! :-/ का ते पुढे कळेलच ) आणि किसनदेव (उर्फ मुरलीधर महाराज ठाणेकर) असे ३ वारकरी आमच्या त्या उपरोक्त नागरीयोगामुळे ती रिक्षा पहिल्याच फटक्याला मिळवून पुणे ठेसन जवळील मिटींगप्वाइंट वर येऊन थडकलो.नंतर बरोब्बर ५ मिनिटात मागून प्र.गो.त्यांच्या नवरथासह वल्ली (उर्फ..आगोबादिंडी)ला घेऊन आले. (आगोबास दिंडी का म्हटले? यावर लवकरच एक मोठ्ठे खडकखंडकाव्य प्रसवण्यास घेणार आहोत.तेंव्हा ते कळेल..सध्या का हि ही इचारू णये! :-/ ) मग तिथे माझा मनपसंत इराणी चहा चांगला एकाला २/२ कप-मारून आंम्ही वेरुळास प्रस्थान ठेवते झालो. काहि वेळातच आगोबा (आणि संपूर्ण ट्रीपभर मेंदूधुवून माझ्या पाठिस पडलेला. स.गा. उर्फ धन्या उर्फ छोटा हत्ती) माझ्यावर हल्ले करु लागले..पण मी घारापुरीकट्ट्यातील दूर्लक्ष हत्याराचा पुरेपुर उप-योग करून दोघास परस्पर जेरीस आणविले.
प्रगोनी एका बाजुनी गप्पा वेंजॉय करत सहभागी होत सुमाट गाडी हानली..आणि सकाळच्या वेळेचा योग्य सदुपयोग करत आंम्ही ११:३० ला वेरुळात पोहोचलो. सदर संपूर्ण चालकत्वात प्र.गों.नी त्यांचे Go हे क्रीयापद गाडीसह झकास-चालविले. (गर्दी सोडून! ;) ). प्र.Go.चलित.आरामनवरथसुखप्रवासामुळे त्रास असा झालेलाच नव्हता.म्हणून लग्गेच फ्रेश होऊन आंम्ही कैलास लेण्यांकडे दिंडी वळवली. आगोबा ल्हान हत्ती..आपलं ते हे..मुलासारखा उड्या मारत मारत भरभर चालत होता.( =)) ) मी मात्र ,थंडीत आलो हे किती बरं झालं! असा व्यत्यासी विचार करत चाललो होतो. लोकहो..पण हे खरच आहे हो! उन्हाळ्यात त्या संपूर्ण परिसराला वल्लींसारखा खराखुरा गाइड लाभला,तरीही त्या लेण्यांचे "खरे देणे" पाववून घ्यायला,कमीतकमी ५ दिवस लागतील. आणि आपल्या मागे एका ट्रॉलीवर पाण्याचा कॅन(दररोज प्रत्येकी १०लिटर) या हिशोबानी घेऊन फिरावं लागेल.. एरवी क्यामेरा अथवा डोळ्यांनी क्लिकक्लिकाटच करून यायच असेल. तर एक दिवस बास्स!
आता मला इथलं भावलेलं किंवा वाटलेलं वैशिष्ठ्य काय? तर वर म्हटल्या प्रमाणेच दिव्यता अनुस्यूत अशी भव्यता! अगदी अरसिक माणूसंही इथे आल्यावर त्या वेळेपुरता तरी बदलून जाइल. आणि वल्लींसारख्यांकडून माहिती मिळत मिळत पहाण्याचा योग आला,तर गाढव सुद्धा जिज्ञासू होइल.. मग मी कोण ? मी बराचसा कला आसक्त माणूस आहेच...पण त्याहिपेक्षा मला कुठेही अगदी खरिखुरी निर्मिती दिसायला लागली. कि ही कर जुळल्याची भवना निर्माण होते..आणि थक्क होण्यापेक्षा मी बघता बघता त्याचाच भाग होऊन जातो..यावेळीही मला या सगळ्या अफाट कलाकृतीनी एका झटक्यात-वश केलं! आणि हा खेळ अगदी एंट्रीपासूनच सुरु होतो. मला असं वाटलं होतं,की २ दिवसात एव्हढ्या सगळ्या लेण्या पहायच्या मंजे बहुतेक आपली वाट लागणार...पण मला या भव्यतेनी तीच्याच वाटेला ,अगदी काहि क्षणात लावलं ..आणि मला थकणं सोडा ...एकही क्षण कंटाळा सुद्धा आला नाही. शिवाय माझा वल्लीच्या माहितीसह व्हिडिओ शुटिंग करण्याचा मानसंही भरपूर चांगला पूर्ण झाला. शनिवार/रविवार असल्यामुळे (आमच्यासह..)पर्यटक होतेच होते. पण किमान ५/६ शाळांच्या ट्रिपा आलेल्या होत्या...त्यामुळे काहि रसभंग झाला.. पण माझ्या साठी ही ट्रीप म्हणजे वेरूळची सुरवात आहे..ही खुणगाठ आधीच मनाशी बांधलेली असल्याने मला ते सर्व सहज सहन झाले.
असो... आता फार काहि लिहून तुंम्हाला छळत न बसता,थोडी फोटो सफर घडवितो.
डिस्क्लेमरः- मी फक्त माझ्या भावना व्यक्त करत फोटो लावणार आहे..त्याची नाव आणि माहिती हे वल्ली मास्तरांचे काम आहे..त्यामुळे आगोदरच क्षमस्व...म्हणून सुरवात करतो. (यावेळी मी आणि प्र.गो.वल्लीमास्तुरेंकडून सप्तमातृका ओळख परिक्षेत पडत्याकाठावर पास जाहलेलो आहोत! :D किसनदेवांना ५५ टक्के मार्क मिळालेले असावे! ;) असं मला वाटतं..आणि १ उदासीन इद्यार्थी स.गा. हे तर स्वतःला अजुन तिकडे बघा ही म्हणत नसल्यामुळे..त्यांचा यात कुठे प्रश्नच येत नाही..तर ,ते एक असो! ;) )
मी ज्याला भव्यता म्हणतो ती काय? तर..अगदी सुरवातीपासून..
एंट्रीलाच याचा प्रत्यय यायला लागतो.
१) अता ही कैलास लेण्यांच्या सुरवातीची शिल्प पहा.. मध्यभागी-उग्ररूपे प्रकटे तो नर-सिंव्ह...आहे कि नाही एकदम तस्साच!?
असं वाटतं,की त्या कातळात या मूर्जींची बिजं आधिच होती,आणि कलाकारांची कौशल्य व मूर्तीकारांचे हात लागल्यावर त्यांच्याशी बोलत बोलत ह्या कलाकृती बाहेर प्रकट झालेल्या आहेत. हा भास इथे अनेक ठिकाणी होतो.
२) आता काहि काळ आपण स्तंभित होऊ या!
३)आता थोडे थक्क होऊ...
४) आणि आता....पहातच राहू!
५)आता... तय्यार रहा!
इथून पुढचे फोटो अंगावर येणार आहेत....
ही एका आनंददायक हिप्नोसिसची वेळ आहे...
ते तुम्हाला त्यांच्या राज्यात घेऊन जाणार आहेत...
तुंम्ही त्यात आत आत हरवत जाणार आहात...
इथून अज्जिबात निघून जायची इच्छा होणार नाहिये...
मन..रोमांचित होत जाणार आहे..
उरलेल्या जगाचा विसर पडणार आहे...
यू....आर...गोइंग...डी...............प डी............प स्लीप.......
====================
क्रमशः..............
असं वाटतं,की त्या कातळात या मूर्जींची बिजं आधिच होती,आणि कलाकारांची कौशल्य व मूर्तीकारांचे हात लागल्यावर त्यांच्याशी बोलत बोलत ह्या कलाकृती बाहेर प्रकट झालेल्या आहेत. हा भास इथे अनेक ठिकाणी होतो.
३)आता थोडे थक्क होऊ...
५)आता... तय्यार रहा!
इथून पुढचे फोटो अंगावर येणार आहेत....
ही एका आनंददायक हिप्नोसिसची वेळ आहे...
ते तुम्हाला त्यांच्या राज्यात घेऊन जाणार आहेत...
तुंम्ही त्यात आत आत हरवत जाणार आहात...
इथून अज्जिबात निघून जायची इच्छा होणार नाहिये...
मन..रोमांचित होत जाणार आहे..
====================
क्रमशः..............
प्रतिक्रिया
वावावा !छानच लिहिता आहात
खुप छान पण वृत्तांत अजुन
फोटो छान.
फोटो आवडले व त्यांची केलेली
आवडले!!!!
मला पहायच होतं ना वेरुळ आणि
तुम्ही याल तेव्हा सांगा फक्त!
काही गोष्टी..
उत्तम आणि खुसखुशित सुरुवात.
चौ.रा.
धन्याचा दुसरा आणी तिसरा फटू
@लुलुलुलू च्या स्मायलि ला ऐति
म्हणजे
@त्याकाळी सुद्धा अगोबा व बुवा
पहिला आणि शेवटचा फटू...लई
आवडलं
बुवा इस्टाइलचं वर्णन आणि
और....इस सब के दरमीयान....
और....इस सब के दरमीयान....
लेण्या पाहाणे सुरुच होते. तसे आंम्ही चौघे जण (मी.किसन.वल्ली.प्र.गो.) वल्लीच्या मार्गदर्शनाखाली वन बाय वन सर्व पहात होतो. पण शाळेच्या आलेल्या ट्रिप, मुलांच्या रांगा अगर घोळके घेऊन, आमच्या मधून नॉनस्टॉप कुठूनंही कुठेही प्रचंड चिवचिवाट व गोंधळ करत वळवळत जाणार्या आळी सारख्या जात होत्या..याचा त्रास वाटला तरी राग येत नव्हता. पण सगळ्यात महान प्रकार होता तो..पर्यटकांचा! यांना नक्की कळत नाही,का सगळे निरक्षर अडाणी आहेत अशी अनेकदा शंका येत होती.अभिनंदन!
@तीसहजारी धागा! >>> अरे....!
फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे
@ह्यां खय दिसलां नाय ! टाका
बुवा...
मस्त वृत्तांत!